Skip to main content

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ५

 

patanjal yogdarshan


ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ५  

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी 

समाधिपाद :

दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् ॥१.१५॥

पातंजल योगदर्शन : अध्याय १ समाधिपाद : सारांश 


१) जीवाला भोग घडवून आत्मसाक्षात्कार  पथाला नेण्याच्या सत्व-रज-तम ह्या त्रीगुणामध्ये जी शक्ती आहे तिला भोगापवर्गार्थता असे योगशास्त्रकारांनी म्हटले आहे !
२) सुख बाह्य विषय सेवनात असते तर सर्वांस सर्वकाळी सारखेच सुख प्राप्त होवयास पाहिजे होते !
३) नैसर्गिक नियमांकडे दुर्लक्ष झाले किंवा त्या विरोधी वर्तन घडले कि त्यासाठी निसर्ग शासन करते !
४) जीवाची सात्विक बुद्धी वाढीस लागल्यावर ज्ञानाच्या साह्याने त्यास बाह्य विषय सेवनातील क्षणिक सुख देखील तत्वता दुखः आहे हे समजते !
५) विषया संबंधी दोषदृष्टी उत्पन्न झाल्यावर लागलीच विषयत्याग घडत नाही !
६) विषय त्यागाला अभ्यासाद्वारे सुरवात केल्यावर भोगवृत्ती व त्यागवृत्ती यामधील झगडा जीवाला फारच क्लेशदायक ठरत असतो !

यतमान संज्ञक वैराग्य

७) सततच्या योग अभ्यासाने जीवाची भोगवृत्ती कमी होत जाते  व वैराग्याचा उदय होतो ! वैराग्याचा उदय झाला कि विषय वासना जिंकण्यासाठी जीव सतत प्रयत्न वाढवत जातो यास योगशास्रात यतमान संज्ञक वैराग्य असे म्हटले आहे, जे वैराग्याच्या ४ अवस्थेमधील पहिली अवस्था आहे !

व्यतिरेक संज्ञक वैराग्य

८) वैराग्याची दुसरी अवस्था व्यतिरेक संज्ञक वैराग्य : इंद्रियांचा असंयम हाच सर्व आपत्तींना कारण आहे व त्यांचा संयम हाच सुखाचा खरा मार्ग आहे हे साधकास स्वानुभवाने पटते ! मग साधक सतत आत्मनिरीक्षण करून आपल्या योगसाधनेतील प्रगतीचा आढावा घेत राहतो व त्या दृष्टीने प्रयत्न वाढवत जातो ह्या अवस्थेला व्यतिरेक संज्ञक वैराग्य असे म्हणतात ! 

एकेंद्रिय संज्ञक वैराग्य

९) वैराग्याची ३ री अवस्था एकेंद्रिय संज्ञक वैराग्य : योगअभ्यासामुळे मिळणाऱ्या सुखाची ओढ साधकाला लागते. त्याअनुसार तो अपोआप आपल्या जीवनाची सात्विक रित्या मांडणी सुरु करतो. उदा. सात्विक आहार, झोपेचे नियंत्रण, सज्जन संगत, ग्रंथांचे अध्ययन इत्यादि. थोडक्यात त्याचे पूर्ण जीवन अध्यात्मप्राप्ती ह्या केंद्रस्थानी फिरु लागते ! इंद्रिय व मन यांच्या ठिकाणी छान असा संयम झालेला असतो परंतु बुद्धीतून समूळ उच्चाटन झालेले नसते व बुद्धी उच्चाटनसाठी अजून बळकट प्रयत्न हवे असतात अशा अवस्थेस  एकेंद्रिय संज्ञक वैराग्य  असे म्हणतात !


वशीकार संज्ञक वैराग्य 

१०) वैराग्याची सर्वोच्च म्हणजे ४ थी अवस्था वशीकार संज्ञक वैराग्य : येथे योग्याच्या चित्तात विषयांविषयी पूर्ण अनासक्ती झालेली असल्याने वैराग्यस्थिरतेसाठी अधिक योग अभ्यासाची आवश्यकता राहत नाही ! तो निर्विचार समाधी प्राप्त करतो ! ह्या अवस्थेला वैराग्याची सर्वोच्च म्हणजे ४ थी अवस्था वशीकार संज्ञक वैराग्य असे म्हणतात !

११) आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर चित्ताची ओढ सर्वस्वी थांबते कारण त्याचे सत्व-रज-तम हे त्रिगुण प्रयोजनशून्य असतात ! त्रीगुण व त्यांचे कार्य ह्यांकडे तो जीव उदासीन होवून बघतो कोठेही आसक्त होत नाही ! ज्ञानाची हि सर्वोच्च पराकाष्ठा आहे ! 

१२) योग शास्त्राचे अंतिम ध्येय जे कैवल्य आहे ते येथून फार दूर नाही !

Ganesh K Avasthi
Blog Admin

पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २ - ३ - ४  : समाधिपाद - साधनपाद - विभूतीपाद - कैवल्यपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १४

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १५ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १६ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १७ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १८

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १९

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २०

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २१ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २२ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २३ 

 




 

Comments

  1. Tatparam purushkhyatergunavaitrushnam

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आत्मसाक्षात्काराचे फळरूप वैराग्य : परवैराग्य !

