EVM - तोंड लपवायची जागा !

EVM - तोंड लपवायची जागा !


भारतीय लोकांना conspiracy theories (कटकारस्थान कथा) मधे विशेष रुचि आहे, आणि आपल्या काही अत्यंत धूर्त राजकारणी / पत्रकार लोकांना याचा वापर आपल्या स्वार्थाला साधन्यासाठी कसा करायचा हे चांगलेच अवगत आहे ! 
२०१४ नंतरच्या भाजपच्या प्रत्येक विजयानंतर जनतेमधे भ्रम पसरवण्यासाठी EVM छेडछाडचे रडगाणे गायले जाते. परंतु ज्या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला तिथे मात्र ह्या सगळ्यांना आपल्या कर्तुत्वाचे गुणगान करता करता वेळ पुरत नाही ! 
ह्या सगळ्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग जेव्हा समस्त बुद्धिवंत लोकांना आवाहन करते तेव्हा हे सगळे पळवाटा शोधून त्यालाही नकार देतात !

अर्थात भाजपनेही कांग्रेस सत्तेत असतांना एकदा हेच रडगाणे गायले होते, परंतु त्यातला फोलपणा लक्षात आल्यानंतर त्यांनी तो नाद सोडून दिला !

असो आपला महत्वाचा विषय आहे की खरच EVM सोबत छेडछाड होऊ शकते का आणि याचे उत्तर फक्त “एक भारतीय” म्हणून शोधायचे असेल तर आधी निष्पक्ष होऊन पूर्ण लेख वाचावा लागेल !      
EVM सोबत छेडछाड होऊ शकते का हे समजुन घेणं व सर्वांना समजावून सांगण त्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आणि कर्तव्य आहे जो ह्या देशाच्या संविधान आणि लोकशाहीचा आदर करतो !

सर्वात आधी EVM काम कसे करतो हे समजून घ्या !

चला समजून घेऊया !

EVM  ह्या किट मधे एक बैलट यूनिट आणि एक कंट्रोल यूनिट असते !





बैलट यूनिट ज्यात तुम्ही तुमचे मत नोंदवतात व ते स्टोर केले जाते कंट्रोल यूनिट मधे !

१) एका कण्ट्रोल यूनिट मधे फ़क्त १५०० मत साठवले जाऊ शकतात, याचा अर्थ जर तुमच्या एका वार्ड मधे ४५००० मतदान असेल तर त्या वार्ड साठी ३० बालेट आणि कण्ट्रोल यूनिट लागतील ! 

( उदाहरणासाठी नाशिक गृहीत धरूया )  

नाशिक विधानसभा २०१४ ची मतदार संख्या होती १५,४९,०८६ म्हणजे पूर्ण यूनिट संख्या झाली १०३२ !  
महाराष्ट्र २०१४ विधानसभाचे एकून २८८ मतदारसंघ होते व् मतदार होते ६,५९,६५,७९२ म्हणजे एकून यूनिट वापरले गेले ४३,९७७ !
अरविंद केजरीवाल एकदा म्हणाले होते एक यूनिट मधे हैक करायला ९० सेकंद लागतात ! ( जे हास्यास्पद आहे  )
म्हणजेच ४३९७७ यूनिट साठी १०९९ तास = ४५ दिवस = दिड महिना ! 

२) हे किट भारतामधे २ कंपन्या बनवतात भारत एलेक्ट्रिनिक लिमिटेड, बंगलौर आणि इलेक्ट्रॉनिक्स कारपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड, हैदराबाद !

३) ह्या यूनिट मधील जी स्टोरेज मेमोरी असते ती नॉन राइटेबल म्हणजेच न लिहिता येणारी असते, जर तसा प्रयत्न झाला तर यूनिट कायमस्वरूपी लॉक होऊंन जाते !

४) मतदान दिनांक घोषित होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाकडून FLC  म्हणजेच फर्स्ट लेव्हल चेकिंग केलि जाते ज्यात कंपनीचे तांत्रिक इंजिनीअर, निवडणूक अयोगाचे अधिकारी व सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार सहभागी होतात व सर्व युनिटच्या टेस्ट घेतल्या जातात ज्यात कामित कमी १००० मतदान करूँ दाखवण्यात येते ज्यात सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख देखिल मतदान करूँ पाहतात ! १००० टाकलेले मतदान व् त्याचा निकाल हा सर्वांसमोर दाखवण्यात येतो ! त्यासाठी आळीपाळीने एकूण युनिटपैकी ५ % युनिट घेतले जाते व पक्ष प्रतिनिधी देखील युनिटची निवड करू शकतात ! हि संपूर्ण प्रोसेसची व्हीडीओ शुटींग केली जाते व CCTV  च्या निगराणीखाली हि सर्व प्रोसेस पार पड़ते ! सर्व टेस्ट झाल्यानंतर सर्व उपस्थितांसमोर सर्व यूनिटला सिल केले जाते ज्यासाठी नाशिक नोटप्रेसमधे तयार करण्यात आलेला एक खास पेपर वापरला जातो ! त्या पेपरचा एक सीरियल नंबर असतो जो सर्वाना दिला जातो ! त्यावर सर्व उपस्थितांची स्वाक्षरी घेतली जाते ! त्याचसोबत सर्व उपस्थिंतांची एका रजिस्टर मधे देखिल स्वाक्षरी घेतली जाते अणि त्याची एक प्रत सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार याना मोफत दिली जाते, इतकच नव्हे तर याची एक एक प्रत मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र इथे देखिल ठेवण्यात येते !

