नाशिककर सावध व्हा !

नाशिककर सावध व्हा !

 


नाशिककर सावध व्हा !

भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या मध्य प्रदेश मधील इंदोर शहरातील भागीरथपुरा भागात आतापर्यंत ड्रेनेजयुक्त पाणी पिल्यामुळे १६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ! ११०० वर आजारी असल्याची नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे !  गेल्या अनेक दिवसापांसून येथील नागरिक दुषित पाण्याची तक्रार सबंधित विभागाकडे करत होते परंतु अत्यंत कार्यक्षम अशा मुर्दाड प्रशासनाने त्याची दखल काही घेतली नाही ज्यामुळे आज इतकी मोठी किंमत तेथील नागरिकांना चुकवावी लागली आहे ! ह्या प्रशासकीय हत्येला दाबण्यासाठी मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला  २ लाख रु. देवून व ४-५ अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचा फार्स करून वातावरण शांत करण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न करण्यात आला आहे व त्यात राज्य सरकार नक्कीच यशस्वी होईल यात मला शंका नाही ! कारण भारतीय समाज मानसिकता हि कसाई खान्यातील खुराड्यात कत्तलीसाठी कोंबलेल्या कोंबड्यासारखी आहे ! जोपर्यंत दुसऱ्या कोंबडीची मान मोडली जात आहे तोपर्यंत खुराड्यातील प्रत्येक कोंबडी स्वतःला सुरक्षित समजत असते व डोळे बंद करून शांतपणे दाणे टिपत असते ! स्वतंत्र झाल्याच्या ७८ वर्षानंतरही भारतातील नागरीकांना  दुषित पाण्यामुळे आपले प्राण गमवावे लागत आहे यापेक्षा लाजिरवाणी मोठी गोष्ट ती काय असू शकते ? जोपर्यंत राज्यकर्त्यांचे - अधिकाऱ्यांचे कुटुंबीय अशा दुर्घटनेत आपला जीव गमावत नाही तोपर्यंत ह्या देशातील सामान्य नागरिकांच्या प्रशासकीय हत्या होत राहतील  ! कारणे वेगवेगळी असतील इतकेच !

असो नाशिककरांनी वेळीच सावध होणे यासाठी आवश्यक आहे की गेल्या काही वर्षांपासून नाशिक मध्ये देखील दुषित पाणी पुरवठ्याच्या बातम्या वारंवार येत असून यावरून नागरिकांनी - सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने देखील केली आहे व ज्याचे वार्तांकन सर्वच वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी केले आहे ! विशेष करून सिडको ज्यास नवीन नाशिक म्हणून ओळखले जाते येथेदेखील ड्रेनेज युक्त पाणी व अळ्या असलेल्या पाण्याचा पुरवठा झाल्याच्या बातम्या २०२५ मध्ये दाखविण्यात आल्या आहे ! काही विभागामध्ये संतप्त नागीरीकांनी सबंधित जबाबदार अधिकारी दालनांत दुषित पाणी ओतून आंदोलन देखील केले होते ! 

 दत्तक घेवून बेवारस सोडून दिलेल्या नाशिककरांना आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी स्वतः घ्यावी लागणार आहे ! वेळोवेळी पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष देवून त्याची वेळेवर दखल घेण्यास सबंधित यंत्रणेस भाग पाडल पाहिजे ! त्यासाठी त्या त्या भागातील समस्त नागरिकांनी एकत्र येवून आक्रमकपणे लोकप्रतिनिधीला धारेवर धरून आपल्या समस्येचे वेळेत निराकरण करून घेतले पाहिजे ! विनंती अर्ज फाटे करून मुर्दाड प्रशासन - राज्यकर्ते दाद देत नसतील तर पुढील वेळी दुषित पाणी फक्त अधिकारी दालनांत न ओतता ते त्यांच्या घशात ओतावे त्याशिवाय आपली भ्रष्ट -मुजोर- सुस्त यंत्रणा जागी होणार नाही ! इंदोर मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती नाशिक मध्ये होऊ नये याची काळजी प्रशासनास घेण्यास भाग पडण्याची जबाबदारी समस्त नाशिककरांची आहे !


Ganesh K Avasthi
Blog Admin










Post a Comment

0 Comments