Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

SHRI. NARAYAN DABHADAKR, WHO WINS TO DEATH !

 कलीयुगातील मृत्युंजयी ! नागपूर येथील रा.स्व.संघाचे 85 वर्षीय श्री. नारायण दाभाडकर हे कोरोनाने बाधित होते व त्यांच्यावर रुग्णालयात उपचारदेखील सुरू होते ! ते ज्या रुग्णालयात दाखल होते तिथे एक महिला  चाळीशीच्या वयातील एका रुग्णासाठी ऑक्सिजन बेड मिळावा म्हणून धावपळ करतांना त्यांच्या निदर्शनास आले ! त्यांनी या संपूर्ण घटनेला पाहून काय निर्णय घेतला असेल ?? ह्या 85 वर्षाच्या आजोबांनी घेतलेला निर्णय आजच्या काळात हा आपल्याला त्याग,समर्पण,सेवा काय असते हे शिकवून जाते ! आजोबांनी डॉक्टरांना बोलावून घेतले व सांगितले की मी माझे आयुष्य जगलो आहे, परंतु हा तरुण आहे जो जगला पाहिजे, माझा बेड ह्या तरुणाला द्या व त्याला जगवा ! आले न अंगावर काटे ! बसमध्ये प्रवास करतांना धडधाकट लोक आपली जागासुद्धा कुणाला लवकर देत नाही तिथे ह्या आजोबांनी आपल आयुष्यच त्या तरुणाला अर्पण करून टाकले ! आजोबांना घरच्यांनी व डॉक्टरांनी खूप संमजविण्याचा प्रयत्न केला परंतु आजोबांनी काही ऐकले नाही व आपला बेड आजोबा त्या तरुणाला देऊन घरी गेले ! परिणाम अपेक्षितच होता ! आजोबांचा घरी मृत्यू झाला ! जेव्हा ही घटना कळली तेव्हा एकच वा...

Hariyana's thief with humanity !

 #चोर_माणूस हरियाणा मधे एका हॉस्पिटलमधून कोविड लसच्या कूप्या चोरीला गेल्या ! परंतु चोराला याची कल्पना नव्हती की त्याने जे चोरल आहे ती कोरोना लस आहे. परंतू जेव्हा त्याच्या लक्षात आल की ह्या कोरोंनाच्या लस आहे तेव्ह्य त्याने तो सर्व मुद्देमाल एका चिट्ठीसह पोलिस स्टेशन मधे सुपुर्द केला ! ज्यात त्याने माफी मागितली आहे हे नमूद करून की त्याला माहीत नव्हते की ह्या कोरोंनाच्या लस आहेत ! एका चोराला देखील कोरोंनाच्या भीषणतेची व त्यामुळे होणाऱ्या सर्वच जनतेच्या हालअपेष्टाची जाणीव आहे जी समाजातील पांढरपेशा म्हणून मिरवीणाऱ्या परंतु ह्या संकटाच्या काळात देखील जनतेची लूट करण्याची एकही  संधी न सोडणाऱ्या मग ते औषधांचा काळा बाजार करणारे असो, अव्वाच्या सव्वा बिले लावणारी रुग्णालय असो, खोटे रिपोर्ट बनवीणारे लैब्स असो अथवा  रेमेडेसिविर इंजेक्शन मधे पाणी भरून विकणारे कुठल्याही पक्षाची टुकार कार्यकर्ते असो अथवा आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलूंन जनतेची पिळवणुक करणाऱ्या नालायक राज्यकर्ते असो यांना नाहीये ! ही  पांढरपेशा लोकांची यादी फार मोठी होऊ शकते ! असो चोरातल्या माणसाच कौतुक तर झालच पाहिजे ...

Dr. Fuad Halim ! True Hero who donates plasma for 7 times !

 #डॉक्टररूपी_देव डॉ. फुआद हलीम, कलकत्ता ! १ नाही, २ नाही , तब्बल ७ वेळा प्लाज्मा दान करून २१ गंभीर कोरोना रुग्णांचे प्राण वाचविणारा देवदूत ! डॉ. फूआद हे कलकत्ता येथे स्वास्थ्य संकल्प नावाचे आरोग्यकेंद्र चालवितात ! मागील वर्षी ते स्वतः कोरोनावर मात करुन स्वस्थ झाले ! मागील लॉकडाऊन काळात जनतेची होणारी आर्थिक ससेहोलपट पाहुन त्यांनी आपली चिकित्सा फी ३५० रु वरुन फक्त ५० रु केली व तब्बल ६२३१ रुग्णांनी याचा लाभ घेतला ! हे महाशय इथेच थांबले नाही ! तर त्यांनी मागील वर्षांपासून आतापर्यंत तब्बल ७ वेळेस आपला प्लाजमा दान करून २१ गंभीर कोरोना रुग्णांना जीवनदान दिले आहे ! आपल्या ह्या अतुलनीय कार्याची कुठल्याही प्रकारची देखावीबाजी नाही, जाहिरात नाही, स्वार्थ नाही  ! असे एक न अनेक कर्तृत्ववान व्यक्ती आपल्या समाजात आपल्या अवतीभोवती आहेत ज्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे !  ह्यांना प्रसिद्धी तर मिळालीच पाहिजे ! सलाम डॉ. फुआद हलीम तुमच्या कार्याला ! #मराठी #मराठीत #ब्लॉग #निर्भीड © https://nirbhid.com

सुंदर - सुखदायक - स्थिर - प्रज्ञ - जीवनदायिनी गोदावरी !