ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस १

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस १

 

patanjal yogdarshan

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ :  कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस १ 



लेखक परिचय : कै. कृष्णाजी केशव कोल्हटकर 

जन्म : १४ जानेवारी १८८३ (सातारा)

मृत्यू : २६ एप्रिल १९७५ (पुणे)

शिक्षण : इंटर आर्ट्स 

नोकरी : १९०१ - १९१३ सातारा येथील जिल्हा न्यायालय येथे कारकून.

नोकरी : १९१३ - १९३७ वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीत काम.

श्री. कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचे चुलते श्री गणेश राघो हे योग व वेदांत शास्त्राचे गाढे अभ्यासक होते.

त्यांच्या सहवासात श्री. कृष्णाजी केशव कोल्हटकर यांस वेदांत व योगशास्त्राची गोडी लागली !

१९३७ नंतर सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे वेदांत शास्त्र व योग ह्या विषयाच्या अभ्यासात व लेखनास अर्पण केले !

त्यांच्या योगदर्शन ह्या ग्रंथाला केंद्र सरकार व राज्यसरकार सहित अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त आहे.




९ जुलै १९७२ रोजी पुणे विद्यापीठ द्वारे त्यांच्या योगदानाला गौरविण्यासाठी डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली.

१९७२ साली वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी आचार्य शंकरकृत विवेकचूडामणी स्तोत्रावर ग्रंथ लिहून पूर्ण केला !

१९७३ साली वयाच्या ९० व्या वर्षी महर्षी वेदव्यास हा ग्रंथ प्रकाशित झाला !

१९७५  साली योगदर्शन ह्या ग्रंथाची ३ री आवृत्ती प्रकाशित करून त्यांनी आपला देह ठेवला ! 

कै. कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी ग्रंथाच्या आत्मनिवेदनात आपला संपूर्ण जीवन प्रवास व त्यात त्यांच्या पत्नीची म्हणजेच कै.सौ रखमाबाई कृष्णाजी कोल्हटकर यांची तसेच अनेक मान्यवरांची  लाभलेली साथ याचे त्यांनी न विसरता उल्लेख केला असून मला आत्मनिवेदना मध्ये त्यांचे एक वाक्य अतिशय आवडले ते पुढीलप्रमाणे !

" माणूस जन्माला आल्यावर त्याला " मी " पणा चीटकतो व आपले खरे स्वरूप तो विसरतो. परमेश्वराच्या या अफाट विश्वात आपला जन्म हि एक क्षुद्र घटना आहे व मानवाने अशा अत्यंत किरकोळ घटनेचा अहंकार धरण्याचे काही कारण नाही. आपणास परमेश्वराने जन्मास का घातले आहे याचा आपल्या मनाशी अंतर्मुखाने शोध घ्यावा व जे कार्य आपले जीवनकार्य आहे असा अंतकरणापासून संदेश मिळेल ते कार्य प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे, तनमनधनपूर्वक व परमेश्वारार्प्नण बुद्धीने करावे. माणसाने आपण निमित्तमात्र आहोत अशी मनाशी धारणा ठेवावी. म्हणजे जीवनाचा खरा हेतू माणसाच्या लक्षात येवून उगवत्या दिवसांचे प्राप्त कर्तव्य निर्लेप राहून करता येते व जीवन्मुक्त अवस्थेतील आपली वाटचाल अधिक सुकर होते ! 

कृष्णाजी केशव कोल्हटकर



Ganesh K Avasthi
Blog Admin

पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २ - ३ - ४  : समाधिपाद - साधनपाद - विभूतीपाद - कैवल्यपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १४

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १५ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १६ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १७ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २०

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २१ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २२ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २३ 

 




Post a Comment

0 Comments