ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ९
सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी
समाधिपाद :
तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः॥१.४२॥
स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का॥१.४३॥
एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता॥१.४४॥
ता एव सबीजः समाधिः॥१.४६॥
सूक्ष्मविषयत्वं चालिङ्गपर्यवसानम्॥१.४५॥
निर्विचारवैशारद्येऽध्यात्मप्रसादः॥१.४७॥
ऋतम्भरा तत्र प्रज्ञा॥१.४८॥
श्रुतानुमानप्रज्ञाभ्यामन्यविषया विशेषार्थत्वात्॥१.४९॥
तज्जः संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी॥१.५०॥
तस्यापि निरोधे सर्वनिरोधान्निर्बीजः समाधिः॥१.५१॥
अध्याय १ : समाधिपाद : सारांश
१) शब्द, अर्थ, ज्ञान ह्या तिघांचा परस्परांशी सबंध परंपरेने चालत आलेल्या संस्कारांनी होत असतो !
उदाः: गाय हा शब्द ऐकल्यावर गाय ह्या पदार्थाचे ज्ञान होते ते आपल्या चित्तात संस्कारित असल्यामुळेच !
२) स्थूल साधनाच्या सहाय्याने चित्तास एकाग्रता देण्याच्या अभ्यासात चित्ताची त्या स्थूल विषयाशी साधकाची तन्मयता लागते त्यास सवितर्क समापत्ती असे म्हणता !
३) शब्द ऐकल्यावर त्याचा हा अर्थ होय असे आपल्याला स्मृतीमुळे कळते !
४) सवितर्क समापत्तीचा दीर्घ असा अभ्यास करत राहिल्याने ध्यानाची परिपक्व अवस्था तयार होते ज्यास निर्वीतर्का समापत्ती असे म्हणतात !
५) एकाग्रता साधण्यासाठी साधकाला आधी स्थूल विषय देवून त्यात तन्मयता साधल्यावर त्याचे पर्यावसन सूक्ष्म विषयामध्ये होते, सूक्ष्म विषयामध्ये तन्मयता साधल्यावर त्याचे पर्यावसन अतिसूक्ष्म विषयावर होते ! असा अभ्यास दीर्घकाळ केल्याने चित्त संस्कारशेष बनते !
६) जोपर्यंत कैवल्यसाक्षात्कार म्हणजेच असंप्रज्ञात समाधीची अवस्था येत नाही तोपर्यंत वासनांचा संपूर्ण विनाश होत नाही ! परंतु तोपर्यंतच्या त्याच्या समाधी अवस्थेस सबीज समाधी असे म्हणतात !
७) प्रकाश हा बुद्धीचा मूळ स्वभाव आहे, परंतु रजोगुणी वासनांनी बुद्धीच्या प्रकाशाला काजळी लागल्याप्रमाणे बुद्धीचा प्रकाश झाकलेला असतो !
८) सबीज समाधीच्या सतत दीर्घ अभ्यासाने त्याचे चित्त शुद्ध - स्वच्छ अशा स्थितीस येते त्यास निर्विकार वैशारद्य असे म्हणतात !
९) निर्विकार वैशारद्य स्थितीस चित्त पोहोचल्यावर हे चित्त अत्म्साक्ष्ताकाराच्या दिशेने तीव्रपणे ओढ घेते !
१०) निर्विकार वैशारद्य स्थितीस पोहोचलेल्या साधकाला ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाली असे योगशास्त्रात म्हटले जाते !
११) वेदांच्या शब्दापासुन जे ज्ञान प्राप्त होते त्यास श्रुतप्रज्ञा असे म्हणतात !
१२) अनुमानप्रमाणाने जे ज्ञान होते त्यास अनुमानप्रज्ञा असे म्हणतात !
१३) श्रुतप्रज्ञा व अनुमानप्रज्ञा ह्या दोहोपेक्षा ऋतंभरा प्रज्ञा हि योगशास्त्रात विशेष मानली जाते !
१४) ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाली असता चित्तातील अनंत जन्मातील कर्माचे व वासनांचे संस्कार दुर्बल व क्षीण होवून जातात !
१५) ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त साधक निर्विघ्नपणे साधना करू लागतो व दीर्घकालीन अभ्यासामुळे ऋतंभरा प्रज्ञेचा देखील संस्कार चित्तातून नष्ट होतो व साधकास निर्बीज समाधी अवस्था प्राप्त होते !
0 Comments