मूळ प्रश्न : राष्ट्रगीतातील 'अधिनायक' या शब्दाबद्दल असलेला वाद काय आहे ?
माझे उत्तर :
सूचना : मला रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे !
वाद फक्त "अधिनायक" ह्या एकाच शब्दाबद्दल नसून "भारत भाग्य विधाता" ह्या शब्दावरून देखील आहे !
ह्या दोन्ही शब्दांना विरोध कारणाऱ्यांचा युक्तिवाद असा आहे की हे दोन्ही शब्द "तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सन्मानार्थ लिहले गेले आहेत !
ह्या वादाचे २ पक्ष आहेत : समर्थक व विरोधक !
समर्थकांचे म्हणने आहे की हा वाद निर्माण होण्यास तत्कालीन काही वृत्तपत्रे जबाबदार आहेत ! कारण त्यांनी पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन चुकीचे केले ! पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमामध्ये २ गाणे गायले गेले होते ! एक जण-गण-मन व एक दुसरे गाणे जे सन्मानार्थ गायले गेले !
विरोधक म्हणतात : काँग्रेसने रवींद्रनाथ टागोर यांच्यावर दबाव आणून ब्रिटिश राज्यकर्त्यांची खुशामत करण्यासाठी हे गाणे लिहून घेतले ! यातील "अधिनायक" आणि "भारत भाग्य विधाता" हा सन्मान पंचम जॉर्ज यांचा आहे कारण तेच तेव्हाचे राजे होते म्हणजे भारताच्या भाग्याचे विधाते होते !
रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः आरोपांचे खंडन केलेले आहे, परंतु विरोधक त्याला सारवा-सारव मानतात !
हे झाले समर्थक व विरोधक यांचे दृष्टीकोण !
आता मी माझे वैयक्तिक मत मांडतो !
मला रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे, परंतु गैरसमज निर्माण होण्यास स्वतः रवींद्रनाथ टागोर देखील जबाबदार असू शकतात ! 1919 मध्ये एका महाविद्यालयात त्यांनी जण-गण-मन गीत गाऊन व समजावून सांगितले, ते गीत त्या महाविद्यालयाच्या संस्थपकांना खूप आवडल्यामुळे त्यांनी त्या गीताला विद्यालयाची सकाळची प्रार्थना म्हणूंन निवडले !
रवींद्रनाथ टागोर यांनी महाविदयलयाच्या पाश्चात्य संगीताचे जाणकार यांच्यासोबत जण-गण-मन याचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला ज्याला "मॉर्निंग सॉंग ऑफ द इंडिया" असे नाव देण्यात आले !
आता ह्या गीताच्या इंग्रजी अनुवादामध्ये रविंद्रनाथ टागोर हे सर्वात शेवटी लिहतात
"व्हीक्ट्री टू द किंग ऑफ किंग्स, व्हीक्ट्री टू दी डिस्पेन्सर ऑफ इंडीयाज डेस्टिनी, व्हीक्ट्री, व्हीक्ट्री, व्हीक्ट्री !
आता असा अनुवाद कुणाही सामान्य शब्दप्रामाण्य मानणाऱ्याच्या डोक्यात शंका उपस्थित करायला पुरेसा आहे !
खरे तर आजचे राष्ट्रगीत हे ब्राह्मो समाजाच्या ५ परिच्छेद असलेल्या गीतामधील फक्त पहिला परिच्छेद आहे ज्यात अधिनायक अथवा भारत भाग्य विधाता हे परेमश्वराला उद्देशून लिहले गेले आहे !
अत्यंत सुंदर अशी याची रचना असून आज हा वाद पूर्णपणे निरर्थक आहे !
निर्भीड.कॉम
0 Comments