राष्ट्रगीतातील 'अधिनायक' या शब्दाबद्दल असलेला वाद काय आहे ?
मूळ प्रश्न : राष्ट्रगीतातील 'अधिनायक' या शब्दाबद्दल असलेला वाद काय आहे ? माझे उत्तर : सूचना : मला रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे ! वाद फक्त "अधिनायक" ह्या एकाच शब्दाबद्दल नसून "भारत भाग्य विधाता" ह्या शब्दावरून देखील आहे ! ह्या दोन्ही शब्दांना विरोध कारणाऱ्यांचा युक्तिवाद असा आहे की हे दोन्ही शब्द "तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सन्मानार्थ लिहले गेले आहेत ! ह्या वादाचे २ पक्ष आहेत : समर्थक व विरोधक ! समर्थकांचे म्हणने आहे की हा वाद निर्माण होण्यास तत्कालीन काही वृत्तपत्रे जबाबदार आहेत ! कारण त्यांनी पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन चुकीचे केले ! पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमामध्ये २ गाणे गायले गेले होते ! एक जण-गण-मन व एक दुसरे गाणे जे सन्मानार्थ गायले गेले ! विरोधक म्हणतात : काँग्रेसने रवींद्रनाथ टागोर यांच्यावर दबाव आणून ब्रिटिश राज्यकर्त्यांची खुशामत करण्यासाठी हे गाणे लिहून घेतले ! यातील "अधिनायक" आणि "भारत भाग्य विधाता" हा सन