ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस २
सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी
माझे निवेदन ( गणेश किशोर अवस्थी ) :समाधिपाद हे प्रकरण सुरु करण्याआधी मला काही सूचना करणे अनिवार्य वाटत आहे ! ग्रंथ परिचय हि संकल्पना सुरु करण्यामागे शुद्ध हेतू हा फक्त वाचकांना शाश्वत आनंदाच्या सूत्रांकडे नेण्याचा आहे ! आई - वडील - भगिनी यांच्याकडून प्रेरणा घेवून लहानपणात सुरु झालेल्या वाचन प्रवासात अनेक कादंबरी - चरित्रे - आत्मचरित्रे - ग्रंथ - शास्त्रे वाचनात आले, एकाच ग्रंथाच्या विवध लेखकाने आपल्या स्वानुभवाद्वारे केलेले लेखन वाचनात आले व हे सुख मी मनमुरादपणे उपभोगले आहे ! प्रत्येकाच्या जीवनप्रवासात अनिवार्य असलेले सुख-दुःख आपणास शाश्वत आनंद शोधण्याच्या प्रक्रीयेकडे नैसर्गिकरीत्या नेत असते ! मीदेखील ह्या प्रवासाला अपवाद नसून ह्या प्रवासात अनेकवेळा आस्तीकतेकडून नास्तिकतेकडे व पुन्हा नास्तीकतेकडून आस्तिकतेकडे जाण्याच्या प्रकृतीच्या खेळात घायाळ होवून आता पुन्हा नास्तिक होणे नाही पर्यंत येवून पोहोचलो आहे ! ह्या वाचनप्रवासात काही अनमोल असे शास्त्र ग्रंथ अनेकवेळा वाचनात आले व स्वानुभवाने असे नमूद करावेसे वाटते कि कित्येक ब्रह्मज्ञानी तपस्वी ऋषी - ब्रह्मर्षी - महर्षी - योगी - तत्वचिंतक - दार्शनिक अथवा तुम्ही त्यांस अजून काही एक नावाने संबोधा ह्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे निस्वार्थपणे आपल्या पुढील पिढीस शाश्वत आनंद मिळावा ह्या एकमात्र निर्मळ हेतूने महान अशा ग्रंथ संपदेची निर्मिर्ती करण्यासाठी अर्पण केले आहे ! हे करत असतांना त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या उत्कर्षाचा विचार केला आहे हे आपण समजून घेतले पाहिजे ! ह्या ग्रंथसंपदेस कोणाही जात - धर्म -पंथ यांच्या उत्कार्षासाठीचा उपद्व्याप समजण्याचा प्रयत्न म्हणजे महासागरास बांध घालण्याचा निरर्थक खटाटोप म्हणावा लागेल ! अवघड विषय व क्लीष्ट भाषेचा अडसर नक्कीच ह्या ग्रंथसंपदेस वाचतांना येण्याची दाट शक्यता असते ! परंतु शाश्वत आनंदाचा शोध ह्या महत ध्येयाला समोर ठेवून चिकाटीने प्रयत्न केल्यास अवघड विषय व क्लिष्ट भाषेचा अडसर हळूहळू दूर होण्यास नक्कीच मदत होते ! ह्या प्रयत्नांना अजून सोपे करण्यासाठी व स्वतःच्या प्रयत्नांना वाढविण्यासाठी मी ग्रंथपरिचय ही ब्लॉग मालिका सुरु करण्याचे ठरविले असून ह्याची सुरवात पातंजल योगदर्शन ह्या अनमोल अशा ग्रंथापासून करीत आहे ! दिवस १ चा ब्लॉग यात लेखकाची माहिती, प्रकाशकाचे मनोगत व लेखकाचे आत्मनिवेदन अशा साधारण २० पानांचे सारांश १ ब्लॉग मध्ये केले आहे !
दिवस २ साठी सारांश लेखन करीत असतांना काही सूचना देणे अनिवार्य वाटत असल्याने दिवस २ ची सुरवात अनिवार्य सुचनांनी करत आहे !
सूचना खालीलप्रमाणे !
१) आधी नमूद केल्याप्रमाणे सदर खटाटोप फक्त वाचकांना शाश्वत आनंदाच्या सूत्रांकडे नेण्याचा आहे !
