Skip to main content

Posts

Showing posts from June, 2017

EVM - तोंड लपवायची जागा !

भारतीय लोकांना conspiracy theories (कटकारस्थान कथा) मधे विशेष रुचि आहे, आणि आपल्या काही अत्यंत धूर्त राजकारणी / पत्रकार लोकांना याचा वापर आपल्या स्वार्थाला साधन्यासाठी कसा करायचा हे चांगलेच अवगत आहे !  २०१४ नंतरच्या भाजपच्या प्रत्येक विजयानंतर जनतेमधे भ्रम पसरवण्यासाठी EVM छेडछाडचे रडगाणे गायले जाते. परंतु ज्या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला तिथे मात्र ह्या सगळ्यांना आपल्या कर्तुत्वाचे गुणगान करता करता वेळ पुरत नाही !  ह्या सगळ्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग जेव्हा समस्त बुद्धिवंत लोकांना आवाहन करते तेव्हा हे सगळे पळवाटा शोधून त्यालाही नकार देतात ! अर्थात भाजपनेही कांग्रेस सत्तेत असतांना एकदा हेच  रडगाणे गायले होते, परंतु त्यातला फोलपणा लक्षात आल्यानंतर त्यांनी तो नाद सोडून दिला ! असो आपला महत्वाचा विषय आहे की खरच EVM सोबत छेडछाड होऊ शकते का आणि याचे उत्तर फक्त “एक भारतीय” म्हणून शोधायचे असेल तर आधी निष्पक्ष होऊन पूर्ण लेख वाचावा लागेल !       EVM सोबत छेडछाड होऊ शकते का हे समजुन घेणं व सर्वांना समजावून सांगण त्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार...