Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

"एकीचे बळ" विस्मृतीत गेलेली कथा !

लहानपणी जवळपास सगळ्यानीच एक गोष्ट वाचली-ऐकली असेल, त्या गोष्टीचे नाव होते एकीचे बळ ! गोष्ट खुपच साधी अणि सोपी होती परंतु दुर्दैवाने बहुतेक सामान्यजन ती गोष्ट साफ विसरलेले दिसत आहेत. परंतु एक असा वर्ग आहे ज्याने ह्या गोष्टीचा खुप उत्तमरीत्या अभ्यास केला आहे व् त्याचा वापर तो वर्ग आपले हित साधन्यासाठी वर्षो न वर्षो करत आहे. तो वर्ग म्हणजे “राजकीय नेत्यांचा वर्ग” आता राजकीय म्हटल तर त्यात प्रत्येक पक्षाचा समावेश होतो हे पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्याने समजुन घ्यावे ! लेखकाचा पक्ष शोधायची तसदी घ्यावी लागु नए म्हणून आधीच नमूद केल ! गोष्ट काय होती ? एक काठी तुटायला सोपी असते, २ थोड्या अवघड, ३ अजुन अवघड, जशा-जशा काठ्या एकत्र बांधणार तस-तशा त्या तुटायला अवघड जातात ! बोध होता एकीचे बळ ! आपण सर्व सामान्य मतदार ( जे कुठल्याही पक्ष-संघटना-जातीय/धार्मिक संघटना यांचे सदस्य नाहीं ) हे विखुरलेल्या काठ्याप्रमाणेच आहोत व् आपण तसेच रहावे हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या हिताचे आहे. म्हणुनच तर आपण सर्व जात-धर्म-भाषा-प्रांत-व्यवसाय-शिक्षण ह्या सारख्या भावनिक मुद्द्यांवर कायम एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभ...