Skip to main content

Posts

Showing posts with the label HOT

Ashirvad Ka Diya & 7.8 % GDP ! Happy Birthday Modiji ❤️

 

बोध >>> प्रथा - संस्कृती - परंपरा - व्रत - कर्मकांड - अनुष्ठान !

  बोध >>> प्रथा - संस्कृती - परंपरा - व्रत - कर्मकांड - अनुष्ठान ! https://x.com/rajhans__18/status/2096383677462880728 https://x.com/Shekharcoool5/status/2096275539703259374 https://x.com/PoojaUjagare/status/2096277068111917326 https://x.com/Sachin7852321/status/2094338008065454103 गावगुंडांच्या - मवाल्यांच्या ताब्यात गेलेल्या उत्सव व सोहळ्यांमध्ये तामाशातल्या बाया नाचणार नाही तर मग काय श्रीमद्भवद्गीतेच्या अध्यायांचे निरूपण होणार आहे काय ?  ८ वर्षाच्या लेकराने गडावर शॉर्टस घातली म्हणून कुटुंबाला मारहाण करणारे तथाकथित संस्कृती - धर्मरक्षक कधी धावा बोलताय मालकांच्या संस्थानावर ??? विवेकहीन - बोधहीन उन्मादी झुंडी, त्यांना आश्रय देणारी राजकीय मंडळी व राजकीय मंडळींचे वजन वाढवणारी मत विकणारी भ्रष्ट जनता यांच्या अभद्र युतीने कोणता सण - उत्सव - सोहळा विकृत झाल्याशिवाय राहणार आहे ? प्रत्येक सण - उत्सव - सोहळ्याचे विकृतीकरण - बाजारीकरण करून ठेवलाय ! सण - उत्सव - सोहळ्या मागचे उद्देश कधीच धुळीस मिळाले आहे ! प्रतिकूल परिस्थितीमधे समाजासाठी झटलेल्या प्रत्येक संवेदनशील पुरुषांच्या...

कोण म्हणत महागाई वाढली आहे ? कवीता | kon mhanat mahagai wadhli aahe ?

 

नितिन गडकरी बीफ एक्सपोर्ट विवाद क्या है ? तथ्यों के साथ समझे !

  नितिन गडकरी बीफ एक्सपोर्ट विवाद क्या है ? तथ्यों के साथ समझे ! गडकरी परिवार, रेम्बल एग्रो और मिथ्र इंटरनेशनल: चार्ट के अनुसार संबंध और विवाद ! हाल ही में सोशल मीडिया और कुछ मीडिया रिपोर्ट्स में नितिन गडकरी के परिवार से जुड़ी कंपनियों और बीफ (भैंस मांस) निर्यात कारोबार को लेकर चर्चा तेज हुई है ! विपक्ष ने इसे अपना हथियार बनाकर नितिन गडकरी के साथ ही भाजपा को निशाना बनाना शुरू किया है ! निर्भिड ने अपने तरीकेसे इस मुद्दे को समझा और वाचकों को निष्पक्षता से समझाने हेतु यह लेखप्रपंच किया है ! सबसे पहले फ्लो चार्ट को देखिये और समझने की कोशिश कीजिये !  क्या भारत गोमांस निर्यात करता है ? तो आपको यह स्पष्ट रूपसे स्पष्ट करते हुवे हम कहते है की नहीं भारत गोमांस निर्यात नही करता ! लेकिन FY 2024-25 में भारत ने लगभग  12,54,775 टन (1.25 मिलियन टन)  भैंस का मांस निर्यात किया ! इसकी कुल कीमत लगभग  $4.06 बिलियन  थी। लेकिन निर्भिड यह पूछना चाहता है की अगर यही सारे सबंध किसी गैर भाजपा मंत्री के होते तो भाजपा और तथाकथित गोरक्षक संघटनाये  इस मुद्दे को राजनितिक फायदे के लिए...

नाशिककर सावध व्हा !

