What is Stock Dividend ? How Stock Dividend works ? भारत पारंपरिकरित्या एक असा देश आहे जिथे जास्तीत जास्त लोकसंख्या ही पैसे गुंतवण्यापेक्षा बचत करण्यावर जास्त विश्वास ठेवते ! परंतु हळूहळू हि परिस्थिती बदलत आहे ! भारतात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि आता सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनता पैसे वाचविण्यासोबतच गुंतवणुकीकडे पण लक्ष द्यायला लागले आहे ! शेअर मार्केट म्हणजे जुगार ह्या धारणेतून हळूहळू का होईना भारतीय जनता बाहेर येत असून पूर्णवेळ शेअर मार्केट मधेच काम करून पैसे कमविणाऱ्यांच्या संख्येतदेखील वाढ होतांना दिसून येत आहे ! विशेषकरून कोरोना महामारी नंतर सर्वच वयोगटातील लोकसंख्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ? कोणत्या कंपनीच्या शेअरचा आजचा भाव काय आहे ? कोणता म्यूचअल फंड सर्वात चांगला आहे ? म्यूचअल फंड घ्यावा कि एस.आय.पी (SIP - systematic investment plan) ? अशा शेअर मार्केट संबंधीच्या चर्चा जागोजागी करतांना दिसत आहे ! परंतु आवश्यक अशा माहितीच्या अभावामुळे आजही नवीन गुंतवणूकदार हा आपले नुकसान करून घेतांना दिसत आहे हेदेखील तितकेच खरे आहे ! कोणत्या...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !