ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ३

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ३

 

patanjal yogdarshan

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ३  

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी 

समाधिपाद : 

अथ योगानुशासनम ॥१॥

योगश्चित्तवृत्तिनिरोधः ॥१.२॥

तदा द्रष्टु: स्वरुपेSवस्थानम् ॥१.३॥

वृत्तिसारूप्यम् इतरत्र ॥ १.४ ॥

वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाSक्लिष्टा: ॥ १.५॥

प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः ॥ १.६ ॥

पातंजल योगदर्शन : अध्याय १ समाधिपाद : सारांश 

१) अनुबंधचतुष्टय : कोणत्याही शास्त्राचा अधिकारी कोण - प्रयोजन काय - विषय काय - संबंध काय हे सुरवातीस सांगणे म्हणजे अनुबंधचतुष्टय !

२) अधिकारी : भौतिक - दैविक - आध्यात्मिक तापाने त्रस्त व्यक्ति !

३) प्रयोजन : आत्मसाक्षात्कार

४) विषय : चित्त वृत्ति निरोध 

५) संबंध : गरज नाही

६) योग म्हणजे चित्तवृत्ति निरोध होय !

७) चित्तवृत्ति ३ प्रकारच्या आहे. सात्विक - राजस - तामस !

८) चित्ताच्या ५ भूमिका आहे !

मूढ़ : यात तामस गुण प्रबळ असतो जो विषयांकड़े प्रेरित असतो ! आळस - तंद्रा - निद्रा - मूर्च्छा हे याचे मुख्य दोष आहे.

क्षिप्त : रजस गुण प्रबळ असून हे देखील इंद्रिय - विषय याकड़े प्रेरित असते !

विक्षिप्त : तामस - रजस गुणांना दूर सारूंन सत्व गुण प्रबळ होते. चित्त एकाग्रता सहज साध्य होत असते ! 

एकाग्र : विक्षिप्त अवस्थेत चित्तास आनंद प्राप्तीचा मार्ग सापडल्यामुळे ह्याच आनंदाला कायमस्वरूपी प्राप्त करून घ्यावे ह्या इच्छेने इंद्रिय - विषय भोगाकडुन जीव अंतर्मुख होण्यास प्रेरित होतो. 

निरुद्ध : सर्व चित्त वृत्तींचा निरोध होतो ! बुद्धितील संशय - विकल्प इत्यादी अनेक दोष नष्ट होतात. बाह्यसंस्कार नष्ट होतात.समस्त वासना नष्ट होतात ! म्ह्णून यास निर्बीज समाधी असे म्हणतात !

९) चित्तवृत्तीनिरोध नंतर स्वरूपाला जीव स्वरूपाला प्राप्त होतो !

१०) जीव हा मुळात चैतन्यमात्र असतो परंतु चीत्त्तातील सत्व-रज-तम गुणामुळे जीव शांत -घोर - मूढ वृत्तीमध्ये फेकला जातो ! त्यामुळे स्वरूपाला जीव समजू शकत नाही ! येथे लेखकाने स्फटीकाचे छान उदाहरण घेतले आहे !
जसे स्फटिक कोणत्याही रंगीत पदार्थाशी सलग्न झाल्यास स्फटिक देखील त्याच रंगाचा भासू लागतो ! व तो पदार्ध दूर झाला कि स्फटिक आपल्या मुळ शुद्ध स्वरूपाला प्राप्त होतो ! 

११) मूळ जीवात (द्रष्टा ) कोणतेही विकार नसतात परंतु चित्तवृत्ती सोबत झालेल्या संयोगाने जीव वृत्ती समान भासतो ! जसे स्फटिका समोर लाल फुल ठेवले तर स्फटिक देखील लाल रंगाचे भासते ! विकार हे चित्तात असतात !

१२) चित्तवृत्तीचे अनेक प्रकार असतात परंतु ज्यांचा निरोध करायचा आहे अशा ५ क्लिष्ट ( क्लेशदायक ) वृत्ती असतात !

१३) आत्मसाक्षात्कार होईपर्यंत वृत्ती क्लेशयुक्त असतात. आत्मसाक्षात्कार नंतर त्या अक्लेशयुक्त होतात !

१४) चित्ताच्या ५ क्लेशदायक वृत्ती : प्रमाण - विपर्यय - विकल्प - निद्रा - स्मृती  

१५) प्रमाण : प्रमाण ३ प्रकारचे आहेत : प्रत्यक्ष - अनुमान - आगम !

प्रत्यक्ष प्रमाण : बुद्धीला इंद्रीय्द्वारे होणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात !
अनुमान प्रमाण : प्रत्यक्ष न दिसणाऱ्या घटनेचा पुर्वअनुभवाद्वारे बुद्धीने आपण अनुमान लावत असतो ! 
आगम प्रमाण :  आत्मसाक्षात्कारी विद्वानांचे वचन हे आगम प्रमाण असते !  

Ganesh K Avasthi
Blog Admin


पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २ - ३ - ४  : समाधिपाद - साधनपाद - विभूतीपाद - कैवल्यपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १४

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १५ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १६ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १७ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २०

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २१ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २२ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २३ 

 


Post a Comment

0 Comments