ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ७

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ७

 

patanjal yogdarshan

 ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस  ७

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी

समाधिपाद :

भवप्रत्ययो विदेहप्रकृतिलयानाम् ॥१.१९॥ श्रद्धावीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषाम् ॥१.२०॥

तीव्रसंवेगानाम् आसन्न: ॥ १.२१॥ मृदुमध्याधिमात्रत्वात् ततोSपि विशेषः ॥ १.२२॥

ईश्वरप्रणिधानाद्वा ॥ १.२३॥ क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्ट: पुरुषविशेष ईश्वरः ॥१.२४॥

तत्र निरतिशयं सर्वज्ञबीजम्॥१.२५॥ पूर्वेषाम् अपि गुरुः कालेनानवच्छेदात्॥१.२६॥

तस्य वाचकः प्रणवः॥१.२७॥ तज्जपस्तदर्थभावनम्॥१.२८॥ ततः प्रत्यक्चेतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च॥१.२९॥

व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्तेऽन्तरायाः॥१.३०॥

अध्याय १ : समाधिपाद : सारांश 

१) असंप्रज्ञात समाधीचे २ प्रकार आहेत !

भवप्रत्यय : उपेक्षणीय 
उपायप्रत्यय : आदरणीय 

२) साधकाचा आत्मसाक्षात्कारापर्यंतचा प्रवास एका जन्मात संपणारा प्रवास नव्हे !

३) सर्व दुःखाचा विलय होवून आत्मसाक्षात्कार होण्यासाठी योग हेच एक साधन असून हा विश्वास म्हणजेच श्रद्धा होय !
४) योगाला साधकाने सुरवात केल्याने त्यास प्राथमिक स्वरुपचे काही लाभ मिळतात व योगवरील त्याची श्रद्धा दृढ होवून तो उत्साहाने पुढील पायरी गाठण्याचे प्रयत्न करू लागतो !

५) योग्याला अनेक जन्मातील योग अभ्यास देखील स्मरते ! ज्याच्या लाभाने योग्याच्या योगअभ्यासाला पुर्वस्मृतीने चकाकी येवून त्यास उत्तम बुद्धी प्राप्त होते ! बुद्धीच्या योगाने आत्मसाक्षात्कार होणे असंप्रज्ञात समाधी होय !

६) आत्मसाक्षात्काराची उत्कट इच्छाशक्ती (तीव्र संवेग ) असलेल्या योग्याला त्यानुसार प्रयत्न केल्याने लवकर लाभ होतो !

७)  संवेगाच्या ९ अवस्था ह्या साधकाच्या विविध प्रकारच्या संस्कारांवर अवलंबून असतात !

८) ईश्वरसमर्पण भावनेने देखील  असंप्रज्ञात समाधी सहज साध्य होते !

९) ५ क्लेश, ३ कर्म, विपाक ( कर्मफल), आशय ( वासना ) यांच्या पर जो आहे तोच ईश्वर आहे !

१०) ईश्वराहून महत असे काहीच नाही, ईश्वर सर्वज्ञ आहे व त्याचे ज्ञान हे मानवाप्रमाणे बुद्धीवर अवलंबून नाही !

११) ईश्वराला काळाची मर्यादा नाही !

१२) ॐ हा ईश्वर वाचक म्हणजे ईश्वर नाम आहे !

१३) ईश्वर समर्पण भावनेने ॐ चा जप करावा व तो करत असताना ईश्वर माझ्या हृदयात असून तो व मी एकरूपच आहोत अशी भावना करावी !

१४) साधकाने एकांतस्थळी बसून वैखरी म्हणजे दीर्घ स्वरात ॐ चा जप करावा.

१५) ह्या जप साधनेने बुद्धी विषय त्यागपूर्वक बनते व चित्त तन्मय होते ज्याचा आत्मसाक्षात्कारासाठी फायदा होतो !

१६)  योगमार्गात मुखत्वे ९ विघ्ने येतात ! 

योगमार्गातील ९ विघ्ने ( अडचणी )

व्याधी ( रोग ) : आजार हे योगसाधनेतील पहिले विघ्न आहे !

