निरोपाचा खेळ अपूर्ण, पण देशाच्या सुरक्षेचा इशारा कायम: एका योद्ध्याची सडेतोड निवृत्ती !
निरोपाचा खेळ अपूर्ण, पण देशाच्या सुरक्षेचा इशारा कायम: एका योद्ध्याची सडेतोड निवृत्ती!
एखाद्या मोठ्या लष्करी अधिकाऱ्याची निवृत्ती म्हटली की, शानदार संचलन, औपचारिक सन्मान आणि एखाद्या निवांत गोल्फच्या खेळाचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. ३१ ऑक्टोबरला निवृत्त होणारे भारताचे हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांच्यासाठीही, पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या लोक कल्याण मार्गावरील 'एअर फोर्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स'मध्ये अशाच एका गोल्फच्या डावाचे नियोजन करण्यात आले होते. सोमवारपासून हा १८-होलचा गोल्फ कोर्स अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आणि एका दिग्गजाचा निरोपाचा खेळ अनपेक्षितपणे रद्द झाला.
एअर फोर्स गोल्फ कोर्सच्या जागेवर ताबा मिळवण्याच्या सरकारच्या कारवाईपेक्षाही, या कारवाईसाठी निवडलेल्या 'वेळेवरून' (Timing) आता अनेक प्रश्न आणि संशय निर्माण होऊ लागले आहेत. ३१ ऑक्टोबरला निवृत्त होणारे हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांच्या निरोपाचा पारंपरिक गोल्फ खेळ नेमका याच लोक कल्याण मार्गावरील 'एअर फोर्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स'मध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, नेमक्या याच वेळी सरकारने सोमवारपासून हा गोल्फ कोर्स अनिश्चित काळासाठी बंद करून निरोपाचा कार्यक्रम अनिश्चिततेच्या भोवऱ्यात ढकलला आहे. या अनपेक्षित कारवाईमुळे सरकारच्या हेतूवर आणि टायमिंगवर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
हवाई दल प्रमुख हे परंपरेने या गोल्फ कोर्सचे 'पॅटर्न-इन-चीफ' (मुख्य संरक्षक) असतात. देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला त्यांच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर निरोपाच्या परंपरेपासून असे वंचित राहावे लागणे, ही बाब अनेकांना खटकणारी ठरत आहे. खुद्द बातमीतही नमूद केल्याप्रमाणे, या कारवाईची वेळ निवर्तमान हवाई दल प्रमुखांसाठी यापेक्षा अधिक वाईट असूच शकत नव्हती. त्यामुळे, ही कारवाई खरोखरच केवळ जमिनीच्या सर्वेक्षणाचा एक भाग आहे, की यामागे काही वेगळे कारण आहे, असा संशय साहजिकच व्यक्त केला जात आहे.
सरकारचे 'लँड अँड डेव्हलपमेंट ऑफिस' (L&DO) जरी याला लुटियन्स झोनमधील सरकारी जमिनींवर ताबा मिळवण्याच्या मोहिमेचे एक पाऊल मानत असले, तरी या कारवाईची अचानक वाढलेली गती संशयाला बळ देते. याआधी १३ नोव्हेंबर २०१७ मध्येही या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससह १५० एकरांवरील इतर पाच मालमत्तांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, पण त्यानंतर हे प्रकरण बासनात गुंडाळून ठेवण्यात आले होते. अनेक वर्षे प्रलंबित असलेली ही फाईल आताच, हवाई दल प्रमुखांच्या निवृत्तीच्या अवघे काही दिवस आधी अचानक का उघडली गेली आणि सर्वेक्षणाच्या नावाखाली कोर्स थेट बंदच का करण्यात आला, याचे कोणतेही समाधानकारक उत्तर अद्याप समोर आलेले नाही. कारवाई योग्य असली तरी, त्यासाठी निवडलेल्या या वादग्रस्त वेळेमुळे संपूर्ण प्रकरणाला एक संशयास्पद किनार लाभली आहे.
हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांची काही गंभीर आणि महत्त्वाची विधाने:
हवाई दल प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळताना ए. पी. सिंग यांनी देशाच्या सुरक्षेबाबत काही अत्यंत स्पष्ट आणि गंभीर इशारे दिले होते, जे अलीकडे खूप चर्चेत राहिले:
'आत्मनिर्भरता' आणि राष्ट्रीय सुरक्षा: त्यांनी स्पष्ट केले होते की संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भर भारत' (स्वदेशीकरण) खूप महत्त्वाचे आहे, परंतु केवळ स्वदेशी विमानांची वाट पाहत आपण राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करू शकत नाही. (स्वदेशी 'तेजस' लढाऊ विमानांच्या उत्पादनात आणि वितरणात होणाऱ्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे रोखठोक मत मांडले होते).
चीनचे वाढते आव्हान: चीन अत्यंत वेगाने आपले तंत्रज्ञान, शस्त्रसामग्री आणि हवाई ताकद वाढवत आहे. त्यांच्याशी बरोबरी करण्यासाठी भारताला आपली संरक्षण निर्मिती आणि क्षमता वेगाने वाढवणे गरजेचे आहे.
पाकिस्तानची लष्करी तयारी: पाकिस्तान शांत बसलेला नाही; ते देखील आपली हवाई ताकद वाढवत असून नवीन विमाने आणि तंत्रज्ञान आयात करत आहेत. त्यामुळे भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांची घटती संख्या (Squadron strength) वेळेत भरून काढणे अत्यंत आवश्यक आहे.


0 Comments