What is Stock Dividend ? How Stock Dividend works ?
विशेषकरून कोरोना महामारी नंतर सर्वच वयोगटातील लोकसंख्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ? कोणत्या कंपनीच्या शेअरचा आजचा भाव काय आहे ? कोणता म्यूचअल फंड सर्वात चांगला आहे ? म्यूचअल फंड घ्यावा कि एस.आय.पी (SIP - systematic investment plan) ? अशा शेअर मार्केट संबंधीच्या चर्चा जागोजागी करतांना दिसत आहे !
परंतु आवश्यक अशा माहितीच्या अभावामुळे आजही नवीन गुंतवणूकदार हा आपले नुकसान करून घेतांना दिसत आहे हेदेखील तितकेच खरे आहे ! कोणत्याही क्षेत्रात झटपट पैसे कमवून श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात कित्येकांनी आपले घरदार रस्त्यावर आणले आहे याची माहिती आपण रोजच पाहत – बघत – ऐकत असतो !
पैसे गुंतवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि शेअर बाजार हा त्यापैकी एक उत्तम मार्ग आहे. परंतु पूर्ण अभ्यासाअभावी शेअर मार्केटचा विचारसुद्धा कुणीही डोक्यात आणू नये ! रोज ५००० रुपये कमवा, १ वर्षात करोडपती व्हा असल्या भूलथापांना बळी न पडता कमीत कमी ६ महिने ते १ वर्ष पूर्ण अभ्यास करून, पेपर ट्रेडिंग करून आपल्या आर्थिक – मानसिक क्षमतेचा अभ्यास करूनच शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीचा विचार करा हि माझी कळकळीची नम्र विनंती आहे !
ह्या ब्लॉगद्वारे मी सर्वसामान्य वाचकांना शेअर मार्केटमधील गेल्या अनेक वर्षात शिकलेल्या काही गोष्टींची माहिती देणार आहे व हा लेख त्याचाच पहिला प्रयत्न आहे ! ज्यात dividend म्हणजेच लाभांश म्हणजे काय ? ( what is the meaning of dividend ? ) कोणत्या कंपनीचा शेअर dividend कधी वितरीत केला जातो? रेकॉर्ड डेट म्हणजे काय ? (what is record date for dividend ) अशा लाभांश संबंधातील अनेक महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकणार आहे !
लाभांश म्हणजे काय ?
What is the meaning of dividend ?
जेव्हा आपण एखाद्या कंपनीचां शेअर खरेदी करतो आणि कंपनीला आपल्या व्यवसायात नफा होतो तेव्हा त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढते. म्हणून जेव्हा एखादी कंपनी नफ्यात असते किंवा कंपनीला चांगला नफा होतो, तेव्हा कंपनी आपल्या नफ्यातील काही भाग आपल्या शेअरधारकांना लाभांशाच्या रूपात वाटून देते, त्याला लाभांश (dividend) असे म्हणतात. साधारण गोष्ट आहे की आपल्याकडे त्या कंपनीचा शेअर आधी असायला हवा तेव्हाच आपणास लाभांश (dividend) ( लाभ + अंश ) मिळतो !
उदाहरणार्थ, आपण असे गृहीत धरू की टाटा पॉवर कंपनीने प्रति शेअर 1 रुपये लाभांश (dividend) जाहीर केला आहे आणि आमच्याकडे टाटा पॉवरचे 10,000 शेअर्स आहेत, तर आम्हाला (10,000 X 1 = 10,000) 10,000 रुपये थेट आमच्या खात्यात लाभांश (dividend) म्हणून मिळतील.
लाभांशचे प्रकार !
Types of Dividend
1. हंगामी लाभांश – Interim dividend. : जेव्हा कंपनी आपला त्रीमासिक अहवाल जाहीर करते तेव्हा जो लाभांश दिला जातो त्याला हंगामी लाभांश Interim dividend असे म्हणतात !
2. अंतिम लाभांश – Final dividend. : जेव्हा कंपनी आपल्या आर्थिक व्यवसायाचे वर्ष संपल्यावर लाभांश देते त्यास अंतिम लाभांश Final dividend असे म्हणतात !
कंपन्या लाभांश कधी आणि कशा देतात ? When Are Stock Dividends Paid Out and How?
कंपनी लाभांश कधी जाहीर करते ? When company declares dividend?
अनेकांना प्रश्न पडतो कि कंपनी लाभांश कधी देते ? जेव्हा एखाद्या कंपनीला लाभांश द्यायचा असतो तेव्हा कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवले जाते की लाभांश किती व कधी द्यायचा आहे. काही कंपन्या अशा आहेत की त्या एका विशिष्ट महिन्यात लाभांश देत आहेत, नंतर त्या प्रत्येक वर्षी त्याच महिन्यात किंवा त्याच महिन्यात लाभांश देतात आणि काही कंपन्या अशा आहेत की त्या वर्षातून अनेक वेळा लाभांश देतात. चांगला लाभांश देणाऱ्या अशा कंपन्यांची यादी खाली दिली आहे.
