ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ६

ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस ६

patanjal yogdarshan

 ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस  ६

सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी

समाधिपाद :

तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् ॥१.१६ ॥

वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् संप्रज्ञातः ॥१.१७॥

विरामप्रत्ययाभ्यासपूर्व: संस्कारशेषोSन्यः ॥१.१८॥

अध्याय १ : समाधिपाद : सारांश 

१) आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला फलरूप जे परवैराग्य प्राप्त होते त्याचे स्वरूप ह्या श्लोकात आहे !
२) योग्याचे चित्त असंप्रज्ञात समाधीत वृत्तीशुन्य व संस्कारशेष अशा भावास प्राप्त झालेले असते !
३) आत्मसाक्षात्कारी योग्याच्या चित्तात सत्व - रज -तम ह्या ३ गुणांविषयी अनासक्ती निर्माण होते त्यास परवैराग्य असे म्हणतात !
४) संप्रज्ञात समाधी व त्याचे ४ भेद :

संप्रज्ञात समाधी : 

समाधीच्या अभ्यासबलाने वितर्क - विचार - आनंद - अस्मिता ह्या भावांनी जी समाधी साध्य होते ती संप्रज्ञात समाधी होय ! ह्या समाधीचे ४ भेद आहे ते खालील प्रमाणे !

१) सवितर्क समाधी : समाधीच्या अभ्यासाला साधक प्रथमच आरंभ करतो तेव्हा त्याने निर्जन - शांत व मनाला आवडणारे स्थळ पहावे. बसण्याचे आसन अति उंच नको व अति सखल नको. शरीर - मस्तक - मन यांस बाक येणार नाही याची काळजी घ्यावी ! बसण्यास सुखकारक असे कोणतेही आसन ( मांडी ) घालावे. प्रसन्न व सुंदर अशा वातावरणात चित्त एकाग्र करण्यासाठी एक कोणताही सुखकारक असा स्थूल असा विषय निवडावा ( मूर्ती अथवा आवडीची कोणतीही गोष्ट ) व एक नाम - मंत्र घेवून (ॐ) हा मंत्र आपल्याच कानांनी आपणास स्पष्ट ऐकू येईल अशा आवाजात त्या स्थूल विषयावर वर चित्त एकाग्र करून जप करावा ! असे केल्याने साधक एक तन्मयता प्राप्त करतो म्हणजेच बाह्य विषयांच्या मदतीनेच तो चित्त एकाग्र करतो यालाच सवितर्क समाधी असे म्हणतात ! सवितर्क समाधी चित्तवृत्ती निरोधाच्या अभ्यासाचा प्रारंभ आहे !

२) सविचार समाधी : सवितर्क समाधीच्या दीर्घ व् सततच्या अभ्यासाने चित्ताला एकाग्र करण्यासाठी कोणत्याही स्थूल विषयाची गरज व विशेष स्थानाची गरज राहत नाही ! मनामधे कोणत्याही सूक्ष्म विचारावर एकाग्रता करता आली कि त्यास सविचार समाधी असे म्हणावे ! अशा रीतीने साधक जाता,येता, उठता, बसता, काम करताना देखील सविचार समाधीचा अनुभव घेवू शकतो ! यामुळे चित्तातील चंचलता जावून त्यास एक श्रेष्ठ सुखाची जाणीव होते ज्यापुढे त्यास इतर कोणत्याही सुखाची किंमत शून्य वाटते ! कोणत्याही मोठ्या दुखाने त्याचे चित्त विचलित होत नाही !

३) सानंद समाधी :  सविचार समाधीच्या दीर्घ व सततच्या अभ्यासाने कोणत्याही बाह्य स्थूलविषयांशिवाय चित्तास आनंद प्राप्त होतो व हा आनंद इंद्रिय - विषय यांच्या संयोगाने मिळणाऱ्या कोणत्याही आनंदापेक्षाहि श्रेष्ठ आहे, हाच आत्मानंद आहे व माझा मूळ स्वभाव हा आनंदच आहे अशी प्रचीती त्यास येते ! ह्या चित्ताच्या अवस्थेस सानंद समाधी असे म्हणतात !

४) सस्मित समाधी : सानंद समाधीच्या दीर्घ व सततच्या अभ्यासामुळे प्राप्त होणाऱ्या आनंदवृत्तीचा देखील थोडाशा प्रयत्नाने उपशम ( निरोध ) केला जातो म्हणजेच सस्मित समाधीची सुरवात होते ! ह्यात साधक विषयवासना शून्य वृत्तीचा म्हणजे मूळ शुद्ध अस्मिता वृत्तीचा असतो !

असंप्रज्ञात समाधी हेतू  व स्वरूप : 

१) सस्मित समाधीपर्यंत मी आहे ह्या सूक्ष्म वृत्तीशिवाय सर्व वृतींचा निरोध झालेला असतो !
२) मी आहे ह्या वृत्तीचाही निरोध झाला म्हणजे सव वृत्तींचा निरोध झाला असे म्हणता येईल व योग पूर्ण अवस्थेला गेला हे सिद्ध होईल !
३) सस्मित समाधी नंतर योग्य स्थळी, योग्य काळी आसनादी योगागांच्या साह्याने योगाभ्यास करून हळूहळू मी आहे ह्या वृत्तीचाही विरामअभ्यास करावयाचा असतो जो असंप्रज्ञात समाधीस कारण असतो !
४) यात चित्त द्रष्टा स्वरूपाने अवस्थित होतो व केवळ संस्कारमात्र म्हणून शेष राहते ! 

Ganesh K Avasthi
Blog Admin


पातंजल योगदर्शन : अध्याय १ - २ - ३ - ४  : समाधिपाद - साधनपाद - विभूतीपाद - कैवल्यपाद सारांश लेखन लिंक 

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस १

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस २

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ३

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ४

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ५

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ६

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ७

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ८

पातंजल योगदर्शन : अध्याय १ : समाधिपाद : दिवस ९

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १०

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस ११

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १२

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १३

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १४

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १५ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १६ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस १७ 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : दिवस 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २०

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २१ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २२ 

पातंजल योगदर्शन : अध्याय ३ : विभूतीपाद : दिवस २३ 

 


Post a Comment

2 Comments