दिवस १६ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

दिवस १६ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

 

पातंजल योगदर्शन

दिवस १६ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी


अध्याय २ : साधनपाद 

अहिंसाप्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्यागः॥२.३५॥

सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम्॥२.३६॥

अस्तेयप्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम्॥२.३७॥

ब्रह्मचर्यप्रतिष्ठायां वीर्यलाभः॥२.३८॥

अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथंतासंबोधः॥२.३९॥

शौचात् स्वाङ्गजुगुप्सा परैरसंसर्गः॥२.४०॥

सत्त्वशुद्धिसौमनस्यैकाग्र्येन्द्रियजयात्मदर्शनयोग्यत्वानि च॥२.४१॥

संतोषादनुत्तमसुखलाभः॥२.४२॥

कायेन्द्रियसिद्धिरशुद्धिक्षयात् तपसः ॥ २.४३॥

स्वाध्यायाद् इष्टदेवतासंप्रयोगः ॥ २.४४॥

समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात् ॥ २.४५॥


अध्याय २ : साधनपाद : सारांश

१ ) यम-नियमांचे पालन करत असताना उत्पन्न होणारे वितर्क हे कृत - कारित - अनुमोदित ह्या ३ प्रकारामध्ये मोडते !

२) कृत म्हणजे स्वतः केलेले, कारित म्हणजे इतरांकडून करवून घेतलेले ! अनुमोदित म्हणजे परवानगी दिलेले !

३) वितर्क हे ३ विकारामुळे उपस्थित होतात ! लोभ - क्रोध - मोह !

४) झाडाचे मूळ तोडले जी ते जसे अपोआप मृत होत जाते आणि त्याचा बुंधा, शाखा, लहान फांद्या, पाने, फुले, फळे हि अपोआप मृत होतात त्याच प्रमाणे जर चित्तातून वरील तीन दोष म्हणजेच लोभ - कोध - मोह काढून टाकण्यासाठी कायम सावध राहावे !

५)  मनात हिंसेला अनुकूल असे विचार न येणे हि अहिंसावृत्ती स्थिर झाल्याचे लक्षण आहे !

६) योग्याच्या ठिकाणी सत्य स्थिर झाल्यास त्याचे अखिल जीवन सृष्टीशी समरस झालेले असते ! त्यामुळे सृष्टीतील होणाऱ्या प्रत्येक घटनेच्या क्रियेच्या फळाचा त्यांना आधीच अनुभव येत असतो !

७) योग्याच्या ठायी अस्तेयवृत्ती स्थिर झाल्यास लोककल्याणाच्या उद्देशाने तो ज्या कामाची इच्छा करतो ते काम त्याच्या संकल्पानेच त्याच्यापुढे उपस्थित होते !

८) योग्याच्या ठायी ब्रह्मचर्य स्थिर झाल्यास योग्याला कोणत्याही कामात सामर्थ्य व उत्साह प्राप्त होतो !

९) योग्याच्या ठायी अपरिग्रह स्थिर झाला कि पूर्वीचे जन्म व पुढील जन्म याचे ज्ञान होते !

१०) देहावर अहं-ता असणे व पदार्थांवर मम-ता असणे हे दोन आत्मसाक्ष्त्काराच्या मार्गावरील मोठे प्रतिबंध मानले गेले आहे !

११) आत्मज्ञानाला देहवासना, शास्त्रवासना, लोकवासना ह्या तीन वासना प्रतिबंध करीत असतात !

१२)  योग्याच्या ठायी शौचवृत्ती स्थिर झाल्यास अंतकरणात प्रसन्नता - संतोष - शांती नांदू लागते ! चित्तातील बाह्य विषयांकडील ओढ नष्ट होते त्यामुळे चित्त शांत - प्रसन्न - स्थिर भावास प्राप्त होते ! इंद्रियजय प्राप्त होतो !

१३) योग्याच्या ठायी संतोष वृत्ती स्थिर झाल्यास त्याचा आनंद हा कोणत्याही बाह्य विषयांवर अवलंबून राहत नाही व त्यामुळे स्वाभाविकपणेच आनंदी राहतो !

१४)  तपाच्या योगाने शरीर व इंद्रिय यांची अशुद्धी नाहीशी होते !

१५) स्वध्यायाने आत्मज्ञानाची स्थिती लवकर पूर्णत्वास जाते !

१६) ईश्वरप्रणिधानाने योगी निर्विकल्प समाधीस प्राप्त होतो !

Ganesh K Avasthi
Blog Admin

पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २  : समाधिपाद - साधनपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३




Post a Comment

0 Comments