ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ५

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ५

 

patanjal yogdarshan


ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ५  

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी 

समाधिपाद :

दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् ॥१.१५॥

पातंजल योगदर्शन : अध्याय १ समाधिपाद : सारांश 


१) जीवाला भोग घडवून आत्मसाक्षात्कार  पथाला नेण्याच्या सत्व-रज-तम ह्या त्रीगुणामध्ये जी शक्ती आहे तिला भोगापवर्गार्थता असे योगशास्त्रकारांनी म्हटले आहे !
२) सुख बाह्य विषय सेवनात असते तर सर्वांस सर्वकाळी सारखेच सुख प्राप्त होवयास पाहिजे होते !
३) नैसर्गिक नियमांकडे दुर्लक्ष झाले किंवा त्या विरोधी वर्तन घडले कि त्यासाठी निसर्ग शासन करते !
४) जीवाची सात्विक बुद्धी वाढीस लागल्यावर ज्ञानाच्या साह्याने त्यास बाह्य विषय सेवनातील क्षणिक सुख देखील तत्वता दुखः आहे हे समजते !
५) विषया संबंधी दोषदृष्टी उत्पन्न झाल्यावर लागलीच विषयत्याग घडत नाही !
६) विषय त्यागाला अभ्यासाद्वारे सुरवात केल्यावर भोगवृत्ती व त्यागवृत्ती यामधील झगडा जीवाला फारच क्लेशदायक ठरत असतो !

यतमान संज्ञक वैराग्य

७) सततच्या योग अभ्यासाने जीवाची भोगवृत्ती कमी होत जाते  व वैराग्याचा उदय होतो ! वैराग्याचा उदय झाला कि विषय वासना जिंकण्यासाठी जीव सतत प्रयत्न वाढवत जातो यास योगशास्रात यतमान संज्ञक वैराग्य असे म्हटले आहे, जे वैराग्याच्या ४ अवस्थेमधील पहिली अवस्था आहे !

व्यतिरेक संज्ञक वैराग्य

८) वैराग्याची दुसरी अवस्था व्यतिरेक संज्ञक वैराग्य : इंद्रियांचा असंयम हाच सर्व आपत्तींना कारण आहे व त्यांचा संयम हाच सुखाचा खरा मार्ग आहे हे साधकास स्वानुभवाने पटते ! मग साधक सतत आत्मनिरीक्षण करून आपल्या योगसाधनेतील प्रगतीचा आढावा घेत राहतो व त्या दृष्टीने प्रयत्न वाढवत जातो ह्या अवस्थेला व्यतिरेक संज्ञक वैराग्य असे म्हणतात ! 

एकेंद्रिय संज्ञक वैराग्य

९) वैराग्याची ३ री अवस्था एकेंद्रिय संज्ञक वैराग्य : योगअभ्यासामुळे मिळणाऱ्या सुखाची ओढ साधकाला लागते. त्याअनुसार तो अपोआप आपल्या जीवनाची सात्विक रित्या मांडणी सुरु करतो. उदा. सात्विक आहार, झोपेचे नियंत्रण, सज्जन संगत, ग्रंथांचे अध्ययन इत्यादि. थोडक्यात त्याचे पूर्ण जीवन अध्यात्मप्राप्ती ह्या केंद्रस्थानी फिरु लागते ! इंद्रिय व मन यांच्या ठिकाणी छान असा संयम झालेला असतो परंतु बुद्धीतून समूळ उच्चाटन झालेले नसते व बुद्धी उच्चाटनसाठी अजून बळकट प्रयत्न हवे असतात अशा अवस्थेस  एकेंद्रिय संज्ञक वैराग्य  असे म्हणतात !


वशीकार संज्ञक वैराग्य 

१०) वैराग्याची सर्वोच्च म्हणजे ४ थी अवस्था वशीकार संज्ञक वैराग्य : येथे योग्याच्या चित्तात विषयांविषयी पूर्ण अनासक्ती झालेली असल्याने वैराग्यस्थिरतेसाठी अधिक योग अभ्यासाची आवश्यकता राहत नाही ! तो निर्विचार समाधी प्राप्त करतो ! ह्या अवस्थेला वैराग्याची सर्वोच्च म्हणजे ४ थी अवस्था वशीकार संज्ञक वैराग्य असे म्हणतात !

११) आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर चित्ताची ओढ सर्वस्वी थांबते कारण त्याचे सत्व-रज-तम हे त्रिगुण प्रयोजनशून्य असतात ! त्रीगुण व त्यांचे कार्य ह्यांकडे तो जीव उदासीन होवून बघतो कोठेही आसक्त होत नाही ! ज्ञानाची हि सर्वोच्च पराकाष्ठा आहे ! 

१२) योग शास्त्राचे अंतिम ध्येय जे कैवल्य आहे ते येथून फार दूर नाही !

Ganesh K Avasthi
Blog Admin

पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २ - ३ - ४  : समाधिपाद - साधनपाद - विभूतीपाद - कैवल्यपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १४

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १५ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १६ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १७ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २०

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २१ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २२ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २३ 

 




 

Post a Comment

2 Comments

  1. Tatparam purushkhyatergunavaitrushnam

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आत्मसाक्षात्काराचे फळरूप वैराग्य : परवैराग्य !

      Delete