दिवस २० : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

दिवस २० : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

 

पातंजल योगदर्शन

दिवस २० : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३  : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी

अध्याय ३ : विभूतीपाद

देशबन्धश्चित्तस्य धारणा ॥ ३.१॥‌

तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ॥ ३.२॥

‌तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधिः ॥ ३.३॥

त्रयमेकत्र संयमः ॥ ३.४॥

‌तज्जयात्प्रज्ञालोकः ॥ ३.५॥ 

‌तस्य भूमिषु विनियोगः ॥ ३.६॥

‌त्रयमन्तरङ्गं पूर्वेभ्यः ॥ ३.७॥

‌तदपि बहिरङ्गं निर्बीजस्य ॥ ३.८॥ 

‌व्युत्थाननिरोधसंस्कारयोरभिभवप्रादुर्भावौ निरोधक्षणचित्तान्वयो निरोधपरिणामः ॥ ३.९॥

तस्य प्रशान्तवाहिता संस्कारात् ॥ ३.१०॥

अध्याय ३ : विभूतीपाद : सारांश 

१) योगाच्या पहिल्या ५ अंगाना बहिरंग यासाठी म्हटले आहे कि त्यांचे चित्त स्थिर करण्याच्या कामी साक्षात उपयोग होत नसून परंपरेने उपयोग होतो !

२) धारणा - ध्यान - समाधी ह्या ३ अंगानी चित्ताची स्थिरता साधता येते म्हणून त्यास अंतरंग साधन असे म्हटले आहे !

३) सर्व शरीरभर संचार करणारे चित्त शरीराच्या एका भागावर स्थिर करणे म्हणजे धारणेचा अभ्यास होय !

४) शरीरात मुख्य ७ नाडीचक्रे आहेत ! ज्यावर चित्त एकाग्र केल्यास वेगवेगळे लाभ होतात !

मूलाधार : माकड हाडाजवळ
स्वाधिष्ठान : जननेन्द्रियखाली व गुदद्वारजवळ
मणीपूरचक्र : नाभी 
अनाहत : हृद्य 
विशुद्ध : टाळू 
आज्ञा : ललाट 
सहस्त्रार : मस्तक 

५)  संपूर्ण शरीराचा व्यापार हा ह्या ७ नाडीचक्रांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे नियंत्रणात सुरु असतो !

६) ह्या ७ चक्रावर धारणेच्या निमित्ताने चित्त स्थिर केले असता शरीर सुस्थित होणे हे फल प्राप्त होते !

७) चित्त कोठेतरी स्थिर करणे म्हणजे धारणा तर स्थिर झालेल्या चित्ताचा विशित्ष्ट वृत्तिरूप परिणाम सारखा टिकवणे म्हणजे ध्यान होय !

८) ध्यानाच्या पक्व अवस्थेलाच समाधी असे म्हणतात !

९) धारणा - ध्यान - समाधी एकत्रितपणे साधले गेले म्हणजे संयम होय !

१०) योग शास्त्रात संयम साधने म्हणजे धारणा - ध्यान - समाधी एकत्रितपणे उपयोगात आणणे !

११) वस्तुमात्राचे विशेष ज्ञान जिला होते तीस प्रज्ञा असे म्हणतात ! संयमाचा जय झाल्याने प्रज्ञाचा उदय होतो !

१२) सामान्य माणसांना वस्तूमात्राचे होणारे ज्ञान अगदीच संकुचित असते !

१३) प्रज्ञालाभ झाल्यानंतर निर्विचार समाधीच्या अधिक सूक्ष्म अशा सानंद व सस्मित समाधीच्या अधिक सूक्ष्म भूमिकांवर चित्तास न्यावयाचे असते व पुढे सर्व वृत्तींचा निरोध करून असंप्रज्ञात समाधी साधवयाची असते !

१४) पर्वताच्या पायथ्याशी असताना तो पर्वत चढून जाण्यासाठी कंबर कसावी, मोठा ठिय्या धरून उंच उंच चढत जावे, मागे वळून किती उंच आलो हे पाहून मोठी धन्यता मानावी आणि इतक्यात अनवधानाने घसरड्या जागेवर पाय टाकावा आणि तोल जावून घसरत - जखमी होत तळाशी यावे ह्यात कोणता पुरुषार्थ राहिला ? प्रज्ञा प्राप्तीनंतर योगसिद्धींचा वापर पुढील असंप्रज्ञात समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी न करता इतर कोणत्याही उद्देशाने केल्यास पर्वताच्या पायथ्याशी यावयास जसा वेळ लागत नाही तसाच योगाच्या अभ्यासाच्या सुरवातीला पोहोचण्यास वेळ लागत नाही !

१५) निर्बीज समाधी साधल्यानंतर धारणा - ध्यान - समाधी ह्या तिन्हीचेदेखील प्रयोजन राहत नाही !

१६) इंद्रियांची विषयाकडे धाव म्हणजे व्यूत्थान ! वारंवार विषय भोग केल्याने त्यात निर्माण होणारी आसक्ती म्हणजे व्यूत्थानसंस्कार ! सर्व वृत्तींना शांत करणे म्हणजे निरोध व त्यामुळे सत्वगुणाची ओढ म्हणजे निरोधसंस्कार ! चित्त निरोध अवस्थेत टिकणे म्हणजे निरोधपरिणाम ! 

१७) निरोधाचा अभ्यास दीर्घकाळ - निरंतर - सत्कार पूर्वक केल्याने निरोध संस्कार बलवान होतात ! निरोध संस्कार बलवान झाल्याने ती एकाच लयीत सतत प्रवाहित होत राहतात व त्याच्या परिणामाने आत्मसाक्षात्कार होतो !

१८) आत्मसाक्षात्कार हेच मनुष्यजन्माचे अंतिम ध्येय आहे !

१९) प्रभू रामचंद्राना उपदेश करतांना गुरु वसिष्ठ म्हणतात कि = आहारादी आवश्यक गोष्टींच्या प्राप्तर्थ्या अनिंद्य कर्म करावे, प्राणरक्षणार्थ आहारादी कर्म करावे, तत्वजिज्ञासार्थ प्राणाचे रक्षण करायचे व पुन: पुन: दु:ख होऊ नये म्हणून तत्व (आत्मसाक्षात्कार) जाणावे !

Ganesh K Avasthi
Blog Admin

पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २ : समाधिपाद - साधनपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३

Post a Comment

0 Comments