दिवस २३ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ४ : कैवल्यपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर
सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी
अध्याय ४ : कैवल्यपाद
१) योगशास्त्राने मनाचे सामर्थ्य मानवांना पटवून दिले आहे ! मानवी मनात सामर्थ्याच्या ज्या ज्या म्हणून इच्छा उत्पन्न होण्याजोग्या आहे त्या सर्व परिपूर्ण करण्याचे मार्गही सांगितले आहे ! जन्म - औषध - मंत्र - तप - समाधी ह्या पंच कारणांपासून सिद्धीसामर्थ्य ( मनाचे सामर्थ्य ) प्रकट होऊ शकते !
२) मनुष्याला देह प्रकृतीकडूनच पुरविला जातो, मात्र त्यास वर्तनस्वातंत्र्य अधीक असल्याने त्याने केलेले योग्य आचरण व अयोग्य आचरण हे त्याच्या चित्तवृतींच्या पुढील जन्मासाठी निम्मित्तकारण ठरत असते !
३) साधकाने प्रकृतीतील अप्कृष्ट विकारांचा आपणास संसर्ग होणार नाही याची दक्षता घेणे अपरिहार्य आहे ! यासाठी योग शास्त्रात सांगितलेल्या यम-नियमांचे पालन केले गेले पाहिजे !
४) विषयांचे सेवन घडतांना चित्तात क्लेश नांदत असतात व ह्यामुळे विषयांचा उपभोग घेत असता " हा विषय किती सुखप्रद आहे, ह्या विषयाचा नाश कधीही न होवो, माझे हे सुख उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो ! ह्या विषयउपभोगाच्या आड कसलीच विघ्ने न येवोत ! हे अनेकविध सुख मला मिळत आहे तस्मात मी धन्य आहे, अशा प्रकारच्या अविद्यामुलक अनेक वृत्ती चित्तात उमटत असतात ! यामुळे व्यक्ती त्याच विषयाकडे अधिक प्रबळपणे ओढला जातो ! ह्यास कर्माशय म्हणतात जो जाती - आयुष्य - भोग ह्यास उत्पन्न करणारा असतो !
५) मी देहरूप असून मी नित्य असावे, मला मरण नसावे असे सर्व जीवांना नेहमी वाटत असते ! यालाच महामोहरूप " आशी: " हि संज्ञा आहे !
६) वासना असंख्य जरी असल्या तरी त्यांचे सामान्य स्वरूप एकप्रकारचेच असते. "मला सुख पाहिजे, दु:ख कधीही नको, आणि म्हणून मला सुखसाधने मिळावीत व ती मिळाल्यावर त्यांचा वियोग होऊ नये व दु:खकारक गोष्टी मजपासून दूर राहव्यात" हे सर्व वासनांचे सामान्य स्वरूप होय !
७) द्रष्टा जीव तत्वत: सुखस्वरूप असताना त्याला आपल्या सुखरुपतेचे विस्मरण होवून त्याने अनित्य, अशुची, दु:खरूप आणि अनात्मभूत देहादिकाना आत्मा समजणे हीच अविद्या होय ! ह्याच अविद्येतून अस्मिता, राग-द्वेष, अभिनिवेश तयार होत असतात !
८) राग-द्वेषानी प्रेरित होवून मनुष्य शुभ-अशुभ कर्मास प्रवृत्त होतो ! हि कर्मे करत असतांना कोणाचा निग्रह करणे व कोणावर अनुग्रह करणे अपरिहार्य होते ! यामुळे धर्माधर्माचा संचय होत जातो ! ह्या संचयामुळे विविध योनीमध्ये जन्म प्राप्त होतो ! येथे पूर्वीचे वासनांचे संस्कार पुन: जागृत होतात व मागील कथा पुन: सुरु राहते ! ह्या सगळ्या कथांचा म्हणजेच वासनांचा अंत हा आत्मसाक्षात्काराशिवाय शक्य नाही !
९) गुण जरी ३ असले तरी त्यांपैकी एकच गुण प्रधान असतो व बाकी दोन त्याचे सहकारी बनतात !
१०) रोगादिकांनी पिडलेले सात्विक जन आपल्या आर्तीच्या शमनार्थ लौकिक उपायांसोबतच यमनियम अशा यौगीक अष्टांगाच्या अनुष्ठानाकडे वळतात ! स्वत:च्या सुखोपभोगासाठी किंवा जनहितार्थ काही सिद्धी प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने योगाचा आश्रय करतात ! काही केवळ शास्त्र जिज्ञासेने योग मार्गाचे आचरण करतात ! साधक ज्याही कारणांमुळे योगाकडे वळलेले असतील त्या कारणानुसार त्यांच्या बाह्य आचरणात भिन्नता दिसून येते !
0 Comments