Highest Dividend Paid out Shares!
- Indian Oil Corporation Ltd
- Rural Electrification Corporation Ltd
- Power Finance Corporation Ltd
- National Mineral Development Corporation Ltd
- Steel Authority of India Ltd
- Bharat Electronics Ltd
- National Thermal Power Corporation
- Union Bank of India
स्टॉक मार्केटमध्ये लाभांश कधी मिळतो ? When are dividends paid in stock market?
जी कंपनी लाभांश देणार आहे त्या कंपनीचा हा सर्वस्वी निर्णय असतो की ती लाभांश वाटप महिन्याला किवा ३ महिन्यात, ६ महिन्यात की वर्षात १ वेळेस देणार आहे ! अमुक कंपनी इतका लाभांश देणार आहे, अशा बातम्या अनेकवेळा समोर येतात, तेव्हा बरेच लोक त्या कंपनीचा शेअर विकत घेतात. परंतु तरीही त्यांना लाभांश मिळत नाही, असे का ? याचे एकच कारण आहे की जेव्हा एखादी कंपनी लाभांश जाहीर करते, तेव्हा त्या कंपनीने काही निकष ठरवून दिलेले असतात, त्या निकषांमध्ये बसणारे शेअरधारकांनाच लाभांश प्राप्त होतो ! त्यासाठी लाभांश जाहीर करण्यासंबंधित काही तारखांचा खेळ समजून घेणे अत्यावश्यक आहे !
Most important dividend dates.
Announcement dates: ह्या तारखेला कंपनी आपला लाभांश देण्याचे जाहीर करते!
Ex-dividend date: ही ती महत्वाची तारीख आहे ज्या तारखेच्या आतील शेअरधारकांना लाभांश मिळू शकतो! ह्या तारखेनंतरील शेअर खरेदीदारांना लाभांशसाठी अपात्र समजण्यात येते !
Record date: ह्या तारखेला कंपनी आपल्या रेकॉर्ड मध्ये तपासते की कोण लाभांशसाठी पात्र आहे!
Payment date: ह्या तारखेला लाभांश शेअरधारकाकडे जमा होतो!
आपल्याला लाभांश कोणत्या स्वरुपात मिळू शकतो ? When Are Stock Dividends Paid Out and How?
आपण आधी समजून घेतले कि कोणत्या तारखा ह्या अत्यंत महत्वपूर्ण आहेत, आता आपण हे पाहूया की आपल्याला लाभांश कोणत्या स्वरुपात प्राप्त होऊ शकतो !
2) Stock dividend - शेअर लाभांश = लाभांशच्या किमतीचे नवीन शेअर आपल्या खात्यात जमा होतात.
3) Asset dividend - संपत्ती लाभांश = स्थूल/भौतिक संपत्तीच्या रुपात लाभांश दिला जातो.
4) Scrip dividend – कंपनी भविष्यातील एका विशेष तारखेला रोख स्वरुपात लाभांश रक्कम आपल्या खात्यात जमा करते.
कंपनीला लाभांशाचा फायदा काय ? कंपन्या लाभांश का देतात ?
२०० % लाभांश म्हणजे काय ?
What is the meaning of 200% dividend?
डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय ? What is the meaning of dividend yield?
डिव्हिडंड यील्ड dividend yield ह्या गोष्टीला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे ! जितके जुने – नवे अभ्यासू गुंतवणूकदार लाभांशच्या माध्यमातून एक नियमितपणे उत्पन्न घेवू इच्छिता त्यांच्यासाठी dividend yield हा एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे ! कोणत्या कंपनीचा dividend yield किती आहे यावरून गुंतवणूकदार ठरवतात कि कोणत्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक केली पाहिजे !
उदाहरण : रिलायंस कंपनीचा dividend yield जर १.३९ % आहे तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की शेअरधारकाला गुंतवणुकीवर लाभांशच्या स्वरुपात १.३९% नियमित उत्पन्न मिळणार आहे !
dividend yield = (लाभांश / शेअर किंमत) × १००
उदाहरण : रिलायंसने ३२ रु लाभांश जाहीर केला व शेअरची किमत २३०० रु. आहे तर dividend yield किती ?
(३२ / २३००) × १०० = १.३९ %
परंतु जास्त dividend yield % असणे देखील एक चांगला पर्याय नाहीये ! कारण ज्या कंपनीचा dividend yield % जास्त असतो त्या कंपनीच्या शेअरकिमतीमध्ये आकर्षक अशी वाढ होतांना दिसून येत नाही ! ३ % ते १० % dividend yield बरा समजायला हरकत नाही !
0 Comments