Skip to main content

Posts

Showing posts with the label प्रदूषण

भारतीयांच्या फुफ्फुसांची सहनशक्ती आठपट जास्त आहे का?

  भारतीयांच्या फुफ्फुसांची सहनशक्ती आठपट जास्त आहे का? प्रदूषणाच्या मर्यादेवरून सरकारला काही प्रश्न! भारतात PM2.5 प्रदूषणाची वार्षिक राष्ट्रीय मर्यादा 40 µg/m³ आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ती 5 µg/m³ निश्चित केली आहे. म्हणजे भारताचे राष्ट्रीय मानक WHO च्या आरोग्याधारित मार्गदर्शक मर्यादेपेक्षा आठपट जास्त आहे. हा केवळ आकड्यांचा फरक नाही; तो आपल्या सार्वजनिक आरोग्यविषयक धोरणांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करतो. आपण विकासाच्या गोष्टी करतो. मोठे रस्ते, उंच इमारती, औद्योगिक प्रकल्प, मेट्रो आणि पायाभूत सुविधांची चर्चा करतो. मात्र या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेत माणसाला श्वास घेण्यासाठी मिळणारी हवा किती स्वच्छ आहे, याकडे आपले पुरेसे लक्ष आहे का? आज भारतातील अनेक शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये प्रदूषणाच्या बातम्या वारंवार समोर येतात. मात्र या समस्येकडे पाहताना एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो—भारताने हवेच्या गुणवत्तेसाठी निश्चित केलेली मानके जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक मर्यादांपेक्षा एवढी वेगळी का आ...