दंगलीचे मुखवटेधारी पालक !
कोणतीही दंगल एका दिवसात होते का ? तर नाही, प्रत्येक दंगलीमागे एक नियोजन असते व दंगल माजवणाऱ्यांचे चेहरे चित्रीकरण-चित्र यांच्या माध्यमातून आपल्या समोर येत जरी असले तरी ते फक्त अभिनेते असतात ! दंगलीचे पालकत्व - निर्माते - कथालेखक - दिग्दर्शक कोण असतात ?
दिल्लीत सामान्य जनतेच्या जीविताची - मालमत्तेची हानी झाली त्याला कोण जबाबदार ?
ह्या समस्त प्रकाराला आपल्या बालवयात पाहणाऱ्या कोणत्याही जाती धर्माच्या मुलांच्या मनावर खोलवर एक द्वेषाचा विचार रोवल्यामुळे भविष्यात होणाऱ्या परीणामांची जबाबदारी कुणाची ?
ह्या दंगलीचे मूळ कोठे आहे ? भाजप सरकारने संविधानिक मार्गाने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा !
हा कायदा खरच भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व हिरावून घेतो का ?
ह्या जेमतेम 3 पानी मसुद्यातील तरतुदी न समजण्याइतक्या क्लिष्ट आहेत का ? तर नाही त्या मुळीच क्लिष्ट नाही !
जर मसुदा समजण्यासाठी क्लिष्ट नाहीये तर गेल्या 3 महिन्यापासून देशभरात इतक्या मोठ्या प्रमाणात गढूळ वातावरण निर्मिती केली गेली ती कशासाठी व कुणी ? 3 महिन्यापासून संपूर्ण देशाला अस्थिरतेकडे नेण्यामागचे मेंदूचं ह्या दंगलीचे मुखवटेधारी पालक आहेत !
ज्यांना मोदी पंतप्रधान होण्यामागे जागतिक व्यापक कटाचा वास येतो त्यांना तुम्ही कधी ह्या 3 पानी मसुद्याला समजावून सांगताना बघितले ??
अपघाती मृत पावलेले
न्यायाधीश लोया यांच्या हत्येचा शोध लवणार्यांना तुम्ही कधी हा 3 पानी मसुदा समजाऊन सांगतांना कधी पाहिलेत का ?
२०१४ नंतर पावसाळी बेडकाप्रमाणे प्रत्येक निवडणुकीआधी-नंतर आपल्या सोयीने EVM हॅकिंगची बोंब ठोकणाऱ्या तंत्रज्ञ-बुद्धिवंतांना हा 3 पानी मसुद्याला समजावून सांगतांना तुम्ही कधी पाहिलेत का ?
दिवसरात्र राफेल-राफेल जपमाळ जपणाऱ्या जनेउधारी ब्राह्मणाला हा 3 पानी मसुद्याला समजावून सांगतांना तुम्ही कधी पाहिलेत का ?
२०१४ नंतर अचानक अवतरलेल्या असहिष्णुतेच्या विरोधात पुरस्कार परत करणाऱ्या किती तथाकथित बुद्धिवंत-लेखक-कलाकारांना हा 3 पानी मसुद्याला समजावून सांगताना तुम्ही पाहिलेत ?
ज्यांच्या लेखी सगळेच राजकीय पक्ष हे भ्रष्टाचारी होते, प्रत्येक मोठ्या राजकीय नेत्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याकडे असण्याचा दावा करून नंतर जाहीर माफी मागण्याची नामुष्की ओढवलेल्यांना हा ३ पानी मसुदा समजावून सांगताना तुम्ही कधी पाहिलेत का ?
ढोंगी धर्मनिरपेक्षतेचे पांघरून ओढून एरवी गांधी-नेहरुंच्या शिंके मागचेदेखील कारणे शोधणाऱ्या समस्त ढोंगी गांधीवाद्यांना हा ३ पानी मसुदा समजावून सांगतांना कधी पाहिलेत का ?
फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेऊन कायम जातीयवादाची फोडणी देऊन पंतप्रधान होण्याची स्वप्न पहाणाऱ्यांना हा ३ पानी मसुदा कधी समजावून सांगताना तुम्ही कधी पाहिलेत का ?
लोकशाहीचा ४ था स्तंभ समजल्या जाणाऱ्या तैमुरच्या हागल्या-मुतल्याच्या ब्रेकिंग न्यूज मथळ्याखालीखाली बातमी देणाऱ्यांना तुम्ही कधी हा ३ पानी मसुदा समजावून सांगतांना पाहिलेत का ?
मुंबई बॉम्बस्फोटातील एक गुन्हेगार ज्याच्या सुटकेनंतर त्याच्या गळ्यात पडून पडून आपले प्रेम व्यक्त करणाऱ्या चित्रपटसृष्टीतील किती जणांना तुम्ही हा ३ पानी मसुदा समजावून सांगतांना पाहिलेत ?
