श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग - स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस २
१ ) समजदार व श्रेष्ठ पुरुषामध्ये जे भाव निर्माण होतात ते आपल्या कल्याणाला अनुसरूनच होतात.
२ ) कल्याणइच्छुक पुरुष प्रवृत्ती व निवृत्ती दोन्हीमध्ये आपल्या कल्याणाचाच उद्देश ठेवतात ! त्यांच्यात कर्तव्याच्या बाबतीत भीती निर्माण होत नाही !
३ ) ३ प्रकारचे मनुष्य असतात ! १ = विचारशील ज्यांची आपले कल्याण व्हावे हि इच्छा असते २ = पुण्य करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा करणारे ३ = साधारण मनुष्य जगालाच सर्व काहीसंजून जगामध्ये कीर्ती - प्रतिष्ठा मिळावी हि इच्छा करणारे !
४ ) जे महान असतात ते द्रव्याची ( संपत्ती ) कामना करूच शकत नाही, जे द्रव्याची कामना करतात ते महान असूच शकत नाही !
५ ) वाईट गोष्ट जर वाईटाच्या रूपानेच आली तर ती नष्ट करण्यास सोपी जाते, परंतु वाईट गोष्ट चांगुलपणाचे पांघरून घेऊन येते तिला नष्ट करणे सोपे नसते !
६ ) केवळ भौतिक दृष्टी ठेवून कल्याणचा विचार येऊ शकत नाही !
७ ) मनुष्य चिंतेने व शोकाने जेव्हा विव्हळ होतो तेव्हा तो कर्तव्य - अकर्तव्य याचा बोध न झाल्याने काहीही बरळत असतो !
८ ) जेव्हा मनुष्य संसारातील प्राणी - पदार्थांचे दोन विभाग करतो तेव्हा त्याला शोक होतो. जसे हे माझे आहेत , हे माझे नाही , हे आमच्या आश्रमाचे आहेत व हे आमच्या आश्रमाचे नाही , हे आमचे कुटुंबीय आहे , हे आमचे कुटुंबीय नाहीत,हे आमच्या वर्णाचे आहेत हे आमच्या वर्णाचे नाही ई . तो ज्यांना आपलॆ मानतो त्यांच्याविषयी कामना , ममता , आसक्ती , प्रियता निर्माण होते ! या ममता , कामना , आसक्ती इत्यादींनींच शोक, चिंता , भय , उद्वेग , चलबिचल , संताप इत्यादी दोष उत्पन्न होतात ! असा कोणताही दोष - अनर्थ नाही जो ममता, कामना , आसक्ती ई . पासून निर्माण होत नाही !
९ ) संसाराचा आश्रय घेतल्याने शोक होतो, अनन्य भावाने ईश्वराचा आश्रय घेतल्याने शोक-चिंता नष्ट होतात !
१ ० ) संसारात केवळ दोन पदार्थ आहेत ! सत व असत , शरीरी व शरीर. यापैकी शरीरी अविनाशी आहे आणि शरीर विनाशी आहे ! हे दोन्ही शोक करण्यायोग्य नाही. अविनाशीचा कधी विनाश होत नाही व विनाशीचा विनाश अटळ आहे ! दोहोंविषयी शोक होणे असंभव असून शोक होण्यास केवळ अज्ञान कारण आहे !
१ १ ) मनुष्या समोर जन्मने-मरणे लाभ-हानी इत्यादी रुपात जी काही परिस्थिती प्राप्त होते ती प्रारब्धाचे अर्थात आपण केलेल्या कर्माचे फळ आहे. त्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीसंबंधी शोक करणे सुखी दुखी होणे केवळ मूर्खपणाचे लक्षण आहे.
१ २ ) परिस्थिती अनुकूल प्राप्त हो अथवा प्रतिकूल त्याचा आरंभ आणि अंत होतो. अर्थात ती परिस्थिती पूर्वीही नव्हती आणि शेवटी ही राहणार नाही. जी परिस्थिती पूर्वी आणि शेवटी नसते ती मध्यातही एक क्षण स्थायी राहत नाही. जर स्थायी असती तर नाहीशी कशी होते आणि नाहीशी होतीये तर तिला स्थायि कसे म्हणता येईल ? अशा क्षणाक्षणाला नाहीशा होणाऱ्या अनुकूल प्रतिकूल परिस्थिती विषयी हर्ष किंवा शोक करणे सुखी दुखी होणे केवळ मूर्खपणा आहे.
१ ३ ) कर्तव्य चिंतेचा विषय नसतो तर विचारांचा विषय असतो. विचाराने कर्तव्याचा बोध होतो आणि चिंतेने विचार नष्ट होतो !
१ ४ ) सत - असत चा विवेक करणाऱ्या बुद्धीचे नाव पंडा आहे. ती पंडा ज्याची विकसित आहे अर्थात ज्यांना सत व असतचा स्पष्ट विवेक झाला आहे तेच पंडित आहे. अशा पंडितांना सत-असत पदार्थ विषयी शोक होत नाही.
0 Comments