Posts

" संजू " चे वास्तव !

Image
!! पार्श्वभूमी !!
दिनांक : १२ मार्च १९९३ वेळ : दु. १.३० ठिकाण : मुंबई स्टॉक एक्सचेंज
आर्त किंकाळ्या, सगळीकडे रक्ता-मांसाचा सडा, एका क्षणात होत्याच नव्हत आणि या मृत्युच्या थैमानाची मालिकाच सुरु झाली. दु.१.३० पासून ते दु.३.४० पर्यंत देशाच्या आर्थिक राजधानीला हादरवणारे व देशाच्या सुरक्षेला अवाहन देणारे असे १२ बॉम्बस्फोट घडवले गेले, मच्छीमार चाळ, झवेरी बाजार, प्लाजा सिनेमा, सेंचुरी बाज़ार, कथा बाज़ार, होटल सी रॉक, सहार विमानतळ, एयर इंडिया बिल्डिंग, हॉटेल जुहू सेंटूर, वरळी, मुंबई पासपोर्ट कार्यालय ह्या सगळ्या ठिकाणी मृत्यूने नंगानाच केला ज्यात तब्बल २५७ बळी व १४०० वर गंभीर जखमी झाले. देशात प्रथमच ३००० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात RDX चा वापर करून देशाविरूद्ध उघड उघड युद्धच पुकारले गेले होते. ज्यांच्या सैतानी डोक्याचा हा खेळ होता ते हा देश सोडून कधीच पळून गेले होते. टायगर मेमन / याकुब मेमन / दाऊद इब्राहीम / दाऊद फणसे हे ह्या कटाचे मुख्य सूत्रधार होते व यांनी पाकिस्तानच्या ISI ह्या गुप्तचर संस्थेशी हातमिळवणी करून देशद्रोहाची परिसीमा गाठली होती. मृत – जखमी व्यक्तीचे घरदार उध्वस्त झाले, पै-पै करू…

"एकीचे बळ" विस्मृतीत गेलेली कथा !

Image
लहानपणी जवळपास सगळ्यानीच एक गोष्ट वाचली-ऐकली असेल, त्या गोष्टीचे नाव होते एकीचे बळ ! गोष्ट खुपच साधी अणि सोपी होती परंतु दुर्दैवाने बहुतेक सामान्यजन ती गोष्ट साफ विसरलेले दिसत आहेत. परंतु एक असा वर्ग आहे ज्याने ह्या गोष्टीचा खुप उत्तमरीत्या अभ्यास केला आहे व् त्याचा वापर तो वर्ग आपले हित साधन्यासाठी वर्षो न वर्षो करत आहे. तो वर्ग म्हणजे “राजकीय नेत्यांचा वर्ग”
आता राजकीय म्हटल तर त्यात प्रत्येक पक्षाचा समावेश होतो हे पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्याने समजुन घ्यावे ! लेखकाचा पक्ष शोधायची तसदी घ्यावी लागु नए म्हणून आधीच नमूद केल !
गोष्ट काय होती ? एक काठी तुटायला सोपी असते, २ थोड्या अवघड, ३ अजुन अवघड, जशा-जशा काठ्या एकत्र बांधणार तस-तशा त्या तुटायला अवघड जातात ! बोध होता एकीचे बळ !
आपण सर्व सामान्य मतदार ( जे कुठल्याही पक्ष-संघटना-जातीय/धार्मिक संघटना यांचे सदस्य नाहीं ) हे विखुरलेल्या काठ्याप्रमाणेच आहोत व् आपण तसेच रहावे हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या हिताचे आहे. म्हणुनच तर आपण सर्व जात-धर्म-भाषा-प्रांत-व्यवसाय-शिक्षण ह्या सारख्या भावनिक मुद्द्यांवर कायम एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून …

हे उल्हासनगरचे अधिकारी-कर्मचारी प्रसिद्ध झालेच पाहिजे !

हे उल्हासनगरचे अधिकारी-कर्मचारी प्रसिद्ध झालेच पाहिजे  !


EVM - तोंड लपवायची जागा !

Image
भारतीय लोकांना conspiracy theories (कटकारस्थान कथा) मधे विशेष रुचि आहे, आणि आपल्या काही अत्यंत धूर्त राजकारणी / पत्रकार लोकांना याचा वापर आपल्या स्वार्थाला साधन्यासाठी कसा करायचा हे चांगलेच अवगत आहे ! 
२०१४ नंतरच्या भाजपच्या प्रत्येक विजयानंतर जनतेमधे भ्रम पसरवण्यासाठी EVM छेडछाडचे रडगाणे गायले जाते. परंतु ज्या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला तिथे मात्र ह्या सगळ्यांना आपल्या कर्तुत्वाचे गुणगान करता करता वेळ पुरत नाही ! 
ह्या सगळ्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग जेव्हा समस्त बुद्धिवंत लोकांना आवाहन करते तेव्हा हे सगळे पळवाटा शोधून त्यालाही नकार देतात !

अर्थात भाजपनेही कांग्रेस सत्तेत असतांना एकदा हेच रडगाणे गायले होते, परंतु त्यातला फोलपणा लक्षात आल्यानंतर त्यांनी तो नाद सोडून दिला !

असो आपला महत्वाचा विषय आहे की खरच EVM सोबत छेडछाड होऊ शकते का आणि याचे उत्तर फक्त “एक भारतीय” म्हणून शोधायचे असेल तर आधी निष्पक्ष होऊन पूर्ण लेख वाचावा लागेल !      
EVM सोबत छेडछाड होऊ शकते का हे समजुन घेणं व सर्वांना समजावून सांगण त्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आणि कर्तव्य आहे जो ह्या देशाच्या संविध…

फिटे अंधाराचे जाळे !