बरे ह्या समस्त लोकांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर जाऊन अथवा त्यांच्या भाषणांचे चित्रीकरण - लेखणस्वरूपातील सर्व कचरा आपल्या प्रोफाईलवर फडकवीणाऱ्या त्यांच्या समर्थकांपैकी किती जणांना तुम्ही ह्या ३ पानी मसुद्याला समजाऊन सांगतांना तुम्ही पाहिलेत ?
एम-आय-एम नेते ओवेसी असो वा मौलवी यांचाकडेदेखील ह्या दंगलीचे पालकत्व जात असलेतरी ह्यांच्यापेक्षा जास्त मोठे गुन्हेगार ही मुखवटेधारी मंडळी आहेत ! आवेसींचे राजकारणच मुस्लिमधार्जिणे असल्याने ते उघड विचारशत्रू आहेत ! परंतु ह्या बाकीच्या मुखवटेधाऱ्यांचे काय ? ह्या दंगलीमधील मृत पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या रक्ताने ह्या समस्त मुखवटेधारी पालकांचे हात माखलेले आहेत ! काहींनी नीच हेतूने सोयीने मौन धरले तर काहींनी कायद्याबाबत गैरसमज पसरविण्यात धन्यता मानली !
ह्या समस्त मुखवटेधारी मंडळींनी घडलेल्या सगळ्या घटनांसाठी कपील मिश्राला आपला बळीचा बकरा बनविण्याचे ठरवले जे अपेक्षितच होते ! असे केल्याने स्वाभाविकपणे ह्यांचे कारस्थान लपले जाईल असा ह्या समस्त मंडळींचा गैरसमज आहे ! कपिल मिश्रा काय बोलला हे सगळ्यांसमोर आहेच ! एक आठवडयाअगोदर कपिल मिश्रा जे काही बोलला ते जर चिथावणीखोर वाटत असेल तर मागील ३ महिन्यात संपूर्ण देशात जिहादी मानसिकतेच्या मूलतत्त्ववादी लोकांनी जी जाळपोळ - लूटमार - हिंसेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत त्या चिथावणीखोर नाहीत काय ? कायदा विरोधी आंदोलनाच्या व्यासपीठावरून दिल्या जाणाऱ्या जिनावाली आजादीच्या घोषणा असो अथवा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा असो ह्या चिथावणीखोर नाही काय ? हिंदू-हिंदुत्वाला शिव्यांची लाखोली तर नवीन नाहीच ! की त्याचे विश्लेषण करण्यासाठी ही समस्त दंगलीची मुखवटेधारी पालक मंडळी विशेषणात्मक शब्दांच्या शोधात आहेत ? जर ह्या मंडळींना 3 महिन्यापासून सुरू असलेला व सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला देशविरोधी गोंधळ चिथावणीखोर वाटत नसेल तर हजारो वर्षांपासून नेहमीच फक्त बचावात्मक पवित्रा घेऊन मानवतावाद व आदर्शवादाची ओझे वाहणाऱ्या हिंदू समाजाला कपिल मिश्रा सारख्या अनेकांच्या भाषणांना चिथावणीखोर समजण्याचे काही एक कारण नाही !
प्रत्येक दंगलीनंतर मखलाशीसारखा दोन धर्मातील बंधुभावाचे उदाहरण देत आपला सामाजिक स्तर उंचविण्याचा प्रयत्नदेखील हेच दंगलीचे मुखवटेधारी पालक करणार व त्यात त्यांना बऱ्यापैकी यशदेखील प्राप्त होते ! परंतु नैतिक स्तराच काय ?
सर्वात मोठी लोकशाही ह्या गोंडस नावाखाली जे स्वातंत्र्य (स्वैराचार) ह्या देशातील प्रत्येक नागरिक उपभोगत आहे तितके स्वातंत्र्य जगाच्या पाठीवर अजून कुठे पहावयास मिळते ?
इतके स्वातंत्र्य व अधिकार देऊनही अशा घटना होत असतील तर याचा अर्थ एकच आहे की तुम्ही हे अनियंत्रित स्वातंत्र्य उपभोगण्याच्या योग्यतेचे नाही आहोत !
सर्वधर्मसमभाव व ढोंगी धर्मनिरपेक्षता हा विचार फक्त
बहुसंख्याकांच्या डोक्यावरील काटेरी मुकुट आहे जो जितक्या लवकर उतरवून फेकला जाईल तितके सुरक्षित भविष्य आपण आपल्या पुढील पिढीस देण्यास जबाबदार राहू !
1 Comments
वास्तविकतेशी सामना।।।।
ReplyDelete