सीडीयुक्त राजकारण !

सीडीयुक्त राजकारण !



 सध्या गुजरात निवडणुकिच्या रणधुमाळीत “प्रसार माध्यमांच्या” मते निवडणुकीला कलाटणी देणारी घटना ह्या विषयावर बरीच चर्चासत्र झोडली गेली-जाताय ! विषय आहे हार्दिक पटेल याची CD ! इथे काही विषय मुद्दाम मांडणे गरजेचे आहे.

१)      हार्दिक पटेल याला फार मोठा जनाधार आहे हेही प्रसार माध्यमांचच गुऱ्हाळ आहे ! त्याचा जनाधार वेळोवेळी गुजरातच्या प्रत्येक निवडणुकीत सिद्ध झालाय ! तेव्हा त्याची उघडकीस आलेली सीडी म्हणजे निवडणुकीला कलाटणी ही केवळ मल्लीनाथीच आहे ! प्रसारमाध्यमे व विरोधक ह्याला निवडणूकीचा मुद्दा बनवताय ह्यावरूनच त्यांना असलेला विकासाचा प्रामाणिक ध्यास अधोरेखित होतो !

२)      हार्दिक पटेलच्या ४ भिंतीमध्ये चालू असलेल्या गोष्टीला निवडणुकीचा मुद्दा तोपर्यंत नाही बनवायला हवा जोपर्यंत त्या गोष्टींचा राज्याच्या कारभारावर काही परिणाम पडत नाही व तथाकथित स्त्री त्याची तक्रार दाखल करत नाही ! “बाईलवेडा” असण ही त्याची वैयक्तिक निवड आहे ! एका मोठ्या समाजाला परिणामकारक आंदोलनासाठी तयार करून त्यांच नेतृत्व करत असतांना त्यासाठी हार्दिक किती अपरिपक्व आहे हेच वेळोवेळी सिद्ध झालय ! ( त्याचे आंदोलनाचे हेतू हा वेगळा विषय ) ह्याचा पाटीदार समाजाने देखील गंभीर विचार करायला हवा !

भारताच्या राजकारणामध्ये CD स्कॅन्डल अथवा सेक्स स्कॅन्डल हा प्रकार नवीन नाही ! अनेकांना आपल्या राजकीय कारकिर्दीवर पाणी सोडाव लागलेलं आहे तर कित्येक जण तुरुंगाची हवा देखील खात आहेत. 

भारतीय राजकारणातील गाजलेले काही प्रकरण पाहूया !

१)       १९७८ मध्ये उपपंतप्रधान व पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार जगजीवन राम यांच्या मुलाचे काही वैयक्तिक फोटो “सूर्या” नामक एका मासिकात झळकले होते व त्या घटनेने एका मोठ्या दलित नेतृत्वाची जी कदाचित भारताची प्रथम दलित पंतप्रधान होऊ शकली असती, तिच्या राजकीय कारकीर्दीचा ( ५० वर्ष सलग निवडूण आलेले जगातील एकमेव व्यक्ती ) बळी घेतला होता ! त्यावेळेस श्रीमती. मनेका गांधी ह्या त्या मासिकाच्या संपादक होत्या !

२)       २००३ मध्ये उत्तरप्रदेश कवियत्री मधुमती शुक्ला हिचा खून झाला ! यात मायावती मंत्रिमंडळातील अमरमणी त्रिपाठी ह्या मंत्र्याचा सहभाग सिद्ध झाला ! दोघांच्या संबंधामधून जन्माला येणाऱ्या बाळाच्या गर्भपाताला नकार दिला होता !
३)       २००५ मध्ये गुजरात भाजपाचे वजनदार नेते संजय जोशी ह्यांचीदेखील राजकीय कारकीर्द अशाच एक CD ने संपवली !

४)       २००९ मध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व आंध्रप्रदेशचे राज्यपाल ८६ वर्षीय एन.डी तिवारी यांना असाच वैयक्तिक टेप प्रसिद्ध झाल्यामुळे राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा लागला ! २००८ मध्ये शेखर तिवारी नामक व्यक्तीने एन.डी तिवारी हे आपले वडील असल्याचा दावा दाखल केला, ज्याला एन.डी तिवारी नकार देत होते ! २०१२ मध्ये कोर्टाने DNA टेस्ट करून एन.डी तिवार हेच शेखर तिवारीचे वडील असल्याचा निर्णय दिला !

५)       २०११ मध्ये राजस्थान सरकार मधील मंत्री महिपल मदेरणा यांची गाजलेल्या भंवरी देवी अपहरण व हत्या प्रकरणात गच्छंती !

६)       २०१२ मध्ये कॉंग्रेसचे वजनदार नेते, प्रवक्ते, वकील अभिषेक मनू सिंघवी यांची देखील CD प्रकशित केली गेली. तेव्हापासून गेलेली रया ते परत मिळवू शकलेले नाही !

७)       २०१३ मध्ये राजस्थानचे मंत्री असलेले बाबूलाल नागर यांच्यावर सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लैगिक शोषण केल्याचे आरोप झाले व त्यांना राजीनामा द्यावा लागला !

८)       २०१३ मध्ये मध्य प्रदेशमधील ७९ वर्षीय मंत्री राघवजी यांचीदेखील मोलकरणी सोबतची CD प्रकाशित झाली व त्यांना राजीनामा द्यावा लागला !

९)       २०१६ मध्ये दिल्लीचे मंत्री संदीप कुमार यांची CD प्रकाशित झाल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची हकालपट्टी केली !

असे उघडकीस आलेले व गाजलेले प्रकरण
 पाहता फक्त राजकीयच नाही तर प्रयेक क्षेत्रातील मेहनतीने कारकीर्द उभ्या करणाऱ्या व्यक्तीने समाजमान्य असलेल्या-नसलेल्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा !      

Post a Comment

0 Comments