Skip to main content

Posts

Showing posts from May, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस ३

 श्रीमद्भगवद्गीता अध्याय २   सांख्ययोग  - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस ३  १ )  अस्तित्वात असलेल्या सर्वांस ज्याने व्यापले आहेत आणि आपल्या अनुभवास येणाऱ्या दृश्य जगताचे जे अधिष्ठान आहे ते म्हणजे सत. आकार, रंग वेगवेगळे असलेल्या वेगवेगळ्या मातीच्या भांड्याना त्यांच्या उपयोगितेनुसार किंवा त्यातील वस्तू नुसार वेगवेगळी नावे असतात तरीही त्या सर्वांमधील माती एकच असते आणि मातीशिवाय भांड्याचेअस्तित्व नसते. मातीतून ते उत्पन्न होतात माती त्यांचे अस्तित्व असते त्यांचा नाद झाल्यावर त्यांची नामेरूपे मातीशी एकरूप होतात. त्याचप्रमाणे परिवर्तनशील संपूर्ण जगत अपरिवर्तनशील सतस्वरूपाने व्यापलेले आहे. २ )  इंद्रिय-मन-बुद्धी ही ज्ञानग्रहणाची उपकरणे जड असतात आणि जीवनशक्ती चैतन्याकडून शक्ती मिळाल्यावर त्यांना विषय ज्ञान होऊ शकते. ३ )  प्रत्येकाने पराजयाची प्रवृत्ती सोडून जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीच्या परिस्थितीचा निष्ठापूर्वक धैर्याने सामना केला पाहिजे. अधर्माचा सक्रिय प्रतिकार हा श्रीकृष्णांचा गीतेतील मुख्य संदेश आहे. ४ )  जन्म-अस्तित्व-वृद्धी-विकार-क्...

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग - स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस २

  श्रीमद्भगवद्गीता अध्याय २  सांख्ययोग - स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस २  १ ) समजदार व श्रेष्ठ पुरुषामध्ये जे भाव निर्माण होतात ते आपल्या कल्याणाला अनुसरूनच होतात. २ ) कल्याणइच्छुक पुरुष प्रवृत्ती व निवृत्ती दोन्हीमध्ये आपल्या कल्याणाचाच उद्देश ठेवतात ! त्यांच्यात कर्तव्याच्या बाबतीत भीती निर्माण होत नाही ! ३ ) ३  प्रकारचे मनुष्य असतात ! १ = विचारशील ज्यांची आपले कल्याण व्हावे हि इच्छा असते २ = पुण्य करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा करणारे ३ = साधारण मनुष्य जगालाच सर्व काहीसंजून जगामध्ये कीर्ती - प्रतिष्ठा मिळावी हि इच्छा करणारे ! ४ ) जे महान असतात ते द्रव्याची ( संपत्ती ) कामना करूच शकत नाही, जे द्रव्याची कामना करतात ते महान असूच शकत नाही ! ५ ) वाईट गोष्ट जर वाईटाच्या रूपानेच आली तर ती नष्ट करण्यास सोपी जाते, परंतु वाईट गोष्ट चांगुलपणाचे पांघरून घेऊन येते तिला नष्ट करणे सोपे नसते ! ६ ) केवळ भौतिक दृष्टी ठेवून कल्याणचा विचार येऊ शकत नाही !   ७ )  मनुष्य चिंतेने व शोकाने जेव्हा विव्हळ होतो तेव्हा तो कर्तव्य - अकर्तव्य याचा बोध न झाल्याने काहीही बरळत असतो ! ८...