  नाशिककर सावध व्हा ! भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या मध्य प्रदेश मधील इंदोर शहरातील भागीरथपुरा भागात आतापर्यंत ड्रेनेजयुक्त पाणी पिल्यामुळे १६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ! ११०० वर आजारी असल्याची नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे !  गेल्या अनेक दिवसापांसून येथील नागरिक दुषित पाण्याची तक्रार सबंधित विभागाकडे करत होते परंतु अत्यंत कार्यक्षम अशा मुर्दाड प्रशासनाने त्याची दखल काही घेतली नाही ज्यामुळे आज इतकी मोठी किंमत तेथील नागरिकांना चुकवावी लागली आहे ! ह्या प्रशासकीय हत्येला दाबण्यासाठी मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला  २ लाख रु. देवून व ४-५ अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचा फार्स करून वातावरण शांत करण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न करण्यात आला आहे व त्यात राज्य सरकार नक्कीच यशस्वी होईल यात मला शंका नाही ! कारण भारतीय समाज मानसिकता हि कसाई खान्यातील खुराड्यात कत्तलीसाठी कोंबलेल्या कोंबड्यासारखी आहे ! जोपर्यंत दुसऱ्या कोंबडीची मान मोडली जात आहे तोपर्यंत खुराड्यातील प्रत्येक कोंबडी स्वतःला सुरक्षित समजत असते व डोळे बंद करून शांतपणे दाणे टिप...

मत कोणाला ?

  मत कोणाला ? दुर्जन होतील शिरजोर । आपुल्या मताचा मिळता आधार । सर्व गावांस करितील जर्जर । न देता सत्पात्री मतदान ॥ - तुकडोजी महाराज - प्रत्येक विवेकशील व सुज्ञास पडलेला गंभीर असा प्रश्न ! कि मत कोणाला ? चला मी तुमची थोडी मदत करतो ! आणि हो महत्वाचे म्हणजे हा लेख विवेकशील व सुज्ञ मतदारांसाठी आहे ! जात - धर्म - पंथ - प्रांत - भाषा अशा अनेक पशुतुल्य पाखंडी अस्मितांच्या आधारावर मतदान करणारे माझ्या लेखी विवेकशील व सुज्ञ नाही ! काही महत्वाची सूत्रे कायमची समजून घ्या ! राजकारण हा जगातील सगळ्यात गलिच्छ व्यवसाय असून त्याच्याशी सबंधित ९९ % लोक हे "सर्वअवगुणसंपन्न" भ्रष्ट आहे ! आपल्याला कमीत कमी "सर्वअवगुणसंपन्न " व्यक्तीची निवड करावयाची आहे जी आपले कमीत कमी शोषण करेल ! आजचे प्रमुख पक्ष म्हणजे कॉंग्रेस व भाजपा यांच्या जन्मदात्यांचे उद्देश कधीच धुळीस मिळाले असून आज  कॉंग्रेस जर ढोंगी धर्मनिरपेक्षतेच अपत्य आहे तर भाजपा पाखंडी राष्ट्रवादाच अपत्य आहे ! बाकीचे पक्ष हे कौटुंबिक मालकी हक्काचे प्रा.ली. मर्कटलीला कंपनी सारखे असून जास्त बहारदार फळे असलेला वृक्ष बघून ते इकडून तिकडे युत्या...

Bham Dam PhotoGraphy 20-7-2025

 

हर नज्म उतारी नही जाती !

  हर नज्म उतारी नही जाती ! कुछ अफसानों को  अश्कों के दरिया  में डुबोकर पिया जाता है  हर धडकन के साथ ! 14-7-2025 Ganesh K Avasthi Blog Admin

