दिवस २३ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ४ : कैवल्यपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी अध्याय ४ : कैवल्यपाद १) योगशास्त्राने मनाचे सामर्थ्य मानवांना पटवून दिले आहे ! मानवी मनात सामर्थ्याच्या ज्या ज्या म्हणून इच्छा उत्पन्न होण्याजोग्या आहे त्या सर्व परिपूर्ण करण्याचे मार्गही सांगितले आहे ! जन्म - औषध - मंत्र - तप - समाधी ह्या पंच कारणांपासून सिद्धीसामर्थ्य ( मनाचे सामर्थ्य ) प्रकट होऊ शकते ! २) मनुष्याला देह प्रकृतीकडूनच पुरविला जातो, मात्र त्यास वर्तनस्वातंत्र्य अधीक असल्याने त्याने केलेले योग्य आचरण व अयोग्य आचरण हे त्याच्या चित्तवृतींच्या पुढील जन्मासाठी निम्मित्तकारण ठरत असते ! ३) साधकाने प्रकृतीतील अप्कृष्ट विकारांचा आपणास संसर्ग होणार नाही याची दक्षता घेणे अपरिहार्य आहे ! यासाठी योग शास्त्रात सांगितलेल्या यम-नियमांचे पालन केले गेले पाहिजे ! ४) विषयांचे सेवन घडतांना चित्तात क्लेश नांदत असतात व ह्यामुळे विषयांचा उपभोग घेत असता " हा विषय किती सुखप्रद आहे, ह्या विषयाचा नाश कधीही न होवो, माझे हे सुख उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो !...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !