दिवस १५ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

दिवस १५ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

 

पातंजल

दिवस १५ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी

अध्याय २ : साधनपाद 

अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः॥२.३०॥

जातिदेशकालसमयानवच्छिन्नाः सार्वभौमा महाव्रतम्॥२.३१॥

शौचसंतोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः॥२.३२॥

वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम्॥२.३३॥

वितर्का हिंसादयः कृतकारितानुमोदिता लोभक्रोधमोहपूर्वका मृदुमध्याधिमात्रा दुःखाज्ञानानन्तफला इति प्रतिपक्षभावनम्॥२.३४॥

अध्याय २ : साधनपाद : सारांश

१) पाचवा यम म्हणजेच अपरिग्रह समजून घेवूया !

अनावश्यक असलेल्या विषयांचा व साधनांचा संग्रह न करणे म्हणजेच अपरिग्रह होय !

२) चित्त एकाग्र ह्या भूमीवर ध्येयाकार झालेले असता ते वृत्तीरहीतच असते ! त्यामुळे पाच यम सहजपणे पाळले जातात !

३) परंतु जाती, देश, काळ व समय ह्यापैकी कोणत्याही कारणामुळे मूढ, क्षिप्त, विक्षिप्त अवस्थेमधील चित्त हे पाच यम पालनामध्ये काही अपरीहार्य कारणामुळे त्रुटी राहू शकतात ! जर त्याही नाही राहिल्या तर हे महाव्रत आहे असेच म्हणावे लागेल !

४) शरीर  व मन स्वच्छ पवित्र राखणे यास शौच म्हणतात !

५) बाह्य शौच म्हणजेच शरीराची स्वच्छता यापेक्षा अंतरीक स्वच्छता  ही अधिक महत्वाची असल्याने त्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक आहे !

६ ) चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या राजस वृत्ती म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, असूया, ईर्ष्या, अहंकार ई. घोर वृत्ती आहे हा एक प्रकारचा मनाचा मल आहे !

७) अज्ञान, आळस, जडत्व, अवेळी झोप, प्रमाद, मूढत्व ह्या वृत्तींना तामस मूढ वृत्ती म्हणतात !

८) ह्या घोर आणि मूढ वृत्ती मनामध्ये विकार उत्पन्न करतात !

९) अतृप्तता हि मनुष्याच्या चित्तातील भोगाकडे प्रवृत्त करणारी मोठी प्रेरक शक्ती आहे !

१०) आपणास अनुकूल अशी जी साधने प्राप्त झालेली असतील त्यांचा अधिक उपयोग करून त्याहून अधिकाची इच्छा न करने म्हणजेच संतोष होय !

११) यम-नियमाचे पालन करत असताना व्यवहारात काही प्रसंग असे उद्भवतात कि त्या यम - नियमाच्या विरोधातील वासना मनात उत्पन्न होतात त्यास वितर्क असे म्हणतात ! 

१२) अशा अशुभ वासना चित्तात उत्पन्न झाल्या असता त्याकडे दुर्लक्ष अथवा त्या दडपून न टाकता त्यांना उज्वल वळण देण्याकरिता प्रतीपक्ष भावना उत्पन्न कराव्या ! त्या पुढील प्रमाणे !

ह्या संसाररुपी अग्नीत होरपळल्याने त्यापासून मुक्त होण्यासाठी मी योगधर्माचे पालन करीत आहे !

सर्व भूताना मजपासून अभय मिळावे, माझ्याकडून कुणालाही कोणत्याही प्रकारची पिडा होऊ नये म्हणून मी यम-नियमाचे पालन करीत आहे !

असे असताना माझ्या अध:पतनाला कारणीभूत वितर्कांचा जर मी स्वीकार केला स्वतः ओकून टाकलेले अन्न पुन्हा खाणाऱ्या कुत्र्यात व माझ्यात काय अंतर राहील ? 

विवेकबुद्धीने युक्त असा मनुष्यजन्म प्राप्त झाला असता श्वानासारखे वर्तन न करता समस्त वितर्कांचा पुरुषार्थाने विरोध करून यम-नियमांचे पालन करून उन्नत होत जाणे हेच माझे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे व त्यातच माहे परम कल्याण आहे !

१३) अशा भावना निर्माण केल्याने वितर्कांची तीव्रता कमी होते !  

१४) यम-नियमांचे पालन करत असताना उत्पन्न होणारे वितर्क हे कृत - कारित - अनुमोदित ह्या ३ प्रकारामध्ये मोडते !

१५) कृत म्हणजे स्वतः केलेले, कारित म्हणजे इतरांकडून करवून घेतलेले ! अनुमोदित म्हणजे परवानगी दिलेले !


Ganesh K Avasthi
Blog Admin
 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २  : समाधिपाद - साधनपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३

Post a Comment

2 Comments