ह्या हसऱ्या चेहऱ्यांकडे पाहिल्यावर ह्या ओळी नाही आठवल्या तरच नवल ! कारण काय आहे ह्या हसऱ्या चेहऱ्यामागचे ? अहो स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षा नंतर ह्यांना वीज बघायला मिळतेय ! हे काही फोटो आहेत कारगिल मधील व काही उत्तर प्रदेशच्या हरदोई तहसीलच्या ठाकुरी खेड्यातील . शहरी भागात २ तास लोड शेडींग झाल्यानंतरचा आपला त्रागा आठवा ! ह्या लोकांनी तर यांची पूर्ण १ पिढीच विजेविना घालवलीये ! विजेची जी परिस्थिती तीच दोन वेळच्या अन्नाची , रस्त्यांची , पाण्याची , शिक्षणाची व डोक्यावरील छपराची ! शाळेत शिकवल्या जाणाऱ्या मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तता कुठवर झाली याची चिकित्सा आपल्या मागच्या पिढ्यांनी जर केली असती तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी राहिली असती ! जी चुकी मागच्या पिढ्यांनी केली ती आजची पिढी नक्कीच करणार नाही अशी अपेक्षा ठेवूया ! मागच्या पिढ्यांना दोष देणे कदाचित बहुतेक जणांना पचनी पडणार नाही , पण देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवता हा दोष मागच्या पिढ्यांच्या माथ्यावरच टाकावा लागेल . आंधळ्या विश्वासाने कोणत्याही स्वार्थाशिवाय एका पक्षाच्या ( घराण्याच्या ) हातात देशाची सत्ता सोप