दिवस १३ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर
सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी
अध्याय २ : साधनपाद
हेयं दुःखमनागतम्॥२.१६॥
द्रष्टृदृश्ययोः संयोगो हेयहेतुः॥१७॥
प्रकाशक्रियास्थितिशीलं भूतेन्द्रियात्मकं भोगापवर्गार्थं दृश्यम्॥२.१८॥
विशेषाविशेषलिङ्गमात्रालिङ्गानि गुणपर्वाणि॥२.१९॥
द्रष्टा दृशिमात्रः शुद्धोऽपि प्रत्ययानुपश्यः॥२.२०॥
तदर्थ एव दृश्यस्यात्मा॥२.२१॥
कृतार्थं प्रति नष्टमप्यनष्टं तदन्यसाधारणत्वात्॥२.२२॥
स्वस्वामिशक्त्योः स्वरूपोपलब्धिहेतुः संयोगः॥२.२३॥
तस्य हेतुरविद्या॥२.२४॥
तदभावात् संयोगाभावो हानं तद् दृशेः कैवल्यम्॥२.२५॥
विवेकख्यातिरविप्लवा हानोपायः॥२.२६॥
तस्य सप्तधा प्रान्तभूमिः प्रज्ञा॥२.२७॥
योगाङ्गाऽनुष्ठानादशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्यातेः॥२.२८॥
यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयोऽष्टावङ्गानि॥२.२९॥
अध्याय २ : साधनपाद : सारांश
१) चिकित्साशास्त्राची ज्या प्रमाणे ४ अंग आहे जसे, रोग, रोगाचे कारण, आरोग्य आणि औषध त्या प्रमाणे योगशास्त्राची ४ अंग आहे ! संसार, संसारहेतू, मोक्ष , मोक्ष उपाय !
२) जे संसारदुःख अजून प्राप्त नाही झाले ते नाश करण्यायोग्य असते !
३) चित्ताला जो जाणतो तो द्रष्टा व चित्तवृत्ती व त्याद्वारे प्रतीत होणारे बाह्य जगत हे दृश्य यांचा एकमेकांवर होणार आभास हेच अनागत म्हणजेच हेय म्हणजेच अजून प्राप्त न झालेल्या दुःखाला कारणीभूत असते !
४) ह्या जगतात सत्वगुणामुळे प्रकाश, रजोगुणामुळे क्रिया, तमोगुणामुळे स्थिती हे प्रकट होत असतात !
५) सत्व - रज - तम त्रिगुणांच्या चार अवस्था असतात !
६) पंच महाभूत , पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय व अंतकरण हि सोळा तत्व ही त्रिगुणांची विशेष अवस्था होय ! ह्या सोळांची प्रकृती म्हणजे शब्द - स्पर्श - रूप - रस - गंध व त्यांची प्रकृती म्हणजे अस्मिता हि त्रिगुणांची अविशेष अवस्था होय ! मूळ अव्यक्त ही आलिंग अवस्था व महतत्व ही लिंग अवस्था !
७) सृष्टीचा विलय म्हणजे विशेष अवस्थेतील १६ तत्व हि अविशेष अवस्थेत, अविशेष अवस्थेतील ६ तत्व लिंगमात्र महतत्वात, महतत्व आलिंग अशा अव्यक्तात विलीन होतात !
८) सर्वज्ञ परमेश्वर जीवाच्या कल्याणासाठी सृष्ट पदार्थात भोग व मुक्ती ह्यास अनुकूल असा परिणामप्रवाह घडवून आणतो !
९) आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे योगी कृतार्थ होतो !
१०) विद्येने अविद्येचा नाश होणे ह्यालाच हान हो यौगीक संज्ञा आहे !
११) चित्त व दृष्टा हे एकमेकाहून अत्यंत भिन्न आहे याची प्रतीती येणे म्हणजे विवेकख्याती होय !
१२) विवेकख्याती ह्या बौद्धिक प्रत्ययाला धारणा - ध्यान - समाधी ह्यांच्या सहाय्याने अनुभवाची जोड द्यावी लागते !
१३) विवेकख्याती चित्तात स्थिर राहण्याला जे अडथळे निर्माण होतात त्यांस विप्लव असे म्हणतात !
१४) चित्त हे ७ प्रेरणांनी काम करत असते !
आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावे ही प्रेप्सा प्रेरणा !
आपल्याला अमुक गोष्ट प्राप्त होऊ नये ही जीहासा प्रेरणा !
आपल्याला नवीन काहीतरी ज्ञान व्हावे ही जिज्ञासा प्रेरणा !
आपल्याला काहीतरी करावे हे वाटणे ही चीकीर्षा प्रेरणा !
भूतकाळातील दुःखद गोष्टी खेद उत्पन्न करतात ही शोक प्रेरणा !
आपल्याला भविष्यातील संकटांची चिंता वाटते ही भय प्रेरणा !
आपल्याला कितीही भोग उपभोगले तरी अजून हवेसे वाटणे ही अतृप्ती प्रेरणा !
१५) प्रत्येक जिवाकडून जो काही इंद्रिय - विषय भोग व्यापार चालतो त्यास ह्या ७ पैकी कोणती तरी एक प्रेरणा कारणीभूत असते !
१६) योग शास्त्राची जी ८ अंग आहेत त्यांचे पालन केल्याने चित्तातील अशुद्धीचा नाश होवून विवेकख्याती उत्पन्न होते !
१७) चित्तातील सत्वगुण वाढणे व त्यासोबतच रज - तम गुण दोष नाहीशा होणे हाच चित्त अशुद्धीचा नाश होय !
१८) यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान आणि समाधी हे योगाची ८ अंग आहेत !
0 Comments