Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

कळणे वासीयांचा दडपलेला संघर्ष ! ✍️ अर्चना परब

कळणे वासियांचा दडपलेला संघर्ष !  मूळ लेखक : अर्चना परब  विनोद पाटील नावाच्या सैतानाचा डोळा निसर्गसंपन्न कळणे गावावर पडला आणि ईथेच सूरू झाला कळणे गावातील निसर्गाचा र्‍हास. बघता बघता ह्या माणसांने एक सामाईक डोंगर घश्यात घातला. ह्या गावातील काही लोक मुठभर पैश्यांसाठी विकले गेले. ते लोक  आज नक्कीच डोक्याला हात लाऊन बसले असतीलही पण त्यांच्या मुळे आज पुर्ण गाव परीणाम भोगत आहे.  ह्याची सुरवात झाली 2009 साली. जनसुनावणी मध्ये ह्या मायनिंग प्रकल्पाला 100% विरोध होता. विरोध बघुन जनसुनावणी पुढे ढकलण्यात आली. पण हा विरोध पुढेही कायमच होता. गावकऱ्यांच्या विरोधामुळे ह्या कंपनीने आपले डावपेच खेळायला सूरवात केली. मायनिंग परीसरा पासुन एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी असलेली नदी आणि २०-२५घरांची वाडीच नकाशावरून गायब केली. आणि चार लोंकाना धाक दाखवून जमिन हस्तगत केली. ज्याची ईतर गाववाल्यांना काहीच कल्पना नव्हती. अर्थात हे सगळं करताना राजकीय नेत्यांचा पाठिंबा होताच. लाचखोर नेत्यांच्या देशात अश्या जमिनी हस्तगत करणे तितकं कठीण नाहीच.  एक दिवस ...

प्रकृती समतोल राखणे जाणते !

प्रकृती समतोल राखणे जाणते ! आपणच अती महान आहोत व बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो ह्या मानवाच्या अहंकारामुळे प्रकृतीमध्ये जे पाशवी अतिक्रमण केले गेले आहे त्याला प्रकृती आपल्या परीने गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती स्वरूपात पदोपदी उत्तर देत आहे ! अज्ञान व अघोरी हव्यासापोटी जर प्रकृतीचे हे संकेत ओळखण्यास अजून नकार दिला गेला तर प्रकृती उत्तमरित्या जाणते की सृष्टीचे संतुलन कसे राखले जाते ! मूर्ख व अज्ञानी मानवाला वेळीच सावध व्हावे लागेल व आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी प्रकृतीमधील अतिक्रमण त्वरित थांबवावे लागेल अन्यथा प्रकृती समोर आपण किती क्षुद्र आहोत हे आपल्या अनुभवास आणून देण्यासाठी प्रकृतीस 1 मिनिट देखील पुरेसा आहे व त्यासाठी  प्रकृतीला काही बाजारू पर्यावरणवाद्यांची काहीही आवश्यकता नाही ! सद्विवेक बुद्धीचा अभाव असलेल्या पशूंमध्ये देखील ह्या प्रकृतिबद्दलचा आदर हा मानवापेक्षा  अधिक दिसून येतो ही बाब बुद्धिमत्तेचा टेंभा मिरविणाऱ्या मानवासाठी एक संकेत आहे की हे तुच्छ मानवा तू पशुपेक्षाही हिन आहेस कारण ज्या सद्विवेक बुद्धीच्या वरदानामुळे तू पशु पेक्षा वे...