Image
ह्या हसऱ्या चेहऱ्यांकडे पाहिल्यावर ह्या ओळी नाही आठवल्या तरच नवल ! कारण काय आहे ह्या हसऱ्या चेहऱ्यामागचे ? अहो स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षा नंतर ह्यांना वीज बघायला मिळतेय ! हे काही फोटो आहेत कारगिल मधील व काही उत्तर प्रदेशच्या हरदोई तहसीलच्या ठाकुरी खेड्यातील. शहरी भागात २ तास लोड शेडींग झाल्यानंतरचा आपला त्रागा आठवा ! ह्या लोकांनी तर यांची पूर्ण १ पिढीच विजेविना घालवलीये ! विजेची जी परिस्थिती तीच दोन वेळच्या अन्नाची, रस्त्यांची, पाण्याची, शिक्षणाची व डोक्यावरील छपराची ! 
शाळेत शिकवल्या जाणाऱ्या मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तता कुठवर झाली याची चिकित्सा आपल्या मागच्या पिढ्यांनी जर केली असती तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी राहिली असती ! जी चुकी मागच्या पिढ्यांनी केली ती आजची पिढी नक्कीच करणार नाही अशी अपेक्षा ठेवूया ! मागच्या पिढ्यांना दोष देणे कदाचित बहुतेक जणांना पचनी पडणार नाही, पण देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवता हा दोष मागच्या पिढ्यांच्या माथ्यावरच टाकावा लागेल. आंधळ्या विश्वासाने कोणत्याही स्वार्थाशिवाय एका पक्षाच्या ( घराण्याच्या ) हातात देशाची सत्ता सोपवताना त्यांनी आपल्या भविष्याच…

बाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा !

Image
बाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा !
सर्वात प्रथम १३ वर्षीय बाजी राउत व त्यासोबत शहीद झालेले लक्ष्मण मलिक, फागू साहू, हर्षी प्रधान, नाता मलिक यांना शत शत नमन ! 
आज आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी“राष्ट्रप्रेम” ह्या अत्यंत पवित्र भावनेतून कित्येकानी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे ! त्यातील कित्येकांना योग्य तो सन्मान मिळाला, परंतु अधिक प्रमाणात अनेकांच्या पदरी फक्त उपेक्षाच पडली हे स्वातंत्र्यउत्तोर काळात सिद्ध झाले आहे. असाच एक उपेक्षित राहिलेला १३ वर्षीय क्रांतिकारक बाजी राउत, भारतातील सर्वात लहान हुतात्मा ! ज्याने अवघ्या १३ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली !
१९२५ साली ओरिसातील निलकंठपूर जिल्ह्यातील ढेंकानाल गावात बाजी राउतचा जन्म झाला. बाजी लहान असतांनाच त्याचे वडील हरिप्रसाद राउत यांचे निधन झाले, त्या पश्चात बाजीच्या आईने अत्यंत हलाखीमध्ये बाजीचे संगोपण केले. आईला मदत म्हणून बाजी लहान वयातच ब्राह्मणी नदीवर नौका वाहकाच काम करू लागला. लहानपणापासूनच बाजी आपल्या ढेंकानाल संस्थांनच्या राजाचा ( शंकर प्रताप सिंघ देव ) प्रजेवर होत असलेल्या निर्दयी अन्यायाला पाहत आला होता, व …

सीडीयुक्त राजकारण !

Image
सध्या गुजरात निवडणुकिच्या रणधुमाळीत “प्रसार माध्यमांच्या” मते निवडणुकीला कलाटणी देणारी घटना ह्या विषयावर बरीच चर्चासत्र झोडली गेली-जाताय ! विषय आहे हार्दिक पटेल याची CD ! इथे काही विषय मुद्दाम मांडणे गरजेचे आहे.
१)हार्दिक पटेल याला फार मोठा जनाधार आहे हेही प्रसार माध्यमांचच गुऱ्हाळ आहे ! त्याचा जनाधार वेळोवेळी गुजरातच्या प्रत्येक निवडणुकीत सिद्ध झालाय ! तेव्हा त्याची उघडकीस आलेली सीडी म्हणजे निवडणुकीला कलाटणी ही केवळ मल्लीनाथीच आहे ! प्रसारमाध्यमे व विरोधक ह्याला निवडणूकीचा मुद्दा बनवताय ह्यावरूनच त्यांना असलेला विकासाचा प्रामाणिक ध्यास अधोरेखित होतो !
२)हार्दिक पटेलच्या ४ भिंतीमध्ये चालू असलेल्या गोष्टीला निवडणुकीचा मुद्दा तोपर्यंत नाही बनवायला हवा जोपर्यंत त्या गोष्टींचा राज्याच्या कारभारावर काही परिणाम पडत नाही व तथाकथित स्त्री त्याची तक्रार दाखल करत नाही ! “बाईलवेडा” असण ही त्याची वैयक्तिक निवड आहे ! एका मोठ्या समाजाला परिणामकारक आंदोलनासाठी तयार करून त्यांच नेतृत्व करत असतांना त्यासाठी हार्दिक किती अपरिपक्व आहे हेच वेळोवेळी सिद्ध झालय ! ( त्याचे आंदोलनाचे हेतू हा वेगळा विषय ) ह्या…