दिवस ११ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

दिवस ११ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

 

patanjal yogdarshan


दिवस ११ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी

साधनपाद:

अनित्याशुचिदुःखानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या॥२.५॥

दृग्दर्शनशक्त्योरेकात्मतेवास्मिता॥२.६॥

सुखानुशयी रागः ॥ २.७॥

दुःखानुशयी द्वेषः॥२.८॥

स्वरसवाही विदुषोऽपि तथारूढोऽभिनिवेशः॥२.९॥

अध्याय २ : साधनपाद : सारांश

१) बौद्धिक मूल्यांच्या बळावर विषयभोग उपभोगुन त्यांना अधिक भोगायची वृत्ती चित्तात प्रबळ होत असते ! 

२) समाजात वैचारिक मुल्यामुळे ज्या कल्पना, भावना, संकेत, सामाजिक परीस्थिती अथवा नीतीनियम निर्माण झालेले असतात त्यामुळे व्यक्तीच्या भोगवासनांना नियंत्रण घालणे अपरिहार्य होवून जाते ज्यामुळे दोन मनोवृत्तींचा संघर्ष निर्माण होतो ! 

३) व्यक्ती हा समाजापेक्षा दुर्बल असतो त्यामुळे त्यास आपले मनोविकार-वासना दाबून ठेवाव्या लागतात ह्याच विच्छिन्न वासना होय !

४) ह्याच विच्छिन्न वासना दीर्घकाळाने तनु अवस्थेत पर्यावर्तीत होतात !

५) अशा वासनांची पुर्तता न झाल्यामुळे त्या दडपलेल्या अवस्थेत अनेक प्रकारच्या मनोविकृतिच्या रूपाने परिणाम पावत असतात !

६) अंतकरणाच्या विकासाच्या ह्या प्रवासात बुद्धी अशा एका टप्प्यावर येवून पोहोचते कि त्या ठिकाणी अध्यात्मिक मुल्ये रुजू लागतात ! मनाला एक निश्चित दिशा मिळते कि कितीही भोग भोगले तरीदेखील मन काही केल्या तृप्त व संतुष्ट होत नाही उलट भोगवासना अधिक प्रबळ बनतात !

७) विषयप्रवृत्ती किंवा मनोविकार ह्यांना आवरण्यात आपले अंतिम कल्याण आहे अशी मनाची निश्चिती झाल्याने इंद्रीयांचा व मनाचा संयम मनुष्य स्वेछेने करत असतो !

८) एकदा का बौद्धिक मूल्यांचे पर्यावसन अध्यात्मिक मूल्यांकडे होऊ लागल्यास वासनांच्या खऱ्या संघर्षाला सुरवात होते ! चित्तात, शरीरात, मनात बौद्धिक अथवा मानसिक मुल्यांचा प्रभाव असेपर्यंत मनोवृत्तींचा संघर्ष हा भोगवासनांचाच संघर्ष असतो !

९)  अविद्या क्लेश :- जगातील अनित्य वस्तू ह्या नित्य आहे, अशुची (अशुद्ध ) शुची (शुद्ध) आहे, दुःखरूप वस्तू सुखरूप आहे, अनात्मभूत हेच आत्मभूत आहे असे विपरीत ज्ञान वाटणे यालाच अविद्या असे म्हणतात !
 
१०) अस्मिता क्लेश :- बाह्य जगताचे ज्ञान ज्याला होते ती चेतना व ज्याच्या द्वारे होते ते चित्त वस्तुता हे भिन्न आहे परंतु ते एकरूप भासतात ते अस्मिता ह्या क्लेशामुळे !
अस्मिता = मी आहे ! यात " आहे " पणा हा चेतनेचा धर्म असून " मी " पणा हा चित्ताचे मुलभूत स्फुरण आहे !
 
११) तापून लाल झालेल्या लोखंडात आकार लोखंडाचा व उष्णता आणि तेज हि अग्नीची अशी वस्तुस्थिती असुनही ती अगदी एकरूप भासतात तसेच चित्त व चेतना हेदेखील अस्मिता ह्या क्लेशामुळे एकरूप भासतात !

१२) राग क्लेश :- सुखांचा अनुभव झाल्यानंतर हि सुखे व त्यांची साधने मला नेहमी प्राप्त असावी अशी आसक्ती - लालसा म्हणजे राग होय !

१३) द्वेष क्लेश :- दु:खाचा अनुभव झाल्यानंतर हे दुःख व त्यांच्या कारणांचा माझ्याशी पुन्हा कधीही सबंध येवू नये अशी चित्तातील भावना म्हणजे द्वेष होय !

१४) चित्त हे सत्व - रज - तम ह्या त्रिगुणांनी बनलेले असते ! निसर्गानुसार सत्व जसे निर्मल होत जाते तसतसे इंद्रियजन्य सुख हे वास्तविक सुख नाही याची प्रचीती येत जाते !

१५) अभिनिवेश क्लेश :- अविद्येमुळे मी शरीर आहे व हे शरीर कधीही मरू नये अशी जी वासना असते त्यास अभिनिवेश क्लेश असे म्हणतात !

१६) अविद्या - अस्मिता - राग - द्वेष - अभीनिवेश हे पांच क्लेश चित्तात संस्काररूपाने कायम अस्तित्वात असतात !  

१७ ) जोपर्यंत हे ५ क्लेश अस्तित्वात असतात तोपर्यंत मनुष्य शाश्वत  आनंदाला प्राप्त करू शकत नाही !


Ganesh K Avasthi
Blog Admin

पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २  : समाधिपाद - साधनपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०


Post a Comment

0 Comments