दिवस २२ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

दिवस २२ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

 

patanjal yogdarshan

दिवस २२ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी

अध्याय ३ : विभूतीपाद

स्थूलस्वरूपसूक्ष्मान्वयार्थवत्त्वसंयमाद्भूतजयः ॥ ३.४४॥

ततोऽणिमादिप्रादुर्भावः कायसम्पत्तद्धर्मानभिघातश्च ॥ ३.४५॥

रूपलावण्यबलवज्रसंहननत्वानि कायसम्पत् ॥ ३.४६॥

ग्रहणस्वरूपास्मितान्वयार्थवत्त्वसंयमादिन्द्रियजयः ॥ ३.४७॥

ततो मनोजवित्वं विकरणभावः प्रधानजयश्च ॥ ३.४८॥ 

सत्त्वपुरुषान्यताख्यातिमात्रस्य सर्वभावाधिष्ठातृत्वं सर्वज्ञातृत्वं च ॥ ३.४९॥

तद्वैराग्यादपि दोषबीजक्षये कैवल्यम् ॥ ३.५०॥

स्थान्युपनिमन्त्रणे सङ्गस्मयाकरणं पुनरनिष्टप्रसङ्गात् ॥ ३.५१॥

क्षणतत्क्रमयोः संयमाद्विवेकजं ज्ञानम् ॥ ३.५२॥ 

जातिलक्षणदेशैरन्यतानवच्छेदात् तुल्ययोस्ततः प्रतिपत्तिः ॥ ३.५३॥ 

तारकं सर्वविषयं सर्वथाविषयम् अक्रमं चेति विवेकजं ज्ञानम् ॥ ३.५४॥

सत्त्वपुरुषयोः शुद्धिसाम्ये कैवल्यमिति ॥ ३.५५॥ 


अध्याय ३ : विभूतीपाद : सारांश

१) साधकाने संयम ( धारणा - ध्यान - समाधी ) करण्यासाठी मुर्तीस्वरुपातील पंचभौतिक वस्तू न घेता व्यष्टीभूत म्हणजेच स्वशरीर घ्यावे ! देह पंचभौतिक असल्याने स्वशरीराद्वारे केलेले संयम पंचमहाभूतांवरच केलेले संयम होय !

२) पृथ्वीची कठीणता-घनता, जलाची स्ग्निधता-द्रवता, अग्नीची उष्णता-दाहकता, वायूची वाहकता-प्रेरकता, आकाशाची सर्वव्यापिता हे धर्म ( गुण ) त्या त्या भुताची स्वरूप अवस्था आहे !

३) समष्टी ( प्रकृती - सृष्टी ) अहंकारात सर्व व्यष्टी ( वैयक्तिक अहंकार ) अहंकाराचा समावेश असतो !

४ ) हा अहंकार सात्विक - राजसी -  तामसी स्वरूपाचा असतो ! 

५) तामस अहंकारातून सूक्ष्म पंचमहाभूत तयार होतात ! शब्द - स्पर्श - रूप - रस - गंध ! ह्या सूक्ष्म भुतांपासून समस्त सृष्टीरुप्न स्थूल पंचमहाभूते तयार झाली !

६) राजस अहंकारातून पंच कर्मेंद्रिय तयार झाली आणि समुच्चीत रजोगुणापासून प्राणशक्ती निर्माण झाली. 

७) सत्व अहंकारातून कर्मेंद्रिय कान - नाक - डोळे - जिव्हा - त्वचा हि पंच ज्ञानेन्द्रीय तयार झाले व सर्वांच्या एकीकृत अंशांपासून अंत:करण ( मन -बुद्धी - चित्त - अहंकार ) तयार झाले !

८) पंच प्राण - पंच कर्मेंद्रिय - पंच ज्ञानेंद्रिय - मन - बुद्धी असे एकूण १७ तत्वांच्या समष्टीसमूहालाच हिरण्यगर्भ हि संज्ञा देण्यात आली आहे ! 

९) साधकाच्या शरीरातील तमोगुणांचे घटक कमी झाल्याने अज्ञान - आलस्य - जडत्व - झोप - प्रमाद - मूढत्व इत्यादि मानसिक व त्यापासून उत्पन्न होणाऱ्या शारीरिक व्याधी सहजच नाहीशा होतात !

१०) रजोगुण कमी झाल्याने काम - क्रोध - लोभ - दंभ - दर्प - असूया - अहंकार - ईर्ष्या ई. घोर वृत्ती व त्या पासून निर्माण होणाऱ्या व्याधी नाहीशा होतात !

११) सत्व गुणाचे प्राबल्य वाढल्याने ज्ञान - समाधान - प्रकाश वाढीस लागतो ! साधकाचा कायापालट होतो !   

१२) तळपायापासून मांडीपर्यंतचा भागात पृथ्वी तत्व अधिक्याने नांदत असते ! मांडीपासून वर नाभीपर्यंत जल हे तत्व अधिक्याने नांदत असते ! नाभीपासून ते छातीपर्यंत अग्नी तत्व अधिक्याने नांदत असते ! छातीपासून नाकापर्यंत वायू तत्व अधिक्याने नांदत असते ! आकाश तत्व हे शिरामध्ये अधिक्याने नांदत असते !

१३) योगसाधकांचे ४ वर्ग पडतात !

  • प्राथमकाल्पिक : सर्व प्रकारच्या दु:खांची निवृत्ती होवून आत्त्मसाक्षात्कार होण्याला योग हेच एक साधन आहे अशी मनाची निश्चिती झाल्याने श्रद्धायुक्त अंत:करणाने योगअनुष्ठानाकडे वळलेले योगी म्हणजे  प्राथमकाल्पिक योगी होय !
  • मधुभूमिक : निर्विचार समाधी साधलेला व ऋतंभरा प्रज्ञा उदय पावलेला साधक हा  मधुभूमिक योगी असतो !
  • प्रज्ञाज्योती :  ऋतंभरा प्रज्ञा पूर्ण विकसित झालेला योगी म्हणजे प्रज्ञाज्योती योगी होय !
  • अतिक्रांतभावनीय : आत्मसाक्षात्कार झालेला योगी म्हणजेच अतिक्रांतभावनीय योगी होय !

१४) कोणत्याही २ वस्तूंच्या भेदाचे ज्ञान होण्याला कारण असलेली जी शक्ती आहे तिला विवेक असे म्हणतात ! स्वार्थ संयमाने चित्तातील रजोगुण मलीनता नाहीशी होवून सत्व व पुरुष ह्या दोन पदार्थामधील भेदज्ञान होत असते ! हे विवेकज ज्ञान होय !

१५) भाजलेले बी पुन: अंकुर उत्पन्न करण्याला असमर्थ असते त्याप्रमाणे संसाराला कारण असलेले अविद्यादी क्लेश विवेकख्यातीने जणू भाजून निघाल्यासारखे असल्यामुळे ते पुरुषाला पुन: जन्ममरणरुपी संसारात ओढू शकत नाही !  


Ganesh K Avasthi
Blog Admin


पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २ - ३ : समाधिपाद - साधनपाद - विभूतीपाद  सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १४

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १५ 

Post a Comment

0 Comments