२) ग्रंथसंपदेस कोणाही विशेष जात - धर्म -पंथ यांच्या उत्कार्षासाठीचा उपद्व्याप समजण्याचा प्रयत्न करू नये ही नम्र विनंती !
३) मला कोणत्याही बौद्धिक अहंकार वाढविणाऱ्या शुष्क वादविवादात काहीही स्वारस्य नसून मी अशा प्रकारच्या वादविवादासाठी अल्पबुद्धी आहे असे समजून आपला विजय गृहीत धरावा ही नम्र विनंती ! शुद्ध हेतूने होणाऱ्या चर्चेचे स्वागत आहे !
४) कोणत्याही ग्रंथ रचनेस समजून घेण्यासाठी एका पूर्वनिकषाची आवश्यकता असते त्यामुळे कोणाही वाक्यास समजून न घेता आपल्या स्तरावर त्याचा अर्थ लावल्यास आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते याचे कायम स्मरण ठेवावे !
५) प्रत्येक लेखकाची भूमिका समजून घेण्यासाठी वाचकास आपला स्वजात -धर्म - पंथ अभिमान ह्यास काही वेळ बाजूला ठेवणे व त्यासोबतच विषयाचा गांभीर्याने अभ्यास अनिवार्य असतो व तो नसल्यास लेखकाच्या भुमिकेचा विपर्यास होतो !
६) मी ग्रंथाच्या मूळ विषयातील फक्त सारांश लिहण्याचा प्रयत्न करणार आहे ! लेखकाचे जे लिखाण समस्त मानवजातीच्या उत्कर्षासाठी अडसर ठरू शकते असे माझ्या अल्प्बुद्धीस वाटत असेल तर त्या लिखाणास मी माझ्या सारांशासाठी निरुपयोगी समजतो !
७) माझ्या अल्प्बुद्धीस काही सूचना - मार्गदर्शन करण्याची गरज भासत असल्यास त्याचे मी स्वागत करतो !
८) ग्रंथ परिचयासाठी हाथी घेतलेला प्रथम ग्रंथ म्हणजे सविवरण पातंजल योगदर्शन ज्याचे लेखक कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी ह्या ग्रंथाच्या सुरवातीस तब्बल १५४ पानांची आपली भूमिका मांडली असून त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी आधीच नमूद केल्याप्रमाणे अनेक ग्रंथांचा गांभीर्याने अभ्यास अतिआवश्यकआहे त्यामुळे वाचकांनी ह्या १५४ पानांकडे दुर्लक्ष केले तरी चालणार आहे !
धन्यवाद !
गणेश किशोर अवस्थी.
ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस २
सारांश :- गणेश किशोर अवस्थी
१) योग शास्त्र हे अनुभवाचे शास्त्र आहे !
२) कोणाही माणसाने योग्य दिशेने सतत प्रयत्न केल्यास त्याची योगात प्रगती होईल ! योगशास्त्राबद्दलच्या अनेक भ्रामक कल्पनांचे निरसन होईल व शेवटी मनस्वास्थ्य, आरोग्य व आत्मसाक्षात्कार ह्यांचा लाभ करून देणारे हे शास्त्र आहे अशी त्याची निश्चिती होईल !
३) आत्मसाक्षात्कार पौरुष प्रयत्नांनी लवकर होणे शक्य आहे !
४) ज्ञानाची अल्पता असल्यामुळे चित्ताची ओढ सर्वस्वी विषय उपभोगाकडे असते व त्यामुळे सुख न मिळता दुखः जास्त मिळण्याची शक्यता असते !
५) श्रेष्ठतम सुखाची साधने :
* विहित कर्माचे निष्काम आचरण
* आत्मसाक्षात्कारी पुरुषांचा अनुग्रह
* ईश्वरभक्ती
* मोक्षशास्त्रांचे अध्ययन
* अष्टांगयोगाचे अनुष्ठान
Ganesh K Avasthi
Blog Admin
पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २ - ३ - ४ : समाधिपाद - साधनपाद - विभूतीपाद - कैवल्यपाद सारांश लेखन लिंक
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८
पातंजल
योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १४
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १५
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १६
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १७
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १८
पातंजल
योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १९
पातंजल
योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २०
पातंजल
योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २१
पातंजल
योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २२
पातंजल
योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २३
0 Comments