दिवस १४ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर
सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी
अध्याय २ : साधनपाद
अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः॥२.३०॥
अध्याय २ : साधनपाद : सारांश
१) यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान आणि
समाधी हे योगाची ८ अंग आहेत !
२) शरीरातील प्रत्येक अंगाची जशी जीवाला उपयुक्तता असते त्याचप्रमाणे
योग्याला ह्या ८ अंगांची आवश्यकता असते !
३) यम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधी हि अंगे अत्यंत महत्वाची
असल्याने त्यांचे पालन झालेच पाहिजे !
४) आसन - प्राणायाम - नियम ही अंगे योगास पोषक आहेतच परंतु त्यावर योगातील
प्रगती सर्वस्वी अवलंबून नसून साधकाने आपली अंतर्बाह्य परिस्थिती अभ्यासून
आचरावयाची आहे !
५) यम हे पांच प्रकारचे आहेत !
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह !
पहिला यम म्हणजेच अहिंसा समजून घेवू !
६) कायिक अहिंसा : आपल्या शारीरिक कोणत्याही क्रियेमुळे कुणासही प्रत्यक्ष
अथवा अप्रत्यक्ष पिडा होणार नाही याची दक्षता घेणे हि कायिक अहिंसा होय
!
७) वाचीक अहिंसा : आपल्या बोलण्याने दुसऱ्यास दुःख होईल, असे कडक, तुटक,
कठोर, कुचेष्टा, उपहास, निंदा करणे, मर्मभेदी भाषण करणे इत्यादी वाचिक हिंसा
होय ! हे सगळे व्यवहार न करणे हि वाचिक अहिंसा होय !
८) मानसिक अहिंसा : मनात हिंसात्मक विचार येवूच न देणे हि मानसिक अहिंसा होय
जी सगळ्यात जास्त अवघड आहे !
दुसरा यम म्हणजेच सत्य समजून घेवू !
९) सत्य: सत्य आणि प्रिय असेल ते बोलावे, सत्य पण अप्रिय असेल ते बोलू नये,
प्रिय पण खोटे असेल ते बोलू नये ! जसा बोलण्यात सावधपणा हवा तसाच आचरणातही
सावधपणा हवा !
तिसरा यम म्हणजेच अस्तेय समजून घेवू !
१०) अस्तेय : आवश्यकतेपेक्षा विषयांचा अधिक उपभोग घेणे हे स्तेय होय !
शरीरास धारण - रक्षण - पोषण - वर्धन ई. सृष्टीनियोजित कार्ये योग्यप्रकारे
घडावीत म्हणून आवश्यक असलेल्या भोगाव्यतिरिक्त अधिक भोग न भोगणे हे अस्तेय
होय !
चवथा यम म्हणजेच ब्रह्मचर्य समजून घेवूया !
११) ह्या सृष्टीच्या चलनासाठी आवश्यक असलेल्या जननकार्यहेतू निसर्गाने समस्त
प्राणीमात्रांमध्ये स्त्री देह व पुरुष देह ह्या दोहोमध्ये आकर्षण निर्माण
केले आहे ! ह्या आकर्षणाने स्त्री - पुरुष संयोग होवून त्यांच्या पोटी एक जीव
उत्पन्न होतो !
१२) समस्त प्राणीमात्रांमध्ये मानवी स्त्री देहात निसर्गाने शब्द - स्पर्श -
रुप - रस - गंध ह्या पाचही विषयांशी संबंधित आकर्षण निर्माण केले आहे !
१३) ह्या पाचही विषयांच्या प्रभावाने पुरुष अनेक पटींनी स्त्री-विषयक मोह
आकर्षणाकडे झुकत असतो !
१४) निसर्गाने निर्माण केलेल्या ह्या दुर्निवार मोहाला आवरून ह्या
विषयांच्या सेवनात संयम पाळणे म्हणजेच ब्रह्मचर्य होय ! ह्या संयमात
पंचइंद्रिय संयम साधला जातो जो योग अभ्यासास अनुकूल आहे !
१५) इंद्रिये स्वभावता बहिर्मुख आणि स्त्रीच्या ठिकाणी गुणअधिक्य असल्या
कारणाने पुरुषास आकर्षण अधिक हा निसर्गाचा नियम आहे !
१६) शारीरिक सामर्थ्य व त्या सामर्थ्याचा उपयोग करणारी मानसिक वीरवृत्ती हे
दोन पुरुषगुण वगळता बाकी शारीरिक व मानसिक गुणात स्त्री हि पुरुषा पेक्षा
नक्कीच श्रेष्ठ आहे व ह्यामुळेच पुरुषात स्त्री आकर्षण व ओढ निसर्गत: असते !
ह्या ओढीतूनच विवाह - कुटुंब संस्था नर्माण झाल्या आहेत !
१६) ब्रह्मचर्य पालन करतांना आठ दोष निर्माण होतात !
पहिला दोष : प्रेक्षण : स्त्री दर्शनाने नैसर्गिकरित्या होणारा आनंद पुन्हा
पुन्हा मिळावा ह्या हेतूने पुन्हा पुन्हा केले जाणारे स्त्री दर्शन म्हणजे
प्रेक्षण होय !
नैसर्गिक आनंद व वासना ह्यात हाच फरक होय !
दुसरा दोष : स्मरण : कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने त्या गोष्टीचा संस्कार
चित्तावर दृढ होत जातो ! त्यास आपण सवय म्हणतो ! स्त्री कडे वासनांनी युक्त
अभिलाषेपोटी वारंवार पहिल्याने ती सवय दृढ होते व वारंवार स्त्री स्मरण होऊ
लागते !
तिसरा दोष : कीर्तन : प्रेक्षण व स्मरण हे दोष वारंवार घडल्याने पुरुष इतका
निर्ढावतो कि आपल्या हातून काही चूक घडत आहे याची जाणीवदेखील त्याच्या मनाला
होत नाही ! मग तो स्त्रियांच्या अंगी असलेल्या समस्त गुणांची प्रकट चर्चा
करणे, स्त्री विषयक बाष्फळ व बिभस्त विनोद करणे - लिहणे - वाचणे सुरु करतो
हेच कीर्तन होय !
चवथा दोष : केली : प्रेक्षण - स्मरण - कीर्तन ह्या दोषांनी माणूस निर्ढावला
कि तो स्त्रियांशी सलगी करू लागतो ! ह्या सलगिला निम्मित काहीही असले किंवा
तसा तो दाखवीत जरी असला तरी त्याच्या मुळाशी स्त्री सहवास हा मोह असतो तोच
केली होय !
पाचवा दोष : गुह्यभाषण : ह्या नंतर पुरुष प्रत्येक स्त्री सोबत अनेक
प्रकराची लगट सावधपणे करू लागतो ! ह्या लगटमधून गुह्यभाषण दोष निर्माण
होतो !
सहावा दोष : संकेत : गुह्यभाषणाने अथवा इतर अनेक प्रकारच्या चाळ्याने पुरुष
आपली कामुकता स्पष्टपणे व्यक्त करतो ! भोळसटपणा - मूर्खता - विलासप्रीयता
ह्या विकारांनीयुक्त असलेल्या स्त्रिया अशा पुरुषाच्या हेतूला सहाय्यभूत
ठरतात !
सातवा दोष : अध्ययवास : ह्या दोषांच्या अधिक्याने पुढील अध:पात टाळणे अशक्य
होते ह्या दोहोंच्या उन्माद अवस्थेला अध्ययवास म्हणतात !
आठवा दोष : क्रियानिवृत्ती : ह्यास व्यभिचार असे म्हणतात !
0 Comments