#सारे_तख्त_उछाले_जायेंगे_हम_देखेंगे !


#सारे_तख्त_उछाले_जायेंगे_हम_देखेंगे !


तुम्हाला काय वाटत आहे ? देशभरात एव्हढा गोंधळ जो चालू आहे तो थांबविणे सरकारला शक्य नाहीये ? आर्थिक-प्रशासनिक यंत्रणांवर पूर्ण ताबा असतांना विरोधक उपद्रवीनीं घातलेल्या उच्छादापुढे सरकार हतबल आहे असे तुम्हाला वाटते का ? जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही फारच भोळे आहात ! CAA-NRC_NPR विरोध आंदोलनाच्या नावाखाली ज्या प्रकारे विरोधकांनी धार्मिक भावनांचे राजकीय भांडवल केले आहे तेच तर सरकारचे ध्येय होते व ते सरकारने अगदी बेमालूमपणे साध्यदेखील केले आहे ! सरकारने स्वतः फार कष्ट न घेता आज विरोधकांना हिंदुत्व विरोधक म्हणून जनतेसमोर अपराधी ठरवले आहे ! सरकारने जे जाळे फेकले आहे त्यात तथाकथित सर्वच चाणक्य अडकले आहे व पुढच्या निवडणुकीपर्यंत ते जाळे अधिक घट्ट विणले जाणार असून आजचे सर्वच नायक २०२४ नंतर पुन्हा चिंतनासाठी प्रस्थान करतांना दिसतील ! ३७० कलम हटविल्यानांतर भारत देशात तिरंगा उचलायला कुणी उरणार नाही पूर्ण देश जळेल अशी गर्जना ठोकणारे आज कुठे आहे ? राम मंदिरामध्ये उभा केला जाणारा अडथळा कुठे आहे ?
सरकारने २०२४ साठी २०२० मधेच मतदार तयार करून घेतला आहे, जो रस्त्यांवर उच्छाद मांडताना तुम्हाला कधीच दिसणार नाही, अकांड-तांडव करतांना दिसणार नाही परंतु २०२४ मध्ये शांतपणे सरकारच्या बाजूने मतदान करून घरी पुन्हा "EVM मध्ये घोळ आहे" ह्या विरोधकांच्या मनोरंजक कार्यक्रमांचा अस्वाद घेतांना दिसेल !

Comments