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस ३

 श्रीमद्भगवद्गीता अध्याय २   सांख्ययोग  - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस ३  १ )  अस्तित्वात असलेल्या सर्वांस ज्याने व्यापले आहेत आणि आपल्या अनुभवास येणाऱ्या दृश्य जगताचे जे अधिष्ठान आहे ते म्हणजे सत. आकार, रंग वेगवेगळे असलेल्या वेगवेगळ्या मातीच्या भांड्याना त्यांच्या उपयोगितेनुसार किंवा त्यातील वस्तू नुसार वेगवेगळी नावे असतात तरीही त्या सर्वांमधील माती एकच असते आणि मातीशिवाय भांड्याचेअस्तित्व नसते. मातीतून ते उत्पन्न होतात माती त्यांचे अस्तित्व असते त्यांचा नाद झाल्यावर त्यांची नामेरूपे मातीशी एकरूप होतात. त्याचप्रमाणे परिवर्तनशील संपूर्ण जगत अपरिवर्तनशील सतस्वरूपाने व्यापलेले आहे. २ )  इंद्रिय-मन-बुद्धी ही ज्ञानग्रहणाची उपकरणे जड असतात आणि जीवनशक्ती चैतन्याकडून शक्ती मिळाल्यावर त्यांना विषय ज्ञान होऊ शकते. ३ )  प्रत्येकाने पराजयाची प्रवृत्ती सोडून जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीच्या परिस्थितीचा निष्ठापूर्वक धैर्याने सामना केला पाहिजे. अधर्माचा सक्रिय प्रतिकार हा श्रीकृष्णांचा गीतेतील मुख्य संदेश आहे. ४ )  जन्म-अस्तित्व-वृद्धी-विकार-क्...

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग - स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस २

  श्रीमद्भगवद्गीता अध्याय २  सांख्ययोग - स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस २  १ ) समजदार व श्रेष्ठ पुरुषामध्ये जे भाव निर्माण होतात ते आपल्या कल्याणाला अनुसरूनच होतात. २ ) कल्याणइच्छुक पुरुष प्रवृत्ती व निवृत्ती दोन्हीमध्ये आपल्या कल्याणाचाच उद्देश ठेवतात ! त्यांच्यात कर्तव्याच्या बाबतीत भीती निर्माण होत नाही ! ३ ) ३  प्रकारचे मनुष्य असतात ! १ = विचारशील ज्यांची आपले कल्याण व्हावे हि इच्छा असते २ = पुण्य करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा करणारे ३ = साधारण मनुष्य जगालाच सर्व काहीसंजून जगामध्ये कीर्ती - प्रतिष्ठा मिळावी हि इच्छा करणारे ! ४ ) जे महान असतात ते द्रव्याची ( संपत्ती ) कामना करूच शकत नाही, जे द्रव्याची कामना करतात ते महान असूच शकत नाही ! ५ ) वाईट गोष्ट जर वाईटाच्या रूपानेच आली तर ती नष्ट करण्यास सोपी जाते, परंतु वाईट गोष्ट चांगुलपणाचे पांघरून घेऊन येते तिला नष्ट करणे सोपे नसते ! ६ ) केवळ भौतिक दृष्टी ठेवून कल्याणचा विचार येऊ शकत नाही !   ७ )  मनुष्य चिंतेने व शोकाने जेव्हा विव्हळ होतो तेव्हा तो कर्तव्य - अकर्तव्य याचा बोध न झाल्याने काहीही बरळत असतो ! ८...

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस २

  श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग  - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस २ १ )जीवनातील परिस्थितींना आपल्यावर चाल करून देणे म्हणजे सर्व प्रसंगात आपल्या घातकी अपयशाची निश्चिती करण्यासाठी आहे. २ )कोणी लेचापेचा मनुष्यच परिस्थितीला स्वतःवर मात करू देतो आणि बाह्य परिस्थितीचा गुलाम बनतो. ३ )जीवनाची घडी यथायोग्य आखलेली असते तेव्हा अगदी प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा यशदायी अनुकूल  परिस्थितीत बदलता येते जीवनाच्या खडकाळ अशा मार्गावरून आपली गाडी सुबुद्ध व्यक्ती किती कौशल्याने हाकतो यावर सर्वकाही अवलंबून असते. ४ )जेव्हा आपला अहंकार अधिक व्यापक होऊन सेना आदर्श तत्त्व देश किंवा युगाशी तादात्म्य पावतो तेव्हा आपल्या नैतिक दुर्बळता क्षय पावतात. ५ )पूर्ण नैतिकतेचे जीवन अशाच व्यक्तीकडून जगले जाते ज्याने आत्मस्वरूपाची तादात्म्य साधले आहे जे एकमेव द्वितीय सर्वव्यापी सर्व नामरूपांमध्ये व्याप्त आहे. ६ )पूर्ण नैतिकतेचे जीवन अशाच व्यक्तीकडून जगले जाते ज्याने आत्मस्वरूपाची तादात्म्य साधले आहे जे एकमेव द्वितीय सर्वव्यापी सर्व नामरूपांमध्ये व्याप्त आहे. ७ )एकदा का आपण परिस्थितीचे चुकीचे मूल्यांकन के...