स्त्यान : तमोगुणाच्या वाढत्या प्रभावाने चित्त मूढ, जड, भ्रमित, ई. दोषांनी युक्त होवून योगअभ्यासाकडे चित्ताची इच्छा होत नाही म्हणजेच चित्त अकर्मण्यतेकडे झुकते त्यास स्त्यान म्हणतात ! स्त्यान हे योगसाधनेतील २ रे विघ्न आहे !

संशय : आत्मसाक्षात्कार होईपर्यंत संशय वृत्ती लोप पावत नसते ! विविध विषय वासना ह्या साधकाच्या मनात योग साधनेविषयी संशय निर्माण करत असतात ! विषय भोग हे साधकाला योग साधनेपासून परावृत्त करण्यासाठी आकृष्ट करत असतात ! संशय योगसाधनेतील ३ रे विघ्न आहे !

प्रमाद : योग अभ्यासाने चित्तास प्रसन्नता येते, शरीर आरोग्यदायी होते, आजार लवकर बरे होतात, मानसिक सामर्थ्य वाढते, समाधीच्या पुढच्या अवस्था अनुभावास येवूनसुद्धा योगअभ्यासाकडे दुर्लक्ष होते व योग अभ्यास होत नाही यास प्रमाद म्हणतात ! प्रमाद हे योगसाधनेतील ४ थे विघ्न आहे जे साक्षात मृत्यूसमान मानले गेले आहे !

आलस्य : स्त्यान हे मनाला आलेले जडत्व असते तर आलस्य हे शरीराला व मनाला आलेले जडत्व असते ! आलस्य  हे योगसाधनेतील ५ वे विघ्न आहे !

अविरती : योगसाधनेत अनावधनता आल्यामुळे मनात सुप्त असलेली विषयवासना पूर्ण जागरूक होवून साधकाला सैरभैर करून विषय भोगास प्रवृत्त करते  व विषयांचे कितीही सेवन केले तरी जीवाची तृप्ती होत नाही ह्या चित्तदोषाला अविरती असे म्हणतात ! अविरती  हे योगसाधनेतील ६ वे विघ्न आहे !

भ्रांतीदर्शन : निर्विचार समाधीची पूर्ण अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच साधक  निर्विचार समाधीची पूर्ण अवस्था प्राप्त झाली असे समजतो व पुढील अवस्थेस जाण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नास सुरवात करतो जे व्यर्थ जातात ! ह्या चित्त दोषास भ्रांतीदर्शन असे म्हणतात ! भ्रांतीदर्शन हे योगसाधनेतील ७ वे विघ्न आहे !

अलब्धभूमिक्त्व : योगसाधनेची प्रगती एका विशेष स्तरावर येवून पुढील स्तरावर अनेक प्रयत्न करूनदेखील एखाद्या चित्तदोषामुळे जाता येत नाही त्यास अलब्धभूमिक्त्व असे म्हणतात !अलब्धभूमिक्त्व हे योगसाधनेतील ८ वे विघ्न आहे !

अनवस्थिततत्व : योगसाधनेची प्रगती एका विशेष स्तरावर येवून तिथे चित्ताची एकाग्रता खुंटते, थोड्याशा निमित्ताने देखील योगअभ्यास घडत नाही यास अनवस्थिततत्व असे म्हणतात ! अनवस्थिततत्व हे योगसाधनेतील ९ वे विघ्न आहे !

योगअभ्यासातील ह्या ९ विघ्नांवर साधक ईश्वरसमर्पण वृतीने मात करू शकतो ! ज्यात ईश्वरवाचक नाम म्हणजेच ॐ चा जप हे केल्याने साधकाकडून तो आस्तिक असो व् नास्तिक त्याकडून सगुण - निर्गुण ईश्वर उपासना आपोआपच होत असते ! ज्यामुळे योगसाधनेतील हे ९ विघ्न दूर होण्यास मदत मिळत असते !

प्रश्न : योगमार्गातील ९ विघ्ने कोणते ?

उत्तर : व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांतीदर्शन, अलब्धभूमिक्त्व, अनवस्थीतत्व हे योगमार्गातील ९ विघ्ने आहेत ! 

Ganesh K Avasthi
Blog Admin

पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २ - ३ - ४  : समाधिपाद - साधनपाद - विभूतीपाद - कैवल्यपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १४

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १५ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १६ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १७ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २०

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २१ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २२ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २३ 

 



Post a Comment

0 Comments