बोध >>> प्रथा - संस्कृती - परंपरा - व्रत - कर्मकांड - अनुष्ठान !
गावगुंडांच्या - मवाल्यांच्या ताब्यात गेलेल्या उत्सव व सोहळ्यांमध्ये तामाशातल्या बाया नाचणार नाही तर मग काय श्रीमद्भवद्गीतेच्या अध्यायांचे निरूपण होणार आहे काय ?
८ वर्षाच्या लेकराने गडावर शॉर्टस घातली म्हणून कुटुंबाला मारहाण करणारे तथाकथित संस्कृती - धर्मरक्षक कधी धावा बोलताय मालकांच्या संस्थानावर ???
विवेकहीन - बोधहीन उन्मादी झुंडी, त्यांना आश्रय देणारी राजकीय मंडळी व राजकीय मंडळींचे वजन वाढवणारी मत विकणारी भ्रष्ट जनता यांच्या अभद्र युतीने कोणता सण - उत्सव - सोहळा विकृत झाल्याशिवाय राहणार आहे ?
प्रत्येक सण - उत्सव - सोहळ्याचे विकृतीकरण - बाजारीकरण करून ठेवलाय ! सण - उत्सव - सोहळ्या मागचे उद्देश कधीच धुळीस मिळाले आहे !
प्रतिकूल परिस्थितीमधे समाजासाठी झटलेल्या प्रत्येक संवेदनशील पुरुषांच्या जयंती मध्येदेखील तेच !
जेव्हा महान, उच्च विचार - उद्देशापर्यंत पोहोचण्याचा आपला वकुब नसतो तेव्हा त्या विचार - उद्देशासाठी निर्मित केल्या गेलेल्या गोष्टींनाच आपल्या स्तरावर आणण्यासाठी तत्पर विवेकहीन - बोधहीन झुंडी ह्या सर्वच समाजामध्ये पाहायला मिळतात !
आंतरिक अस्वस्थता - दुःख - असुरक्षितता जितकी अधिक तितकाच सोहळा - उत्सवांमधील उन्माद अधिक !
बोध >>> प्रथा - संस्कृती - परंपरा - व्रत - कर्मकांड - अनुष्ठान !
गणेश अवस्थी
६-९-२०२६


0 Comments