Posts

Showing posts from March, 2020

दंगलीचे मुखवटेधारी पालक !

दंगलीचे मुखवटेधारी पालक ! कोणतीही दंगल एका दिवसात होते का ? तर नाही, प्रत्येक दंगलीमागे एक नियोजन असते व  दंगल माजवणाऱ्यांचे चेहरे चित्रीकरण-चित्र यांच्या माध्यमातून आपल्या समोर येत जरी असले तरी ते फक्त अभिनेते असतात ! दंगलीचे पालकत्व - निर्माते - कथालेखक -   दिग्दर्शक कोण असतात ? दिल्लीत सामान्य जनतेच्या जीविताची - मालमत्तेची हानी झाली त्याला कोण जबाबदार ? ह्या समस्त प्रकाराला आपल्या बालवयात पाहणाऱ्या कोणत्याही जाती धर्माच्या मुलांच्या मनावर खोलवर एक द्वेषाचा विचार रोवल्यामुळे भविष्यात होणाऱ्या परीणामांची जबाबदारी कुणाची ? ह्या दंगलीचे मूळ कोठे आहे ? भाजप सरकारने संविधानिक मार्गाने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा ! हा कायदा खरच भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व हिरावून घेतो का ? ह्या जेमतेम 3 पानी मसुद्यातील तरतुदी न समजण्याइतक्या क्लिष्ट आहेत का ? तर नाही त्या मुळीच क्लिष्ट नाही ! जर मसुदा समजण्यासाठी क्लिष्ट नाहीये तर गेल्या 3 महिन्यापासून देशभरात इतक्या मोठ्या प्रमाणात गढूळ वातावरण निर्मिती केली गेली ती कशासाठी व कुणी ? 3 महिन्यापासून संपूर्ण देशाला अस्थिरत