      Delete

Post a Comment

Popular

नितिन गडकरी बीफ एक्सपोर्ट विवाद क्या है ? तथ्यों के साथ समझे !

  नितिन गडकरी बीफ एक्सपोर्ट विवाद क्या है ? तथ्यों के साथ समझे ! गडकरी परिवार, रेम्बल एग्रो और मिथ्र इंटरनेशनल: चार्ट के अनुसार संबंध और विवाद ! हाल ही में सोशल मीडिया और कुछ मीडिया रिपोर्ट्स में नितिन गडकरी के परिवार से जुड़ी कंपनियों और बीफ (भैंस मांस) निर्यात कारोबार को लेकर चर्चा तेज हुई है ! विपक्ष ने इसे अपना हथियार बनाकर नितिन गडकरी के साथ ही भाजपा को निशाना बनाना शुरू किया है ! निर्भिड ने अपने तरीकेसे इस मुद्दे को समझा और वाचकों को निष्पक्षता से समझाने हेतु यह लेखप्रपंच किया है ! सबसे पहले फ्लो चार्ट को देखिये और समझने की कोशिश कीजिये !  क्या भारत गोमांस निर्यात करता है ? तो आपको यह स्पष्ट रूपसे स्पष्ट करते हुवे हम कहते है की नहीं भारत गोमांस निर्यात नही करता ! लेकिन FY 2024-25 में भारत ने लगभग  12,54,775 टन (1.25 मिलियन टन)  भैंस का मांस निर्यात किया ! इसकी कुल कीमत लगभग  $4.06 बिलियन  थी। लेकिन निर्भिड यह पूछना चाहता है की अगर यही सारे सबंध किसी गैर भाजपा मंत्री के होते तो भाजपा और तथाकथित गोरक्षक संघटनाये  इस मुद्दे को राजनितिक फायदे के लिए...

नाशिककर सावध व्हा !

  नाशिककर सावध व्हा ! भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या मध्य प्रदेश मधील इंदोर शहरातील भागीरथपुरा भागात आतापर्यंत ड्रेनेजयुक्त पाणी पिल्यामुळे १६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ! ११०० वर आजारी असल्याची नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे !  गेल्या अनेक दिवसापांसून येथील नागरिक दुषित पाण्याची तक्रार सबंधित विभागाकडे करत होते परंतु अत्यंत कार्यक्षम अशा मुर्दाड प्रशासनाने त्याची दखल काही घेतली नाही ज्यामुळे आज इतकी मोठी किंमत तेथील नागरिकांना चुकवावी लागली आहे ! ह्या प्रशासकीय हत्येला दाबण्यासाठी मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला  २ लाख रु. देवून व ४-५ अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचा फार्स करून वातावरण शांत करण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न करण्यात आला आहे व त्यात राज्य सरकार नक्कीच यशस्वी होईल यात मला शंका नाही ! कारण भारतीय समाज मानसिकता हि कसाई खान्यातील खुराड्यात कत्तलीसाठी कोंबलेल्या कोंबड्यासारखी आहे ! जोपर्यंत दुसऱ्या कोंबडीची मान मोडली जात आहे तोपर्यंत खुराड्यातील प्रत्येक कोंबडी स्वतःला सुरक्षित समजत असते व डोळे बंद करून शांतपणे दाणे टिप...

मत कोणाला ?

  मत कोणाला ? दुर्जन होतील शिरजोर । आपुल्या मताचा मिळता आधार । सर्व गावांस करितील जर्जर । न देता सत्पात्री मतदान ॥ - तुकडोजी महाराज - प्रत्येक विवेकशील व सुज्ञास पडलेला गंभीर असा प्रश्न ! कि मत कोणाला ? चला मी तुमची थोडी मदत करतो ! आणि हो महत्वाचे म्हणजे हा लेख विवेकशील व सुज्ञ मतदारांसाठी आहे ! जात - धर्म - पंथ - प्रांत - भाषा अशा अनेक पशुतुल्य पाखंडी अस्मितांच्या आधारावर मतदान करणारे माझ्या लेखी विवेकशील व सुज्ञ नाही ! काही महत्वाची सूत्रे कायमची समजून घ्या ! राजकारण हा जगातील सगळ्यात गलिच्छ व्यवसाय असून त्याच्याशी सबंधित ९९ % लोक हे "सर्वअवगुणसंपन्न" भ्रष्ट आहे ! आपल्याला कमीत कमी "सर्वअवगुणसंपन्न " व्यक्तीची निवड करावयाची आहे जी आपले कमीत कमी शोषण करेल ! आजचे प्रमुख पक्ष म्हणजे कॉंग्रेस व भाजपा यांच्या जन्मदात्यांचे उद्देश कधीच धुळीस मिळाले असून आज  कॉंग्रेस जर ढोंगी धर्मनिरपेक्षतेच अपत्य आहे तर भाजपा पाखंडी राष्ट्रवादाच अपत्य आहे ! बाकीचे पक्ष हे कौटुंबिक मालकी हक्काचे प्रा.ली. मर्कटलीला कंपनी सारखे असून जास्त बहारदार फळे असलेला वृक्ष बघून ते इकडून तिकडे युत्या...