दिवस १७ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

दिवस १७ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

 

पातंजल योगदर्शन

दिवस १७ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी

अध्याय २ : साधनपाद

स्थिरसुखम् आसनम् ॥२.४६॥

प्रयत्नशैथिल्यानन्तसमापत्तिभ्याम् ॥ २.४७॥

ततो द्वन्द्वानभिघातः ॥ २.४८॥

तस्मिन्सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेदः प्राणायामः ॥ २.४९॥

बाह्याभ्यन्तरस्तम्भवृत्तिर्देशकालसंख्याभिः परिदृष्टो दीर्घसूक्ष्मः ॥२.५०॥

बाह्याभ्यन्तरविषयाक्षेपी चतुर्थः ॥२.५१॥

ततः क्षीयते प्रकाशावरणम् ॥ २.५२॥

धारणासु च योग्यता मनसः ॥ २.५३॥

अध्याय २ : साधनपाद : सारांश

१) शरीर ज्या स्थितीत राहिले असता मन व शरीर ह्या दोहोस सुख व स्थिरता लाभेल अशा आसनास सुखासन असे म्हणतात !

२) शारीरिक हालचाली करण्याविषयी जी सहज प्रवृत्ती असते तो प्रयत्न होय !

३) ह्या प्रयत्नामध्ये तन्मयता व शिथिलता साधल्यानंतर आसन स्थिर व सुखावह होते !

४) आसन स्थिर झाले असता राग-द्वेष इत्यादि द्वंदाचा त्रास होत नाही !

५) शरीरातील सर्व विकृती नाहीशा होवून पूर्ण आरोग्य प्राप्त झाल्यानंतर अष्टांगयोगाचा अभ्यास सुकर होत असतो !

६) हठयोगातील २ ते ३ आसन वगळता इतर आसन हे अष्टांगयोगास निरुपयोगी आहे !

७) अष्टांग योगाचा मुख्य भर चित्ताची एकाग्रता साध्य करून पुढे वृत्तींचा निरोध करणे यावर आहे व त्यासाठी आसन स्थिर व सुखकर असणे आवश्यक आहे !

८)  स्नायुस व्यायाम घडून ज्यामुळे स्नायू व अंतरइंद्रियांचे आरोग्य निट राखले जावे म्हणून हठयोगात भिन्न भिन्न आसने सांगितले आहे !

९) आपण खाल्लेल्या अन्नाचा ४ प्रकारे विनियोग होत असतो !

  • ज्या भागाचा शरीराला उपयोग नाही ते मलरूपाने शरीराबाहेर टाकले जाते !
  • अन्नाच्या तमोगुणापासून शरीराचे अंग-प्रत्यंग घटक बनतात !
  • अन्नाच्या रजोगुणापासून प्राणशक्ती म्हणजे प्राण - अपान - व्यान - उदान - समान तयार होते !
  • अन्नाच्या सत्वगुणाने अंत:करण बनत असते !
१०) आसन स्थिर व सुखावह सततच्या प्रयत्नांनी होत असते व त्याचा परिणाम म्हणून शीत-उष्ण इत्यादि त्रास होत नाही !

११) श्वास व प्रश्वास यांच्या स्वाभाविक गतीला नियंत्रित करणे म्हणजे प्राणयाम होय !

१२) बाहेर सोडल्या जाणाऱ्या वायुस प्रश्वास व त्या क्रियेस योगात रेचक असे म्हणतात !

१३) आत घेतल्या जाणाऱ्या वायुस श्वास व त्या क्रियेस योगात पूरक म्हणतात !

१४) श्वास व प्रश्वास म्हणजे पूरक - रेचक ह्यांच्यानंतर काही काळ जो रोखला जातो त्यास कुंभक असे म्हणतात !

१५) प्राणायामाने चित्तातील रजोगुणातील दोषांचा क्षय होतो !

१६) चित्तातील रजोगुणाचा क्षय झाल्याने योगाच्या पुढील अंगाचा म्हणजे धारणा व तिचा अभ्यास करण्याची योग्यता मनाच्या ठिकाणी प्राप्त होते !

१७) प्राणायाम इकडे - तिकडे हिंडता - फिरता करण्याचे अंग नाही !

१८) प्राणयाम करण्यात थोडीही चूक झाली कि त्यापासून मोठा अपाय होऊ शकतो !

१९) प्राणायमाच्या अभ्यासातील सावधानता पुढील लेखात !

२०) माझी वाचकांस नम्र विनंती आहे की पातंजल योगदर्शन ग्रंथपरीचय हि लेखमालिका आपल्या प्रीयजनांसोबत शेअर करा जेणेंकरून सर्वांस त्याचा लाभ होईल ! धन्यवाद ! 

Ganesh K Avasthi
Blog Admin


पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २  : समाधिपाद - साधनपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३


Post a Comment

0 Comments