दिवस १८ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

दिवस १८ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

 

पातंजल योगदर्शन


दिवस १८ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी

अध्याय २ : साधनपाद

१) प्राणयाम करण्यात थोडीही चूक झाली कि त्यापासून मोठा अपाय होऊ शकतो !

२) आपल्या शरीरात आपल्या स्वाधीन असलेली ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय ही जशी बाह्य इंद्रिये आहेत तशीच मेंदू, फुफ्फुस, हृद्य, यकृत ई. आपल्या स्वाधीन नसलेली आंतर इंद्रिये आहेत ! आपले नियंत्रण ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांवर असते, आंतर इंद्रिये नियंत्रण निसर्गाने आपल्या हाथी ठेवले आहे !

३) आंतर इंद्रिये यांतील फुफ्फुस हे इंद्रिय एक असे इंद्रिय आहे की त्याचे थोडे फार नियमन  मनुष्य करू शकतो !

४) श्वसनक्रियेचे नियमन करणारे एक केंद्र मेंदूत असते. रेचक - पूरक किंवा कुंभक करीत असतांना फुफ्फुसांवर अधिक श्रम झाले किंवा त्यावर अधिक ताण पडला तर त्याचा परिणाम मेंदूतील मज्जातंतुवरदेखील पडतो जो मेंदूच्या केंद्रावर पोहोचून मेंदूत विकृती निर्माण होण्याचे भय असते !

५) यामुळेच प्राणायामाचा अभ्यास अत्यंत बेताने - जपून व सावकाश, सावधानतेने केला गेला पाहिजे !

६) निरोगी स्थितीत असलेला प्रौढ मनुष्य एका दिवसात सामान्यत: २१,६०० वेळा श्वासोच्छवास करत असतो ! ह्या हिशोबाने एका मिनिटात १५  श्वासोच्छवास पडतात !

७) पूरक - रेचक - कुंभक ह्यांच्या योगाने ह्या गतीला नैसर्गिकरीत्या प्रयत्नाने एका मिनिटास १५ ऐवजी १४ मग १३ मग, १२ अशा प्रकारे कमी-कमी श्वासोच्छवास होतात, योग प्रक्रियेस प्राणायाम असे म्हणतात !

८) वेगवेगळ्या प्राणायामात हि गती कमी - अधिक करतात !

९) रेचकामध्ये फुफ्फुसातील संपूर्ण वायू संथपणे बाहेर सोडवयाचा असतो त्यामुळे त्यास बाह्य वृत्ती असे म्हटले आहे !

१०) पुरकामध्ये  बाहेरील प्राणवायू आत आकर्षून घ्यायचा असल्यामुळे त्यास अभ्यंतरवृत्ती असे म्हटले आहे !

११) कुंभ म्हणजे मातीचा घट, ह्यामधील वायू बाहेरून आत जात नाही व आतून बाहेर जात नाही तर तो त्या कुंभात जेथल्या तेथे जसाच्या तसा राहतो ! त्याचप्रमाणे कुंभका मध्ये फुफ्फुसातील बाहेरील वायू आत येत नाही व आतील बाहेर जात नाही त्यास तसाच ठेवायचा असतो !

१२) पूरक म्हणजे आंत घेतलेला वायू काही काळ आताच रोखून स्थिर ठेवणे हा आंतरकुंभक होय !

१३) रेचकानंतर वायू बाहेर गेल्यावर पुन: श्वास न घेता फुफ्फुसे तशीच काही ठेवणे म्हणजे बाह्य कुंभक होय !

१४) दोन प्रकारच्या कुंभकात आंतर कुंभक हा अधिक धोक्याचा असल्यामुळे त्याचा वाढता अभ्यास न करता बाह्यकुंभकाचा अभ्यास करावा ! 

१५) प्राणायमाच्या अभ्यासात एक ढोबळ खूण लक्षात ठेवायची ती ही की प्राणायमामुळे फुफ्फुसात अथवा हृदयात थोडाही थकवा-अस्वस्थपणा किंवा डोक्यात थोडाही सुंदपणा वाटत असेल तर अभ्यास त्वरित बंद करावा !

१६) प्राणवृत्ती सूक्ष्म होणे हे प्राणायमाचे प्रयोजन असते. प्राणवृत्ती सूक्ष्म झाल्याने मनाची वृत्ती सूक्ष्म व एकाग्र होते ! मनाची वृत्ती सूक्ष्म झाल्याने मन चंचलता सोडून स्थिर होण्यास सुरवात होते !

१७) प्राणायमाच्या सततच्या दीर्घ अभ्यासाने श्वासोच्छवास प्रक्रियेत  नैसर्गिकरित्या प्राणवृत्ती सूक्ष्म होत जाते ! त्यास केवल कुंभक असे म्हणतात !

१८) प्राणायमाच्या सततच्या दीर्घ अभ्यासाने चित्तातील रजोगुण व तमोगुण कमी होवून वासना निर्बल होत जातात ! वासना निर्बल झाल्याने प्रकाशाचा रूपक सत्वगुण वाढीस लागतो व योगाच्या पुढील अंगास म्हणजे प्रत्यहारास साधक पात्र होतो ! 

Ganesh K Avasthi
Blog Admin

पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २  : समाधिपाद - साधनपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १७ 

Post a Comment

0 Comments