ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ४
सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी
समाधिपाद :
प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि ॥१.७॥
पातंजल योगदर्शन : अध्याय १ समाधिपाद : सारांश
१) चित्त्त वृत्तीचे ५ प्रकार
- प्रमाण वृत्ती : प्रमाण ३ प्रकारचे आहेत : प्रत्यक्ष - अनुमान - आगम !
प्रत्यक्ष प्रमाण : बुद्धीला इंद्रीय्द्वारे होणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात !
अनुमान प्रमाण : प्रत्यक्ष न दिसणाऱ्या घटनेचा पुर्वअनुभवाद्वारे बुद्धीने आपण अनुमान लावत असतो !
आगम प्रमाण : आत्मसाक्षात्कारी विद्वानांचे वचन हे आगम प्रमाण असते !
- विपर्यय वृत्ती : एका वस्तूचा भास दुसऱ्या वस्तूवर होतो व दुसऱ्या वस्तूचे खरे स्वरूप जाणल्यावर जो भास मिथ्या ठरतो त्यास विपर्यय समजावे ! उदा. दोरी हि साप असल्याचा भास !
- विकल्प वृत्ती : शब्दज्ञानामुळे उत्पन्न होते परंतु वस्तू आधार नसतो ! उदा. आकाशाचे फुल !
- निद्रा वृत्ती : इंद्रियांनी होणार्या ज्ञानाच्या अभावाची ओळख करून देणारी वृत्ती म्हणजे निद्रा !
- स्मृती वृत्ती : चित्तात पुर्वानुभावांची जागृती होणे म्हणजे स्मृती वृत्ती !
ह्या पाच चित्तवृत्ती आहेत ज्या क्लिष्ट म्हणजे क्लेशदायक असतात ज्यांचा निरोध कारणे म्हणजेच योग आहे !
ह्या पांच वृत्तीचा निरोध कसा करायचा हे पुढे पाहूया !
२) अभ्यास व वैराग्य ह्या २ उपायांनी क्लिष्ट अशा ५ वृत्तींचा निरोध होतो !
- अभ्यास : चित्तामध्ये ५ वृत्तीचा व्यापार हा सतत सुरु असतो ! एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जेव्हा चित्त जाते तेव्हा पहिल्या वृत्तीचा उपशम होतो म्हणजे ती शांत होते व दुसऱ्या वृत्तीचा उदय होतो ! एक वृत्ती शांत झाल्याशिवाय दुसऱ्या वृत्तीचा उदय होत नाही ! पहिल्या वृत्तीचा उपशम ( शांत ) व दुसऱ्या वृत्तीचा उदय यातील अंतर प्रयत्नपूर्वक क्षणाक्षणाने वाढविण्याची सवय हाच अभ्यास आहे !
- वैराग्य : चित्त हे कान - त्वचा - डोळे - जीभ - नाक ह्या इंद्रियाद्वारे अनुक्रमे शब्द - स्पर्श - रूप - रस - गंध ह्या विषयांच ग्रहण करत असते ! ह्या विषयांना भोगताना सुख मिळाल तर ते सुख कायम मिळत रहाव असे वाटणे म्हणजेच राग व विषय भोगतांना दुखः मिळाले तर हे दुखः कधीही भेटू नये असे वाटणे म्हणजेच द्वेष !द्वेष भावना निर्माण झाली म्हणजेच सुखाची आसक्ती (क्लेश) निर्माण होते ! आसक्ती चित्ताला बाह्यविषयांकडे खेचत असते ! बाह्य विषयांविषयी अनासक्त होणे म्हणजे वैराग्य !
* विषय २ प्रकारचे आहेत !
दृष्ट विषय ( ज्यांचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो )
आनुश्राविक विषय ( शास्त्र, परंपरा, संस्कृती, विद्वान-ज्ञानी व्यक्ती इ. कडून ऐकून माहित झालेले स्वर्ग, अमृत ई. विषय )
* सामान्य माणसांच्या अंतकरणात हे दोन्ही विषय भोगण्याची इच्छा असते !
