चहावाला “लेखक” लक्ष्मण राव !

चहावाला “लेखक” लक्ष्मण राव ! चहावाला “लेखक” वाचल- ऐकले की कपाळावर आठ्या येतातच ! कारण आपण आपल्याकडे लेखकाबद्दलच्या सर्वसाधारण समजूती अशा दृढ करून ठेवल्या आहेत की मनात प्रश्न उठल्याशिवाय राहत नाही की चहावाला लेखक कसा असू शकतो ? परंतु अशा समजुतीला खोट ठरवणारे एक ६६ वर्षीय लेखक आहेत ज्याचं नाव आहे लक्ष्मण राव ज्यांनी तब्बल २४ पुस्तकांचे लेखन-प्रकाशन केले असून त्यांना ३८ पेक्षा जास्त साहित्य पुरस्कार देखील भेटले आहेत ! दिल्लीच्या विष्णू-दिगंबर मार्गवर आपले चहाचे दुकान व बाजूला रस्त्यावर मांडलेला आपल्या लेखनाचा प्रपंच ! असे चित्र पाहिल्यावर माणूस तिथे न थांबला तर नवलच ! पुस्तके एकवेळ घेणार नाही परंतु चहा पिवून एक नजर मारल्याशिवाय जाणारच नाही. लक्ष्मण राव यांच्या प्रसिद्धीमुळे त्यांना माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी कुतुहलापोटी आमंत्रित करून सन्मानित देखील केले आहे. परंतु लक्ष्मण राव यांचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांचा दृढनिश्चय, साहित्याबद्दल असलेले प्रचंड प्रेम, ध्येयाबद्दलची चिकाटी आज आपल्यासारख्या सुख-चैनीमध्ये