ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ८

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ८

 

patanjal yogdarshan


 ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस  ८

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी

समाधिपाद :

दुःखदौर्मनस्याङ्गमेजयत्वश्वासप्रश्वासा विक्षेपसहभुवः॥१.३१॥

तत्प्रतिषेधार्थमेकतत्त्वाभ्यासः॥३२॥

मैत्रीकरुणामुदितोपेक्षणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम्॥१.३३॥

प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य॥१.३४॥

विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसः स्थितिनिबन्धिनी॥१.३५॥

विशोका वा ज्योतिष्मती ॥१.३६॥

वीतरागविषयं वा चित्तम्॥१.३७॥

स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा॥१.३८॥

यथाभिमतध्यानाद्वा ॥१.३९॥ 

परमाणु परममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः॥१.४०॥

क्षीणवृत्तेरभिजातस्येव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्स्थतदञ्जनतासमापत्तिः॥१.४१॥

अध्याय १ : समाधिपाद : सारांश 

१) मागील लेखात ( लिंक ) आपण योगमार्गातील ९ प्रकारचे विघ्ने बघितली ! हे ९ विघ्ने उपस्थित झाले असता पुढील चार प्रकारचे उपद्रव हे साधकास होत असतात ! 

  • ३ दुःख : अध्यात्मिक - आधिदैविक - आधीभौतिक
  • दौर्मनस्य : मन अस्थिर होणे 
  • अंगमेजयत्व : शरीराचे कंपन 
  • श्वासप्रश्वास : श्वास घेणे व सोडणे यामधील अनियमितपणा !

२) योगशास्त्र अभ्यासातील ९ विघ्ने व ४ उपद्रव यांचा परस्परसंबंध आहे !
३) योगशास्त्र अभ्यासातील ९ विघ्ने व ४ उपद्रव यांच्यावर उपाय म्हणजे योगअभ्यासात सातत्य ठेवणे हाच होय !
४) चित्त प्रसन्न ठेवण्यासाठी सुख - दुःख, पुण्य - पाप  ह्या विषयी अनुक्रमाने मैत्री - करुणा - हर्ष (मुदिता )  - उपेक्षा अशा भावना निर्माण कराव्या ! ज्याने योगमार्गातील ९ विघ्न व ४ उपद्रव यांच्यावर आपणास नियंत्रण करणे सोपे होते ! 

सुख - मैत्री : सुखी व्यक्तीविषयी मैत्रीची भावना करत गेल्याने अभ्यासबलाने तशी भावना प्रबल होऊ लागते ! इतरांच्या सुखाने आपल्या मनात मत्सर - असूया - द्वेष उत्पन्न होत नाही !

दुःख - करूणा : दुःखी व्यक्तीविषयी करुणेची भावना करावी ! त्याच्या दुःखास दूर करण्यासाठी काही उपाय शक्य असेल तर करावे शक्य नसल्यास ह्याच्या दुःखाचा लवकर शेवट होवून हा लवकर सुखी होवो अशी भावना करावी !

पुण्य - हर्ष : पुण्यवान व्यक्ती दिसता आपल्या मनाला आनंदी करण्याची सवय लावावी !

पाप - उपेक्षा : पापाचरण करणारी व्यक्ती दिसता त्याविषयी द्वेष - तिरस्कार - अनादर ह्यापैकी काहीही न करता त्या व्यक्तीविषयी उदासीनता म्हणजेच उपेक्षा बुद्धी करावी !

अशा रीतीने ह्या चार भावना वारंवार व्यवहारात म्हणजेच आचरणात करीत गेल्याने त्याप्रकारे आपला स्वभाव घडत जातो !

५) प्राणवायू पूर्ण बाहेर सोडणे म्हणजेच रेचक व पुन्हा आत न येवू देता त्यास बाहेरच धारण करणे म्हणजे बाह्य कुंभक याने देखील चित्त प्रसन्न होण्यास मदत होते !

  • प्राणवायू आत घेणे = पूरक 
  • श्वसन थांबवणे = कुंभक 
  • प्राणवायू बाहेर सोडणे = रेचक 
६) बाह्यकुंभक अभ्यास १ घटका ( २४ मिनिटे ) केल्याने श्वसनक्रिया सुधारून रक्तप्रवाह शुद्ध व बलवान होतो व चित्त प्रसन्न होते !

७) ५ विषयांपैकी ( शब्द - स्पर्श - रूप - रस - गंध  ) एका विषयावर चित्त एकाग्रतेचा अभ्यास केल्यानेदेखील 
चित्तास प्रसन्नता लाभते ! उदा. वाहणाऱ्या नदीच्या आवाजावर ( शब्द ) चित्त एकाग्र केल्याने चित्तास स्थिरता प्राप्त होत जाते !

८) आत्मसाक्षात्कार प्राप्त महापुरुषांच्या चित्तावर त्यांच्या सद्गुणावर चित्त एकाग्र करण्याच्या अभ्यासाने देखील चित्तास प्रसन्नता लाभते !

९) आपल्याला चित्तएकाग्रतेसाठी जे शुद्ध - निर्मल - सुखदायी अशा कोणत्याही एका गोष्टची निवड करावी व त्यावर एकाग्रतेचा अभ्यास करावा !

११) एकाग्रतेचा अभ्यास नवा असेपर्यंत चित्त स्थिरता होण्यास कठीणता अनुभवास येत असते ! परंतु वर सांगितल्या गेलेल्या विविध चित्त एकाग्रतेच्या अभ्यासाने चित्त स्थिरता मजबूत होत जाते व त्यानंतर चित्त हे अत्यंत सूक्ष्म ते स्थूल अशा कोणत्याही गोष्टीवर सहज स्थिर होऊ लागते त्यास चित्त वशीकार होणे म्हणतात !
 
१२) चित्ताच्या ठिकाणी वृत्ती क्षीण झाल्याने चित्त कोणत्याही सूक्ष्म अथवा स्थूल अशा गोष्टीवर स्थिर केले असता चित्त सहजच तन्मय होवून जाते यास समापत्ती असे म्हणतात !

Ganesh K Avasthi
Blog Admin

पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २ - ३ - ४  : समाधिपाद - साधनपाद - विभूतीपाद - कैवल्यपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १४

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १५ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १६ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १७ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २०

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २१ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २२ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २३ 

 





Post a Comment

0 Comments