निरोपाचा खेळ अपूर्ण, पण देशाच्या सुरक्षेचा इशारा कायम: एका योद्ध्याची सडेतोड निवृत्ती ! निरोपाचा खेळ अपूर्ण, पण देशाच्या सुरक्षेचा इशारा कायम: एका योद्ध्याची सडेतोड निवृत्ती! एखाद्या मोठ्या लष्करी अधिकाऱ्याची निवृत्ती म्हटली की, शानदार संचलन, औपचारिक सन्मान आणि एखाद्या निवांत गोल्फच्या खेळाचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. ३१ ऑक्टोबरला निवृत्त होणारे भारताचे हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांच्यासाठीही, पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या लोक कल्याण मार्गावरील 'एअर फोर्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स'मध्ये अशाच एका गोल्फच्या डावाचे नियोजन करण्यात आले होते. सोमवारपासून हा १८-होलचा गोल्फ कोर्स अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आणि एका दिग्गजाचा निरोपाचा खेळ अनपेक्षितपणे रद्द झाला. एअर फोर्स गोल्फ कोर्सच्या जागेवर ताबा मिळवण्याच्या सरकारच्या कारवाईपेक्षाही, या कारवाईसाठी निवडलेल्या 'वेळेवरून' (Timing) आता अनेक प्रश्न आणि संशय निर्माण होऊ लागले आहेत. ३१ ऑक्टोबरला निवृत्त होणारे हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांच्या निरोपाचा पारंपरिक गोल्फ खेळ नेमका याच लोक कल्याण मार्गावरील 'एअ...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !