मत कोणाला ?

मत कोणाला ?

 


मत कोणाला ?

दुर्जन होतील शिरजोर । आपुल्या मताचा मिळता आधार ।
सर्व गावांस करितील जर्जर । न देता सत्पात्री मतदान ॥

- तुकडोजी महाराज -

प्रत्येक विवेकशील व सुज्ञास पडलेला गंभीर असा प्रश्न ! कि मत कोणाला ? चला मी तुमची थोडी मदत करतो !
आणि हो महत्वाचे म्हणजे हा लेख विवेकशील व सुज्ञ मतदारांसाठी आहे !
जात - धर्म - पंथ - प्रांत - भाषा अशा अनेक पशुतुल्य पाखंडी अस्मितांच्या आधारावर मतदान करणारे माझ्या लेखी विवेकशील व सुज्ञ नाही !

काही महत्वाची सूत्रे कायमची समजून घ्या !

राजकारण हा जगातील सगळ्यात गलिच्छ व्यवसाय असून त्याच्याशी सबंधित ९९ % लोक हे "सर्वअवगुणसंपन्न" भ्रष्ट आहे ! आपल्याला कमीत कमी "सर्वअवगुणसंपन्न " व्यक्तीची निवड करावयाची आहे जी आपले कमीत कमी शोषण करेल !

आजचे प्रमुख पक्ष म्हणजे कॉंग्रेस व भाजपा यांच्या जन्मदात्यांचे उद्देश कधीच धुळीस मिळाले असून आज  कॉंग्रेस जर ढोंगी धर्मनिरपेक्षतेच अपत्य आहे तर भाजपा पाखंडी राष्ट्रवादाच अपत्य आहे ! बाकीचे पक्ष हे कौटुंबिक मालकी हक्काचे प्रा.ली. मर्कटलीला कंपनी सारखे असून जास्त बहारदार फळे असलेला वृक्ष बघून ते इकडून तिकडे युत्या - आघाड्या - बिघाड्या  करत असतात ! यांचे मालक चालक स्वताच्या रक्ताच्या लोकांचे होत नाही ते देशाचे - जनतेचे - समाजाचे - कार्यकर्त्यांचे काय होणार ! यांचे महत्वाचे राजकीय शस्त्र म्हणजे जात - धर्म - पंथ - प्रांत - भाषा यावर आधारित अनेक प्रकारचे पाखंडी भावनिक अस्मितावाद !

बाकी सर्वच पक्षांच्या पदरी आपले वैयक्तिक आर्थिक-समाजिक-राजकीय हित जोपासणारे ढोंगी पुरोगामी - लेखक - समाजसेवक - विचारवंत - पत्रकार - आंदोलक - धर्मगुरू असे  पांढरपेशा असणारे पाळीव असतात ! त्यांना फार महत्व देण्याचे काही कारण नाही !  

हि सूत्रे वाचल्यावर आपणास यक्ष प्रश्न पडेल कि मग मी मतदान करू कि नको ?

मतदान तर करायलाच हवे ! महानगरपालिका मतदान करतांना राष्ट्रासमोरचे गहन प्रश्नांचा फार विचार न करता आपले व समाजाचे  कमीत कमी शोषण कोणाकडून होणार आहे याचा गंभीर विचार करून आपण मतदान करा !

आपल्या प्रभागातील मुख्य प्रश्न जे आपल्या दैनंदिन जीवनाशी सबंधित आहे जसे कि माणसांना पिण्यायोग्य मुबलक पाणी, पावसळ्यात न तुंबणारी गटारे, चालतायेणे योग्य रस्ते व पथदीप, गुन्हेगारी - टवाळखोरी, परिसरातील स्वच्छता, परिसरात अवैध व्यवसाय, बेफाट झालेली अतिक्रमणे ई.  यांची सद्वय अवस्था व त्या सुधारण्यासाठी  माजी नगरसेवकांनी केलेली कामे यांचा हिशोब नक्कीच लावा ! विद्यमान नगरसेवक या सगळ्या बाबतीत नालायक ठरत असेल तर नवीन चेहर्याला संधी देवून सत्तेच्या अहंकारासुराला घरी बसवा ! नवीन चेहरा पण लायक वाटत नसेल तर N.O.T.A  बटन दाबा ! परंतू मत वाया नको म्हणून  अमुक पक्षाला मत किंवा निवडून येण्याची क्षमता पाहून मत असे बाष्कळ पारंपारिक निकष न वापरता  आपले व समाजहित लक्षात घेवून मतदान करा !


Ganesh Avasthi

Ganesh K Avasthi
Blog Admin 





Post a Comment

0 Comments