नाशिककर सावध व्हा ! भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या मध्य प्रदेश मधील इंदोर शहरातील भागीरथपुरा भागात आतापर्यंत ड्रेनेजयुक्त पाणी पिल्यामुळे १६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ! ११०० वर आजारी असल्याची नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे ! गेल्या अनेक दिवसापांसून येथील नागरिक दुषित पाण्याची तक्रार सबंधित विभागाकडे करत होते परंतु अत्यंत कार्यक्षम अशा मुर्दाड प्रशासनाने त्याची दखल काही घेतली नाही ज्यामुळे आज इतकी मोठी किंमत तेथील नागरिकांना चुकवावी लागली आहे ! ह्या प्रशासकीय हत्येला दाबण्यासाठी मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला २ लाख रु. देवून व ४-५ अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचा फार्स करून वातावरण शांत करण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न करण्यात आला आहे व त्यात राज्य सरकार नक्कीच यशस्वी होईल यात मला शंका नाही ! कारण भारतीय समाज मानसिकता हि कसाई खान्यातील खुराड्यात कत्तलीसाठी कोंबलेल्या कोंबड्यासारखी आहे ! जोपर्यंत दुसऱ्या कोंबडीची मान मोडली जात आहे तोपर्यंत खुराड्यातील प्रत्येक कोंबडी स्वतःला सुरक्षित समजत असते व डोळे बंद करून शांतपणे दाणे टिप...