Posts

Showing posts from 2020

दंगलीचे मुखवटेधारी पालक !

दंगलीचे मुखवटेधारी पालक ! कोणतीही दंगल एका दिवसात होते का ? तर नाही, प्रत्येक दंगलीमागे एक नियोजन असते व  दंगल माजवणाऱ्यांचे चेहरे चित्रीकरण-चित्र यांच्या माध्यमातून आपल्या समोर येत जरी असले तरी ते फक्त अभिनेते असतात ! दंगलीचे पालकत्व - निर्माते - कथालेखक -   दिग्दर्शक कोण असतात ? दिल्लीत सामान्य जनतेच्या जीविताची - मालमत्तेची हानी झाली त्याला कोण जबाबदार ? ह्या समस्त प्रकाराला आपल्या बालवयात पाहणाऱ्या कोणत्याही जाती धर्माच्या मुलांच्या मनावर खोलवर एक द्वेषाचा विचार रोवल्यामुळे भविष्यात होणाऱ्या परीणामांची जबाबदारी कुणाची ? ह्या दंगलीचे मूळ कोठे आहे ? भाजप सरकारने संविधानिक मार्गाने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा ! हा कायदा खरच भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व हिरावून घेतो का ? ह्या जेमतेम 3 पानी मसुद्यातील तरतुदी न समजण्याइतक्या क्लिष्ट आहेत का ? तर नाही त्या मुळीच क्लिष्ट नाही ! जर मसुदा समजण्यासाठी क्लिष्ट नाहीये तर गेल्या 3 महिन्यापासून देशभरात इतक्या मोठ्या प्रमाणात गढूळ वातावरण निर्मिती केली गेली ती कशासाठी व कुणी ? 3 महिन्यापासून संपूर्ण देशाला अस्थिरत

राष्ट्रगीतातील 'अधिनायक' या शब्दाबद्दल असलेला वाद काय आहे ?

मूळ प्रश्न : राष्ट्रगीतातील 'अधिनायक' या शब्दाबद्दल असलेला वाद काय आहे ? माझे उत्तर :  सूचना : मला रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे ! वाद फक्त  "अधिनायक"  ह्या एकाच शब्दाबद्दल नसून  "भारत भाग्य विधाता"  ह्या शब्दावरून देखील आहे ! ह्या दोन्ही शब्दांना विरोध कारणाऱ्यांचा युक्तिवाद असा आहे की हे दोन्ही शब्द "तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सन्मानार्थ लिहले गेले आहेत ! ह्या वादाचे २ पक्ष आहेत : समर्थक व विरोधक ! समर्थकांचे म्हणने आहे की हा वाद निर्माण होण्यास तत्कालीन काही वृत्तपत्रे जबाबदार आहेत ! कारण त्यांनी पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन चुकीचे केले ! पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमामध्ये २ गाणे गायले गेले होते ! एक जण-गण-मन व एक दुसरे गाणे जे सन्मानार्थ गायले गेले ! विरोधक म्हणतात : काँग्रेसने रवींद्रनाथ टागोर यांच्यावर दबाव आणून ब्रिटिश राज्यकर्त्यांची खुशामत करण्यासाठी हे गाणे लिहून घेतले ! यातील "अधिनायक" आणि "भारत भाग्य विधाता" हा सन

#सारे_तख्त_उछाले_जायेंगे_हम_देखेंगे !

Image
# सारे_तख्त_उछाले_जायेंगे_हम_देखेंगे  ! तुम्हाला काय वाटत आहे ? देशभरात एव्हढा गोंधळ जो चालू आहे तो थांबविणे सरकारला शक्य नाहीये ? आर्थिक-प्रशासनिक यंत्रणांवर पूर्ण ताबा असतांना विरोधक उपद्रवीनीं घातलेल्या उच्छादापुढे सरकार हतबल आहे असे तुम्हाला वाटते का ? जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही फारच भोळे आहात ! CAA-NRC_NPR विरोध आंदोलनाच्या नावाखाली ज्या प्रकारे विरोधकांनी धार्मिक भावनांचे राजकीय भांडवल केले आहे तेच तर सरकारचे ध्येय होते व ते सरकारने अगदी बेमालूमपणे साध्यदेखील के ले आहे ! सरकारने स्वतः फार कष्ट न घेता आज विरोधकांना हिंदुत्व विरोधक म्हणून जनतेसमोर अपराधी ठरवले आहे ! सरकारने जे जाळे फेकले आहे त्यात तथाकथित सर्वच चाणक्य अडकले आहे व पुढच्या निवडणुकीपर्यंत ते जाळे अधिक घट्ट विणले जाणार असून आजचे सर्वच नायक २०२४ नंतर पुन्हा चिंतनासाठी प्रस्थान करतांना दिसतील ! ३७० कलम हटविल्यानांतर भारत देशात तिरंगा उचलायला कुणी उरणार नाही पूर्ण देश जळेल अशी गर्जना ठोकणारे आज कुठे आहे ? राम मंदिरामध्ये उभा केला जाणारा अडथळा कुठे आहे ? सरकारने २०२४ साठी २०२० मधेच मतदार तयार करून घेतला आह