शाम रंगीला आणि कॉंग्रेसची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची “रंगीला” ओरड !
सर्वात प्रथम आपल्या देशात घडणाऱ्या अथवा घडवून आणल्या जाणाऱ्या घटनांची पार्श्वभूमी तपासणे खुपच गरजेचे असते, ती न तपासता जर त्या घटनांवर विश्वास ठेवायचा झाल्यास आपला कालांतराने भ्रमनिरास झाल्याशिवाय राहत नाही !
आता ताजी घटना आहे शाम रंगीला ह्या नक्कल करणाऱ्या कलाकाराची ! एका वाहिनीवर “द ग्रेट इंडिअन लाफ्टर चालेंज” हा विनोदी कार्यक्रम चालवला जातो, त्यात शामने पंतप्रधान नरेंद्र मोदी व् कांग्रेसचे भावी पंतप्रधान राहुल गाँधी यांची अतिशय सुरेख अशी नक्कल केलि!
त्या वाहिनीने त्या भागाला प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला व् शामला दोघांची नक्कल न करण्याचा सल्ला दिला ! आता यात कोणत्याही सरकारी संस्थेचा, पक्षाचा व् संघटनेचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही ! परंतु “द वायर“ ह्या मोदीज्वराने ग्रस्त असलेल्या संकेतस्थळावर सर्वात प्रथम याला ह्या सरकारमध्ये गळचेपी कशी होतेय हे नेहमीप्रमाणे तथ्याना तोडून-मोडून सांगण्यात आले ! आता यांच्या संपादकविषयी जाणून घ्या ! याचे संपादक आहेत कॉंग्रेसचे अतिप्रिय पत्रकार विनोद दुआ ! यांना कॉंग्रेसच्या काळात पद्माश्री भेटला आहे, एव्हढी ओळख पुरेशी आहे कॉंग्रेसप्रीय म्हणण्यासाठी, आणि विशेष योगायोग म्हणजे यांचीच मुलगी ह्या कार्याक्रमाची ज्युरी आहे ! ह्या नंतर अनेक कॉंग्रेसच्या शिलेदार, कॉंग्रेसप्रिय पत्रकार, ढोंगी पुरोगामी यांनी त्याही पुढे जावून हि कशा प्रकारे अभिव्यकी स्वातंत्र्याची गळचेपी आहे, कॉंग्रेसचे महान नेते पंडित नेहरू यापासून ते उद्योगसम्राट लालू यादव यांच्या रसिकतेचे व खिलाडूवृत्तीचे गोडवे गात नेहमीप्रमाणे मोदींना लक्ष्य करायला सुरवात केली व त्यावर देश अराजकतेकडे, अघोषित आणीबाणी, हुकुमशाही, असे एक न अनेक त्याच त्याच घासून घासून गुळगुळीत झालेल्या प्रतिक्रयांचा धुराळा ह्यांचे समर्थक उडवायला लागले. मुळात “आणीबाणीचे” जनक असलेल्या कॉंग्रेसच्या हितचिंतकाकडून जेव्हा हे शब्दप्रयोग केले जातात तेव्हा ते शाम रंगीला पेक्षाही जास्त विनोदी भासतात ! हे सगळ होत असतांना कॉंग्रेसच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची थोडीशी ओळख करून द्यावी असा विचार डोक्यात आला व त्याचे थोडेसे उदाहरण एक माहिती म्हणून लिहावेसे वाटले !
कदाचित ते आरसा म्हणून कामात येतील !
1) १९५२ मध्ये कोणतेही कारण न देता “रुनुमी” ह्या चित्रपटावर बंदी !
2) “गोकुळ शंकर” ह्या चित्रपटावर बंदी (१९६३)
3) “मी गांधीना का मारले” ह्या पुस्तकावर बंदी !
4) “गरम हवा“ (१९७३) पाकिस्तान फाळणीवर आधारित चित्रपटावर बंदी !
5) राज्यसभा खासदार ने “हिंदू टेम्पल एंड व्हाट हप्पेंद टू देम” ह्या अरुण शौरी आणि इतर लिखित पुस्तकावर बंदी आणण्याचा ठराव मांडला !
6) “किस्सा खुर्सी का” ह्या चित्रपटावर बंदी !
7) १९८८ मध्ये राजीव गांधी यांनी “लास्ट टेम्पटेशन ऑफ ख्रिस्ट” ह्या चित्रपटावर बंदी घालण्याच आश्वासन दिल होत !
8) “अमु” ह्या चित्रपटावर प्रदर्शित होण्यावर बंदी घातली जो १९८४ च्या दंगलीवर आधारित होता (२००५)
9) २००३ मध्ये “हवाये” ह्या चित्रपटावर बंदी !
10) २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने आर.व्ही.भासीन यांच्या “इस्लाम अ कन्सेप्ट ऑफ पोलिटिकल वर्ल्ड इंनवेशन बाय मुस्लिम्स" ह्या पुस्तकावर बंदी घातली !
11) २००५ मध्ये आसाम सरकारने अजय देवगणच्या “टैंगो चार्ली” ह्या चित्रपटावर बंदी घातली !
12) “मी नथुराम गोडसे बोलतोय” ह्या नाटकावर कॉंग्रेसचे हिंसक व उग्र निदर्शने नेहमीच चालू असता !
कॉंग्रेसने “मी नथुराम गोडसे बोलतोय” ह्या नाटकावर बंदी घालण्याची याचिका न्यायालयात दाखल केली होती परंतु ती फेटाळण्यात आली !
13) कमल हसन च्या “हे राम” विरुद्ध कॉंग्रेसचे उग्र व हिंसक आंदोलन !
14) २०१० मध्ये महाराष्ट्र मुळ्य्मंत्री यांनी अमिताभ बच्चन यांचासोबत व्यासपीठावर बसण्यास नकार दिला !
15) असीम त्रिवेदी ह्या कार्टुनिस्ट वर राजद्रोह व सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याचे संकेतस्थळ बंद केले ! (२०११)
16) २०११ मध्ये “हद-अनहद” ह्या चित्रपटावर प्रदर्शित होण्यावरअप्रत्यक्षरित्या बंदी घातली, उच्च न्यायालयाने तो प्रयत्न हाणून पाडला !
17) २०१२ मध्ये निर्मित “PithavinumPuthranum” ह्या मल्याळम चित्रपटावर अप्रत्यक्षरित्याप्रदर्शित होण्यावर बंदी घातली !
18) २०१३ मध्ये “सद्दा हक” ह्या चित्रपटावर बंदी !
19) २०१४ मध्ये “कोम दे हिरे” ह्या चित्रपटावर बंदी !
20) कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यांनी २ पत्रकाराना तुरुंगात टाकल ! (जून २०१७)
21) “इंदू सरकार” २०१७ ह्या चित्रपटाला देखील कार्यकर्त्यांचे विशेष प्रेम लाभले !
असे गाजलेले व चर्चिले गेलेल्या अनेक उदाहरणापैकी थोडेसेच भरपूर आहे ”आणीबाणीचे” जनक असलेल्या कॉंग्रेसी अभिव्यक्ती स्वातंत्राची ओळख पटवून देण्यासाठी !
0 Comments