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १ अर्जुनविषादयोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस १

  श्रीमद्भगवद्गीता अध्याय १  अर्जुनविषादयोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस १  १ ) आपले हेतू जर अशुद्ध व अन्यायकारक असतील तर आपण कितीही सुसज्ज असलो तरी आपले मन निश्चितच साशंक व क्षुब्ध होते ! २ ) स्वतः केलेल्या पापकर्मामुळे अपराधीपणाच्या दडपणाने ज्याचे नीतिधैर्य पार खचून गेले आहे त्याच्या बोलण्यामध्ये साहजिकच ताळतंत्र राहत नाही ! अशा प्रचंड तणावाखाली जेव्हा मनुष्य असतो तेव्हा त्याच्या मनाची खरी सांस्कृतिक पातळी दिसून येते ! ३ ) ज्याच्या मनामध्ये नीच हेतू आहेत व ज्याचे वर्तन कपटी आहे त्याच्या मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक असते ! ४ ) जेव्हा आपण स्वतः चांगले नसतो तेव्हा आपला सगळं दुष्टपणा व वाईटपणा आपण आपल्या कनिष्ठांवर लादत असतो ! ५ ) स्वतःच्या दुबळेपणास सोईस्करपणे काहीतरी पवित्र नाव देऊन त्याचे कौतूक करत राहणे हि मानवी प्रवृत्ती  असते ! एखाद्या श्रीमंत माणसाने स्वतःच्या नावाने देऊळ बांधले कि त्याच्या त्या पोकळ अहंमान्यतेला दानधर्म असे चुकीचे नाव दिले जाते ! ६ )  मनोव्याधीं रुग्णाला जेव्हा बोलू दिले जाते तेव्हा त्याच्या व्याधीचे कारण तो नेमका नकारात्मक भाष...

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १ अर्जुनविषादयोग - स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस १

 श्रीमद्भगवद्गीता अध्याय १  अर्जुनविषाद योग  स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस १  १ ) संसारात प्रामुख्याने भूमी ,  धन ,  स्त्री या ३  गोष्टीसाठीच लढाया होतात ! २ ) कोणतेही कर्म धर्माला अनुसरुनच करावे ! ३ ) जे भाव अंतकरणात असतात तेच वाणीतून प्रकट होतात ! ४ ) द्वैत भावनेनेंच आपसात प्रेम - स्नेह राहत नाही ! ५ ) ज्याच्याशी आपली विशेष प्रीती नाही त्याच्याकडून आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मनुष्य त्याला जास्त आदर देऊन खुश करतो ! ६ ) अधर्मी - अन्यायी - पापी व्यक्ती कधीही निर्भय आणि सुख शांतीयुक्त राहू शकत नाही ! ७ ) ज्यांच्या ठिकाणी नाशवंत धन - संपत्तीचा आश्रय आहे व ज्यांच्या हृदयात अधर्म -अन्याय - दुर्भावना आहे ते बलहीन असतात व अंतःकरणातून घाबरलेले असतात ! ८ ) भौतिक सुखांना महत्व देऊन आणि संयोगजन्य सुखाच्या प्रलोभनात फसून कधीही अधर्माचा आश्रय घेऊ नये ! ९ ) आपणाकडून आपल्या शरीर - मन - वाणी याद्वारे कधीही अन्याय व अधर्म होऊ देऊ नये कारण याने आपले हृदय बलहीन होते ! १ ० )   मनुष्य कोठेही असो कोणत्याही परिस्थितीमध्ये असो त्याच प्राप्त स्थितीमध्ये राहून ...