बाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा !

बाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा ! सर्वात प्रथम १ ३ वर्षीय बाजी राउत व त्यासोबत शहीद झालेले लक्ष्मण मलिक , फागू साहू , हर्षी प्रधान , नाता मलिक यांना शत शत नमन ! आज आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी “राष्ट्रप्रेम” ह्या अत्यंत पवित्र भावनेतून कित्येकानी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आ हे ! त्यातील कित्येकांना योग्य तो सन्मान मिळाला, परंतु अधिक प्रमाणात अनेकांच्या पदरी फक्त उपेक्षाच पडली हे स्वातंत्र्यउत्तोर काळात सिद्ध झाले आहे. असाच एक उपेक्षित राहिलेला १ ३ वर्षीय क्रांतिकारक बाजी राउत, भारतातील सर्वात लहान हुतात्मा ! ज्याने अवघ्या १ ३ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ! १९२५ साली ओरिसातील निलकंठपूर जिल्ह्यातील ढेंकानाल गावात बाजी राउतचा जन्म झाला. बाजी लहान असतांनाच त्याचे वडील हरिप्रसाद राउत यांचे निधन झाले, त्या पश्चात बाजीच्या आईने अत्यंत हलाखीमध्ये बाजीचे संगोपण केले. आईला मदत म्हणून बाजी लहान वयातच ब्राह्मणी नदीवर नौका वाहकाच काम करू लागला. लहानपणापासूनच बाजी आपल्या ढेंकानाल संस्थांनच्या राजाचा ( शंकर प्रताप सिंघ देव ) प्रजेवर होत असलेल