* योग अभ्यासात प्रवृत्त झालेल्या माणसाला सद्विवेक बुद्धी प्राप्त होवून अशा विषयाप्राप्तीच्या इच्छेपासून मुक्त होतो तेव्हा त्या स्ठीतीला वशीकार वैराग्य म्हणतात !
* पोटभर अन्न् खाल्ले कि पशु अन्न घेत नाही ! माणसाच तसे नाही अधिक अन्न खाल्यामुळे माणसे आजारी पडतात ! हेच उदाहरण इंद्रिय विषय आसक्ती बाबतीत देखील आहे ! पशु इंद्रिय विषयसुख हे फक्त प्रजनन व देह रक्षण ह्या हेतूने उपभोगतात परंतु मानव विवेकबुद्धी असूनदेखील इंद्रिय - विषय सुख याकडे त्याची अमर्यादित ओढ त्याला अनेक सुख-दुखात ढकलत असते !
* मानवजन्मास विवेकबुद्धी वापरण्याचे स्वातंत्र्य व त्याप्रमाणे चांगले-वाईट समजण्याचे ज्ञान, चांगले हवे वाईट नको अशी इच्छा, ती इच्छा पूर्ण करण्यासठी ज्ञानप्राप्तीची मानवाकडे असून पशुकडे ती फारच कमी प्रमाणात आहे ! मानवाकडे वर्तनस्वातंत्र्य अधिक असल्यामुळे तो श्रेष्ठ - श्रेष्ठतर - श्रेष्ठतम ध्येय स्वप्रय्त्नांने प्राप्त करू शकतो ! पशुला हि सुविधा नाही ! म्हणून मानवजन्म म्हणजे कर्मयोनी व पशुजन्म म्हणजे भोगयोनी म्हटले जाते !
* मनुष्य काम (कामना - इच्छा ) याने ग्रस्त होवून त्याचे चित्त विषयाकडे खेचले जाते !
* बाह्य विषय प्रपात करून घेण्यासाठी इंद्रिये - शरीर ई. कडून नानाविविध कर्म केले केले जातात !
* आपल्या समजुतीप्रमाणे विशिष्ट फल प्राप्तीच्या हेतूने केलेल्या योग्य कर्माचेही अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही असे वारंवार समजल्याने मानव अधिकाधिक विचार करू लागतो कि असे का होते ? या विचारामुळे बुद्धी प्रगल्भ होण्यास सुरवात होते व त्याची कामना - इच्छा देखील श्रेष्ठ होत असल्यामुळे कर्मे देखील त्याच स्वरुपाची होण्यास सुरवात होते ! इंद्रिय सुखापेक्षा मानसिक सुख-दुख महत्वाचे वाटू लागते ! मग तो इंद्रिय - विषय सुखास तुच्छ लेखून मानसिक सुख मिळविण्याकरता देहदुखः सुद्धा स्वीकारतो ! अशा रीतीने तो पाशवी वृत्ती सोडून अंतर्मुख होण्यासाठी जी सत्वसंपन्नता लागते तिचा उदय त्याच्या बुद्धीत सुरु होतो !
Ganesh K Avasthi
Blog Admin
पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २ - ३ - ४ : समाधिपाद - साधनपाद - विभूतीपाद - कैवल्यपाद सारांश लेखन लिंक
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १४
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १५
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १६
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १७
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १८
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १९
पातंजल
योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २०
पातंजल
योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २१
पातंजल
योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २२
पातंजल
योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २३
2 Comments
अतिशय सुंदर विवेचन... दृष्टानुष्रविकवितुष्ण्यास्या वशिका र संज्ञा वैराग्याम - अपरा वैराग्य
ReplyDeleteखूप धन्यवाद !
Delete