५) मतदानाच्या दिवशी एक तास अगोदर हे सर्व यूनिट निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पक्ष-अपक्ष उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी यांच्या समक्ष आणले जातात व त्यावरील सील दाखवले जाते, सर्वांच्या अनुमतीने ते सील खोलून परत युनिटची टेस्ट घेतली जाते ज्याला मॉक पोल टेस्ट म्हणतात ! यात सर्व उमेदवारांना ५० मत टाकुन दाखवले जातात  व त्याचा निकाल देखील दाखवला जातो ज्यात प्रत्येकाला योग्य मत भेटले आहे कि नाही हे टेस्ट केले जाते ! ह्या दरम्यान कुणाला काही आक्षेप असेल तर तो आक्षेप घेऊ शकतो ! पूर्ण मतदान पार पडेपर्यंत खूपच जास्त सुरक्षा व्यावस्था केली गेलेली असते जी आपणास देखील माहित आहे ! मतदान झाल्यानंतर सर्व युनिट परत सर्वांसमक्ष वेगवेगळ्या केस मध्ये सील केले जातात व उपस्थित निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पक्ष-अपक्ष उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी यांची त्यावर स्वाक्षरी घेतली जाते !

६) हे सीलबंद सर्व युनिट एका स्ट्रोगरूम मध्ये ठेवले जातात व त्या रूमला सील केले जाते ज्या साठी उमेदवार स्वताचेदेखील सील वापरू शकतो ! ह्यानंतर ह्या परिसरात खूप मोठ्या स्वरूपात पोलीस बंदोबस्त, मिडिया व सर्व पक्षीय पहारा मतमोजणीच्या दिवसापर्यंत ठेवला जातो !

७) मतमोजणीच्या दिवशी  उमेदवार, निवडणूक अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, मिडिया या सर्वांसमोर स्ट्रोगरूमचे सील खोलून सर्व सीलबंद युनिट सादर केले जातात, व कुणाचा आक्षेप नसेल तर मतमोजणीला सुरवात होते !
काही तासातच सर्व निकाल जाहीर होतात !

८) आत्ता जर EVM हैक करायच असेल तर सर्वात प्रथम त्याची मेमरी बदलावी लागेल ! ज्यासाठी स्ट्रोगरूम उघडून एक एक युनिटला खोलून सर्वांची मेमरी बदलावी लागेल ज्यासाठी एका युनिटला कमीत कमी २० मिनिटे तरी लागतील ! म्हणजे संपूर्ण शासकीय व्यवस्था म्यानेज करून एका व्यक्तीला ४३९७७ युनिटसाठी ६१० दिवस !!! 

९) हे करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन, निवडणूक आयोग, मिडिया, वृत्तपत्र, उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक म्हणजे इथून तिथे १०० % यंत्रणा म्यानेज करावी लागेल !
आहे की नाही किती सोप्प !

१०) बरेच जण दिल्ली विधानसभेमधील अरविंद केजरीवाल यांनी दाखवलेल्या EVM हैकिंगचा दाखला देतात ! हे असले खेळ दाखव्ण्यासाठीचे खेळणे ऑनलाइन सहज उपलब्ध आहे ! जे वापरून ४-५ वी चे मुलदेखील हा प्रयोग करून दाखवू शकतात !

११) अनेकदा बाहेरच्या देशामधील EVM बंदीची पुडी सोडली जाते. इथे आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या EVM आणि बाहेर ज्या EVM ला विरोध आहे त्या मधला फरक समजून घ्यावा लागेल. बाहेरच्या देशामधील EVM इंटरनेटला जोडले जाऊ शकतात म्हणून ते हैक पण होऊ शकतात ! आपल्या देशात वापरल्या जाणाऱ्या EVM ला इंटरनेटच काय तर कोणत्याही नेटवर्कला जोडले जाऊ शकत नाही !

१२) ह्या सगळ्या होणाऱ्या आरोपांना लक्षात घेता निवडणूक आयोगाने VVPAT ( Voter Verifiable Paper Audit Trail ) तंद्रज्ञान वापरून पुढील निवडणूक घेण्याचे ठरवले आहे ! ज्या मध्ये मत नोंदवल्या गेल्यानंतर त्याची नोंद चिट्ठी स्वरूपात ठेवली जाणार आहे ! जाहीर झालेल्या निकालावर शंका असेल तर ह्या साठवलेल्या चिट्ठीस्वरूपातील मतांची मोजणी करून शहानिशा करण्यात येईल !





१३) आता हे सगळ करूनदेखील येणाऱ्या गुजरात निवडणुकीमधे जर भाजपा जिंकली तर हेच रडगाणे पुन्हा ऐकू येण्याची शक्यताच जास्त आहे ! कारण भारतीय लोकांना conspiracy theories (कटकारस्थान कथा) मधे विशेष रुचि आहे, आणि आपल्या काही अत्यंत धूर्त राजकारणी / पत्रकार लोकांना याचा वापर आपल्या स्वार्थाला साधन्यासाठी कसा करायचा हे चांगलेच अवगत आहे !

१२) एव्हढ्या पारदर्शक पद्धतीने पार पडणार्या निवडणूक पद्धतीवर संशय घेऊन सामान्य जनतेमध्ये भ्रम पसरविण्याचे काम फक्त ज्याचा संविधान आणि लोकशाही मार्गावर विश्वास नाही तोच करू शकतो !

Ganesh K Avasthi
Blog Admin




Post a Comment

0 Comments